________________
४०-९५)
महापुराण
(४४३
हविष्पाके च धूपे च दीपोद्बोधनसंविषौ । वह्नीनां विनियोगः स्यादमीषां नित्यपूजने ॥ ८६ प्रयत्नेनाभिरक्ष्यं स्यादिदमग्नित्रयं गृहे । नैव दातव्यमन्येभ्यस्तेऽन्ये ये स्युरसंस्कृताः ॥ ८७ न स्वतोऽग्नेः पवित्रत्वं देवताभूयमेव वा । कि त्वहद्दिव्यमूर्तीज्यासम्बन्धात्पावनोऽनलः ॥८८ ततः पूजाङ्गतामस्य मत्वार्चन्ति द्विजोत्तमाः । निर्वाणक्षेत्रपूजावत्तत्पूजातो न दूष्यति ।। ८९ व्यवहारनयापेक्षा तस्येष्टा पूज्यता द्विजैः । जनरध्यवहार्योऽयं नयोऽद्यत्वेऽग्रजन्मभिः ॥ ९० साधारणास्त्विमे मन्त्राः सर्वत्रैव क्रियाविधौ । यथासम्भवमुन्नेष्ये विशेषविषयांश्च तान् ॥ ९१ सज्जातिभागी भव सद्गृहभागी भवेति च । पदद्वयमुदीर्यादौ पदानीमान्यतः पठेत् ॥ ९२ आदौ मुनीन्द्रभागीति भवेत्यन्ते पदं वदेत् । सुरेन्द्रभागी परमराज्यभागीति च द्वयम् ॥ ९३ आर्हन्त्यभागी भवेति पदमस्मादनन्तरम् । ततः परमनिर्वाणभागी भव पदं भवेत् ॥ ९४ आधाने मन्त्र एष स्यात्पूर्वमन्त्रपुरःसरः। विनियोगश्च मन्त्राणां यथाम्नायं प्रशितः ॥ ९५
नेहमी जिनपूजन करतेवेळी गार्हपत्य अग्नीचा नैवेद्य शिजविण्याच्या कार्या, धूपक्षेपणाच्या कामी आहवनीय अग्नीचा व दीपक लावण्याच्या कामी दक्षिणाग्नीचा उपयोग होतो ।। ८६ ॥
या तीन अग्नीचे त्या द्विजोत्तमाने उत्तम प्रयत्नाने रक्षण करावे व जे संस्काररहित आहेत त्यांना त्याने हे अग्नि देऊ नयेतच ॥ ८७ ।।
या अग्नीला स्वत: पवित्रता नाही. किंवा हे अग्नि देवताही नाहीत पण अर्हन्ताच्या दिव्यमूर्तीच्या सम्बन्धामुळे हे अग्नि पवित्र आहेत ।। ८८ ।।
म्हणून या अग्नीला पूजेचे कारण साधन मानून श्रेष्ठ ब्राह्मण निर्वाणक्षेत्राच्या पूजेप्रमाणे याचीही पूजा करतात व ती पूजा दोषयुक्त नाही. जिनेश्वराच्या सहवासाने जी सम्मेदशिखरादि क्षेत्रे पूज्य आहेत तशी जिनेश्वराच्या सहवासाने अग्नीलाही पूज्यता आली आहे म्हणून ही अग्निपूजा दोषयुक्त नाही ॥ ८९ ॥
___ व्यवहारनयाच्या अपेक्षेने द्विजाकडून या अग्नींची पूज्यता सांगितली आहे. म्हणून जैन ब्राह्मणानी हा नय आज उपयोगात आणावा ॥ ९० ॥
सर्वक्रियामध्ये सामान्यरीतीने हे मन्त्र उपयोगात आणावेत असे आतापर्यन्त सांगितले. पण आता येथून विशेष विषयात कोणत्या मंत्राचा उपयोग करावा हे मी आता सांगतो॥९१ ॥
गर्भाधान क्रियेत प्रथमतः सज्जातिभागी भव, सद्गृहभागी भव अशी दोन पदे प्रथमतः उच्चारून नंतर पुढील पदे याप्रमाणे बोलावीत. यानंतर पुढे मुनीन्द्रभागी भव असे म्हणून शेवटी सुरेन्द्रभागी भव, परमराज्यभागी भव अशी दोन पदे म्हणावेत. यानंतर आर्हन्त्यभागी भव हे पद म्हणन शेवटी परमनिर्वाणभागी भव असे पद म्हणावे. गर्भाधानक्रियेत हा मंत्र पूर्वमंत्रासह सांगितला आहे. आगमाला अनुसरून प्रत्येक क्रियेत या मंत्राचा विनियोग करावा ।। ९२-९५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org