Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५८)
महापुराण
(४०-२०५
असत्यस्मिन्न मान्यत्वमस्य स्यात्सम्मतर्जनैः । ततश्च स्थानमानादिलाभाभावात्पदच्युतिः ।। २०५ तस्मादयं गुणो यत्नादात्मन्यारोप्यतां द्विजैः । यत्नश्च ज्ञानवृत्तादिसम्पत्तिः सोज्झ्यतां न तैः॥२०६ स्यात्प्रजान्तरसम्बन्धे स्वोन्नतेरपरिच्युतिः । यास्य सोक्ता प्रजासम्बन्धान्तरं नामतो गुणः ॥२०७ यथा कालायसो योगे स्वर्ण याति विवर्णताम् । न तथास्यान्यसम्बन्धे स्वगुणोत्कर्षविप्लवः ॥ २०८ किन्तु प्रजान्तरं स्वेन सम्बद्धं स्वगुणानयम् । प्रापयत्यचिरादेव लोहधातुं यथा रसः ॥ २०९ ततो महानयं धर्मप्रभावोद्योतको गुणः । येनायं स्वगुणरन्यानात्मसात्कर्तुमर्हति ॥ २१० असत्यस्मिन्गुणेऽन्यस्मात्प्राप्नुयात्स्वगुणच्युतिम् । सत्येवं गुणवत्तास्य निष्कृष्येत द्विजन्मनः ॥ २११ अतोऽतिबालविद्यादीन्नियोगान्दशधोदितान् । यथार्हमात्मसात्कुर्वन्द्विजः स्याल्लोकसम्मतः ॥२१२
जर या ब्राह्मणात हा मानार्हत्व गुण नसेल तर मान्य लोकानी हा आदरिला जाणार नाही व त्यामुळे त्याच्या योग्यपदाचा आणि आदरसत्कारादिकांचा लाभ न झाल्यामुळे त्याची आपल्या उच्च स्थानापासून च्युति होईल ॥ २०५ ।।।
म्हणून ब्राह्मणानी हा मानाहत्त्व गुण स्वतःच्या ठिकाणी यत्नपूर्वक स्थापन करावा. अर्थात् त्यानी आपले सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र वगैरे गुणसंपदा खूप वाढवावी. या सम्यग्ज्ञानादि गुणसम्पत्तीला यत्न असे नांव आहे म्हणून तो यत्न त्यानी केव्हाही सोडू नये ।। २०६ ।।
अन्य धर्माच्या लोकाशी जरी सम्बन्ध आला म्हणजे त्यांच्याशी एकत्र बसणे, विचार करणे वगैरे सम्बन्ध जरी असला तरीही आपल्या ज्ञानादिगुणांच्या उन्नतीपासून तो च्युत होत नाही असा याच्या ठिकाणी प्रजान्तरसंबन्ध हा गुण सांगितला आहे ॥ २०७॥
जसे काळ्या लोखंडाच्या संयोगाने सोने काळसर होते तसे अन्यधर्मीय लोकाशी संबन्ध आल्याने त्याच्या ज्ञानादि गुणांच्या उत्कर्षाचा नाश होत नाही ॥ २०८ ।।
पण जसा पारा लोखंडाला लौकरच आपल्या गुणानी युक्त करतो तसे हा ब्राह्मण इतर धर्मीय लोकाना आपल्याशी संबद्ध करून त्यांच्यात आपल्या गुणांची परिणति शीघ्र करतो ।। २०९ ।।
यास्तव याच्या ठिकाणी धर्मप्रभाव दाखविणारा हा मोठा गुण आहे व या गुणामुळे हा आपल्या गुणानी इतरधर्मीय लोकाना आपल्यासारखे करतो, आपल्या ताब्यात ठेवण्यास समर्थ होतो ।। २१० ॥
हा गुण जर याच्यात नसेल तर इतरांच्या प्रभावामुळे याच्या सम्यग्ज्ञानादि गुणांचा नाश होईल. असे झाले तर या ब्राह्मणाचीही गुणयुक्तता कमी होईल ।। २११ ।।
म्हणून जे अतिबालविद्यादिक दहा गुणाधिकार सांगितले आहेत ते यथायोग्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करून त्या गुणानी युक्त झाला म्हणजे हा द्विज सर्व लोकाकडून मान्यआदरणीय होईल ।। २१२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org