Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२-४३)
महापुराण
(४८५
क्षत्रियाः स्वार्थमुत्पाद्य येऽभूवन्परमर्षयः । ते महादेवशब्दाभिधेया माहात्म्ययोगतः ॥ ३५ आदिक्षत्रियवृत्तस्थाः पार्थिवा ये महान्वयाः। महत्त्वानुगमात्तेऽपि महादेवप्रथां गताः ॥ ३६ तद्देव्यश्च महादेव्यो महाभिजनयोगतः । महद्भिः परिणीतत्वात्प्रसूतेश्च महात्मनाम् ॥३७ इत्येवमास्थिते पक्षे जैनैरन्यमताश्रयी । यदि कश्चित्प्रतिब्रूयान्मिथ्यात्वोपहताशयः ॥ ३८ वयमेव महादेवा जगन्निस्तारका वयम् । नास्मादाप्तात्परोऽस्त्याप्तो मतं नास्मन्मतान्परम् ॥ ३९ इत्यत्र बमहे नेतत्सारं संसारवारिधेः । यः समुत्तरणोपायः स मार्गो जिनदेष्टितः ॥ ४० आप्तोऽर्हन्वीतदोषत्वात् आप्तंमन्यास्ततोऽपरे । तेषु वागात्मभाग्यातिशयानामविभावनात् ॥ ४१ वागाद्यतिशयोपेतः सार्वः सर्वार्थदगजिनः । स्यादाप्तः परमेष्ठी च परमात्मा सनातनः ॥ ४२ स वागतिशयो ज्ञेयो येनायं विभुरक्रमात् । वचसकेन दिव्येन प्रीणयत्यखिलां सभाम् ॥ ४३
जे क्षत्रिय स्वतःच्या आत्म्याचे स्वरूप जाणून महामुनि झाले, आपल्या माहात्म्यामुळे महादेव या शब्दाने वर्णन करण्यायोग्य आहेत त्यांना महादेव म्हणावे ॥ ३५ ।।
जे मोठ्या कुलात उत्पन्न झाले असे राजे आदिक्षत्रिय असे जे भगवान वृषभनाथ त्यानी सांगितलेल्या आचारांचे पालन करीत असतील तर ते देखील मोठेपणाचा संबंध झाल्यामुळे 'महादेव' या नांवाला-प्रसिद्धीला प्राप्त झाले आहेत ॥ ३६ ॥
त्या राजाच्या ज्या स्त्रिया त्या मोठ्या कुलात जन्मल्या असल्याने व मोठ्याशी विवाह झाल्याने व पुढे महापुरुषाना प्रसवणा-या असल्यामुळे त्याना महादेवी समजावे ॥ ३७ ॥
याप्रमाणे जैनानी वरील आपला पक्ष मांडला असता अन्यमताचा आश्रय करणारा कोणी मिथ्यात्वाने-खोट्या ज्ञानाने ज्याचे मन भरले आहे असा होऊन जर असे उलट बोलेल"आम्हीच महादेव आहोत, आम्हीच जगाला तारणारे आहोत व आमच्या आप्ताहून वेगळा कोणी आप्त नाही व आमच्या मताहून निराळे मतही नाही." असे बोलेल त्याला पुढील उत्तर आहे ।। ३८-३९ ।।
याविषयी आम्ही असे सांगतो. हे वरील त्याचे विवेचन सारयुक्त नाही. कारण संसारसमुद्रापासून तरून जाण्याचा जो उपाय तो जिनाने सांगितलेला मार्ग होय ॥ ४० ॥
त्या जिनेश्वराला आप्त म्हणतात- अर्हन म्हणतात व क्षुधा तृषादिक दोष नाहीसे झाल्यामुळे त्याला आप्त अर्हन् म्हणावे. या जिनेश्वराहून अन्य देव आप्त नाहीत पण ते आपणास आप्त म्हणतात. पण त्यांच्यात वाणी, आत्मा आणि विशिष्ट ऐश्वर्य यांचा काहीच निश्चय नाही ॥ ४१ ॥
जिनेश्वर वाणी आदिक अतिशयानी सहित आहेत. ते सर्वांचे हित करतात व सर्व पदार्थाना साक्षात् पाहतात. ते परमेष्ठी, परमात्मा, आणि सनातन पूर्वोपासून अविच्छिन्न चालत आलेले आहेत म्हणून ते जिनच आहेत. आप्त आहेत ॥ ४२ ॥
या जिनेश्वराच्या दिव्यवाणीमध्ये असा अतिशय आहे की तो आपल्या दिव्यवाणीने संपूर्ण सभेतील प्राण्याना एकदम आनंदित करतो ।। ४३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org