Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२-१२३)
महापुराण
(४९५
धर्मो रक्षत्यपायेभ्यो धर्मोऽभीष्टफलप्रदः । धर्मः श्रेयस्करोऽमत्र धर्मेणेहाभिनन्दथुः ॥ ११६ तस्माद्धर्मंकतानः सन्कुर्यादेष्यत्प्रतिक्रियाम् । एवं हि रक्षितोऽपायात् भवेदात्मा भवान्तरे ॥ ११७ बह्वपायमिदं राज्यं त्याज्यमेव मनस्विनाम् । यत्र पुत्राः ससोदर्या वैरायन्ते निरन्तरम् ॥ ११८ अपि चात्र मनःखेवबहुले का सुखासिका । मनसो निर्वृति सौख्यमुशन्तीह विचक्षणाः ॥ ११९ राज्ये न सुखलेशोऽपि दुरन्ते दुरितावहे । सर्वतः शङ्कमानस्य प्रत्युतात्रासुखं महत् ॥ १२० ततो राज्यमिदं हेयमपथ्यमिव भेषजम् । उपादेयं तु विद्भिस्तपः पथ्यमिवाशनम् ।। १२१ इति प्रागेव निविद्य राज्ये भोगं त्यजेत्सुधीः । तथा त्यक्तुमशक्तोऽन्ते त्यजेद्राज्यपरिच्छदम् ॥१२२ कालज्ञानिभिरादिष्टे निर्णीते स्वयमेव वा । जीवितान्ते तनुत्यागमतिं दध्यादतः सुधीः ॥ १२३
.................................
धर्म हा संकटातून जीवाचे रक्षण करतो व तो आपणास आवडत्या वस्तु देणारा आहे व हा धर्म परलोकी कल्याण करणारा आहे. या धर्मानेच या लोकात आनन्द-सुख प्राप्त होते ॥ ११६ ।।
म्हणून धर्माचरणात तत्पर होऊन पुढे येणाऱ्या आपत्तीचा-संकटाचा नाश करावा. याप्रमाणे वागल्याने परलोकात संकटापासून जीवाचे रक्षण होते ॥ ११७ ।।
हे राज्य अनेक अपायानी भरलेले असल्यामुळे बुद्धिमंतानी त्यागलेच पाहिजे. कारण या राज्यात पुत्र व भाऊ नेहमी राजाचे वैरी होतात ॥ ११८ ।।
व हे राज्य मनाला फार खेद देणारे आहे. म्हणून यात सुखाने राहणे कसे शक्य आहे ? शहाणे लोक मनाला निराकुलता प्राप्त होणे यालाच सुख म्हणतात ॥ ११९ ॥
हे राज्य ज्याचा शेवट वाईट आहे व पाप उत्पन्न करणारा आहे म्हणून यात थोडेसे देखिल सुख नाही. कारण या राज्यात शंका घेणान्याला सर्वापासून नेहमी मोठे असुख-दुःखच आहे ॥ १२० ॥
म्हणून हे राज्य हितकर नसलेल्या औषधाप्रमाणे त्याज्य आहे व पथ्य अशा अन्नाप्रमाणे विद्वानानी तपाचा आश्रय करावा ॥ १२१ ॥
म्हणून आधीच कंटाळून सुज्ञ मानवाने या राज्याचा त्याग करावा व त्याचा त्याग करण्यास असमर्थ असलेल्या सुज्ञाने अन्तसमयी त्या राज्याच्या साधनांचा त्याग करणे हितकर होईल ॥ १२२ ।।
कालाचे जाणते अशा ज्योतिषी लोकानी सांगितलेल्या किंवा स्वतः आपल्या बुद्धीने निर्णय घेतलेल्या जीविताच्या अन्तसमयी शरीराचा त्याग करण्याचा सुज्ञराजाने विचार करावा ॥ १२३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org