Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४९४)
महापुराण
(४२-१०८
यः समग्रेर्गुणैरेभिर्जानादिभिरलङकृतः । कि तस्य कृतकृत्यस्य परद्रव्योपसर्पणः ॥ १०८ एष संसारिदृष्टान्तो व्यतिरेकेण साधयेत् । परमात्मानमात्मानं प्रभुमप्रतिशासनम् ॥ १०९ त्रिभिनिदर्शनैरेभिराविष्कृतमहोदयः । स आप्तस्तन्मते धोरराषया मतिरात्मनः ॥ ११० एवं हि क्षत्रियश्रेष्ठो भवेदृष्टपरम्परः । मतान्तरेषु दौःस्थित्यं भावयन्नुपपत्तिभिः ॥ १११ दिगन्तरेभ्यो व्यावं प्रबुद्धां मतिमात्मनः । सन्मार्गे स्थापयन्नेवं कुर्यान्मत्यनुपालनम् ॥ ११२ आत्रिकामत्रिकापायात्परिरक्षणमात्मनः । आत्मानुपालनं नाम तदिदानी विवृण्महे ॥ ११३ आत्रिकापायसंरक्षा सुप्रतीतैव धीमताम् । विषशस्त्राद्यपायानां परिरक्षणलक्षणा ॥ ११४ अत आमुत्रिकापायरक्षाविधिरनूद्यते । तद्रक्षणं च धर्मेण धर्मो ह्यापत्प्रतिक्रिया ॥ ११५
---------
हा सिद्धपरमात्मा संपूर्ण ज्ञानादिकगुणानी भूषित झालेला असतो. म्हणून तो कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याला अन्यद्रव्याची प्राप्ति करून घेण्याने कोणते प्रयोजन सिद्ध करावयाचे असते ? अर्थात कोणतेच प्रयोजन सिद्ध करण्याचे उरले नाही ॥ १०८ ॥
हा संसारीजीवाचा दृष्टान्त व्यतिरेक रूपाने-निषेधरूपाने आहे व हा दृष्टान्त जो प्रभु आहे ज्याच्यावर कोणाचे शासन चालत नाही अशा परमात्मारूप आत्म्याची सिद्धि करून देत आहे ॥ १०९॥
या तीन उदाहरणानी ज्याचा मोठा उत्कृष्टपणा प्रकट केला आहे असा जो आत्मा त्याला आप्त म्हणतात व त्याच्या मतामध्ये विद्वानानी आपली बुद्धि ठेवावी, विश्वास ठेवावा ॥ ११०।।
याप्रमाणे ज्याने सर्व परम्परा पाहिली आहे व वरील युक्तीनी अन्यमतातील दुष्टपणाचा तो विचार करतो ।। १११ ॥
तो क्षत्रियश्रेष्ठ विद्वान् आपल्या चतुरबुद्धीला अन्य उपदेशापासून वेगळी करून सन्मार्गात स्थापन करतो व अशा रीतीने आपल्या मतीचे पालन-रक्षण करतो ॥ ११२ ॥
या लोकासंबंधी व परलोकासंबंधी अपायापासून आत्म्याचे रक्षण करणे ते आत्मानुपालन होय व त्याचे आता आम्ही विवेचन करतो ॥ ११३ ।।
इहलोकसंबंधी अपायापासून रक्षण करणे हे सर्व विद्वानांना चांगलेच माहीत आहे. विष, शस्त्र, आदिक अपायापासून आपले रक्षण करणे याला आत्म्याचे इहलोकसंबंधी रक्षण करणे म्हणतात व हे रक्षण करणे बुद्धिमान लोकांना परिचित आहेच ।। ११४ ॥
म्हणून परलोकी उत्पन्न होणाऱ्या अपायापासून स्वतःचे रक्षण कसे करून घ्यावे याचा विधि मी आता सांगतो. परलोकी अपायापासून रक्षण धर्माने होते व धर्म ही आपत्ति दूर करण्याचा उपाय आहे ॥ ११५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org