Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४८६)
महापुराण
(४२-४४
तथात्मातिशयोऽप्यस्य दोषावरणसंक्षयात् । अनन्तज्ञानदृग्वीर्यसुखातिशयसनिधिः ॥ ४४ प्रातिहार्यमयी भूतिरुद्भतिश्च सभावनः । गणाश्च द्वादशेत्येष स्याद्धाग्यातिशयोऽर्हतः ॥ ४५ वागाद्यतिशयरेभिरन्वितोऽनन्यगोचरैः । भगवान्निष्ठितार्थोऽर्हन्परमेष्ठी जगद्गुरुः ॥ ४६ न च तादृग्विधः कश्चित्पुमानस्ति मतान्तरे । ततोऽन्ययोगव्यावृत्त्या सिद्धमाप्तत्वमर्हति ॥ ४७ इत्याप्तानुमतं क्षात्रमिमं धर्ममनुस्मरन् । मतान्तरादनाप्तीयात्स्वान्वयं विनिवर्तयेत् ॥ ४८ वृत्तादनात्मनीनाद्धीः स्यादेवमनुरक्षिता । तद्रक्षणाच्च संरक्षेत्क्षत्रियः क्षितिमक्षताम् ॥ ४९ उक्तस्यैवार्थतत्वस्य भूयोऽप्याविश्चिकीर्षया। निदर्शनानि त्रीण्यत्र वक्ष्यामस्तान्यनुक्रमात् ॥ ५० व्यक्तये पुरुषार्थस्य स्यात्पूरुषनिदर्शनम् । तथा निगलदृष्टान्तः स संसारिनिदर्शनः ॥ ५१
याचप्रमाणे त्या जिनेश्वराच्या आत्म्यातही अतिशय (माहात्म्य ) उत्पन्न होतो. त्याचे कारण हे की, रागादिकदोष व ज्ञानावरणादिक घातिकर्मे यांचा पूर्ण क्षय झाल्यामुळे अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तशक्ति, अनन्तसुख यांची प्राप्ति होते हा जिनेशाच्या आत्म्यात अतिशय उत्पन्न होतो।। ४४ ॥
___ याचप्रमाणे अशोकवृक्ष, देवाकडून पुष्प वृष्टि होणे आदिक आठ प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होणे, समवसरणरचना होणे, बारा गण अर्थात् बारा सभा होणे हे सर्व जिनभगवन्ताचे भाग्यातिशय आहेत ॥ ४५ ॥
इतर कोणालाही प्राप्त न होणारे असे दिव्यवाणी वगैरे गुणात अतिशय हे या जिनेश्वराला प्राप्त झालेले असतात म्हणून हे अरहन्त कृतकृत्य झाले आहेत व परमेष्ठी आणि जगाचे गुरु आहेत ।। ४६ ।।।
___अन्य कोणत्याही मतात अरिहंतासारखा पुरुष झाला नाही म्हणून आप्तपणा दुसऱ्या कोणातही संभवत नाही यास्तव अन्य सम्बन्धाची व्यावृत्ति झाल्याने तो आप्तपणा अरहंतामध्येच सिद्ध होतो ॥ ४७ ॥
याप्रमाणे आप्त अर्थात् श्रीजिनेश्वर त्यानी सांगितलेल्या या क्षात्रधर्माचे स्मरण करून क्षत्रियांनी आप्त नसलेल्या अशा पुरुषानी सांगितलेल्या अन्य मतापासून आपल्या वंशाला वेमळे केले पाहिजे ॥ ४८ ॥
ज्यापासून आत्म्याचे हित होत नाही अशा आचरणापासून आपल्या बुद्धीला दूर ठेवून तिचे रक्षण करावे व बुद्धीचे त्याने रक्षण केले म्हणजे तो क्षत्रिय या अखण्ड पृथ्वीचे अखण्ड रक्षण करू शकेल ।। ४९ ॥
वर सांगितलेल्या पदार्थाचे स्वरूप पुनः चांगले स्पष्ट करण्याकरिता येथे आम्ही अनुक्रमाने तीन उदाहरणे सांगतो ॥ ५० ॥
आपला पुरुषार्थ व्यक्त करण्याकरिता पुरुषाचा पहिला दृष्टान्त आहे आणि दुसरा दृष्टान्त निंगलाचा-बेडीचा आहे व तिसरा संसारिजीवाचा आहे ॥ ५१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org