________________
४२-७७)
महापुराण
(४८९
प्राप्तातीन्द्रियसौन्दर्यो नेच्छेत्स्नानादिसक्रियाम् । स्नातको नित्यशुद्धात्मा बहिरन्तर्मलक्षयात् ॥७० अतीन्द्रियात्मदेहश्च नाहारादीनपेक्षते । क्षुद्व्याधिविषशस्त्रादिबाधातीततनुः स वै ॥ ७१ भवेच्च न तपःकामो वीतजातिजरामतिः । नावासान्तरमन्विच्छेदात्मावासे च सुस्थितः ॥ ७२ स एवमखिलर्दोषैर्मुक्तो युक्तोऽखिलैर्गुणैः । परमात्मा परञ्ज्योतिः परमेष्ठीति गीयते ॥ ७३ कामरूपित्वमाप्तस्य लक्षणं चेन्न साम्प्रतम् । सरागः कामरूपी स्यात् अकृतार्थश्च सोऽञ्जसा ॥७४ प्रकृतिस्थेन रूपेण प्राप्तुं यो नालमीप्सितम् । स वैकृतेन रूपेण कामरूपी कथं सुखी ॥ ७५
इति पुरुषनिदर्शनम्।। निगलस्थो यथा नेष्टं गन्तुं देशमलं तराम् । कर्मबन्धनबद्धोऽपि नेष्टं धाम तययात् ॥ ७६ यह बन्धनान्मुक्तः परं स्वातन्त्र्यमृच्छति । कर्मबन्धनमुक्तोऽपि तथोपार्छत्स्वतन्त्रताम् ॥ ७७
याला अतीन्द्रियसौन्दर्य प्राप्त झालेले असते. म्हणन याला स्नान, अलंकार वगैरेची अपेक्षा असत नाही. कारण याच्या बाह्य व अन्तरंग दोन्ही प्रकारच्या मलांचा नाश झाला आहे म्हणून हा नित्य शुद्धात्मा स्नातक झाला आहे ।। ७० ॥
या परमात्म्याचा आत्माच शरीर आहे म्हणून याला आहारादिकांची अपेक्षा नसते. त्याचे शरीर भूक, तहान, रोग, विष, शस्त्रादिकांच्या बाधांच्या पलीकडे गेले आहे. त्याला आहारादिकांची आवश्यकता मुळीच नसते ॥ ७१ ॥
याचप्रमाणे त्याला तप करण्याची आवश्यकता नसते, कारण तो जन्मजरामरणानीं रहित असतो. तो परमात्मा नेहमी आत्मारूपी घरातच उत्तम रीतीने राहिलेला असतो. म्हणून त्याला दुसऱ्या घराची आवश्यकता वाटत नाहीच ।। ७२ ॥
याप्रमाणे संपूर्ण दोषांनी रहित झालेला व सर्व गुणांनी पूर्ण भरलेला असा तो आत्मा परमात्मा, परंज्योति व परमेष्ठी अशा नांवानी वर्णिला जातो॥ ७३ ।।
कामरूपित्व- इच्छेला वाटेल तसे रूप घेणे हे आप्ताचे सर्वज्ञाचे लक्षण मानणे योग्य नाही. कारण जो रागयुक्त आहे तो कामरूपी-नानारूपे धारण करतो व तो कृतकृत्य होत नाही ॥ ७४ ॥
जो आपल्या मूळच्या रूपाने आपले इच्छित प्राप्त करून घेण्यास समर्थ नाही तो कामरूपी जीव विकृतरूपाने कसा सुखी होईल ? याप्रमाणे पुरुषदृष्टान्ताचे वर्णन झाले ॥ ७५ ॥
बेड्या ज्याला घातलेल्या आहेत असा मनुष्य जसा इष्टस्थानी जाऊ शकत नाही तसा कर्मबन्धाने जखडलेला जीव आपले इष्टस्थानी-मुक्तिस्थानी जाऊ शकत नाही ॥ ७६ ॥
जसे बन्धनापासून रहित झालेला मनुष्य उत्तम स्वातन्त्र्य मिळवितो तसे कर्मबन्धनापासून सुटलेला जीवही तसाच स्वतन्त्र होतो ॥ ७७ ॥ म. ६२
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org