Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४८८)
महापुराण
दोषान्पश्यंश्च जात्यादीन्देहार्तस्तज्जिहासया । प्रेक्षाकारी तपः कर्तुं प्रयस्यति यदा तदा ।। ६१ स्वीकुर्वन्द्रियावासं सुखमायुश्च तद्गतम् । आवासान्तरमन्विच्छेत्प्रेक्षमाणः प्रणश्वरम् ॥ ६२ यस्त्वतीन्द्रियविज्ञानदृग्वीर्यसुखसन्ततिः । शरीरावाससौन्दर्यैः स्वात्मभूतैरधिष्ठितः ।। ६३ तस्योक्तदोषसंस्पर्शो भवेन्नैव कदाचन । तद्वानाप्तस्ततो ज्ञेयः स्यादनाप्तस्त्वतद्गुणः ॥ ६४ स्फुटीकरणमस्यैव वाक्यार्थस्याधुनोच्यते । यतो नाविष्कृतं तत्त्वं तत्त्वतो नावबुध्यते ॥ ६५ तद्यथातीन्द्रियज्ञानः शास्त्रार्थं न परं श्रयेत् । शास्तास्वयं त्रिकालज्ञः केवलामललोचनः ॥ ६६ तथातीन्द्रियदृग्नार्थी स्यादपूर्वार्थदर्शने । तेनादृष्टं न वै किञ्चिद्युगपद्विश्वदृश्वना ॥ ६७ क्षायिकानन्तवीर्यश्च नान्यसाचिव्यमीक्षते । कृतकृत्यः स्वयं प्राप्तलोकाग्रशिखरालयः ॥ ६८ अतीन्द्रियसुखोऽप्यात्मा स्याद्भोगैरुत्सुको न वै । भोग्यवस्तुगता चिन्ता जायते नास्य जात्वतः ॥ ६९
वारंवार जन्मणे व मरणे वगैरे दोष पाहून देहामुळे दुःखित झालेला मानव त्या देहाचा त्याग करण्याची जेव्हा इच्छा करतो तेव्हा बुद्धिपूर्वक कार्याचा तो विचार करतो व त्यावेळी तपश्चरण करण्यासाठी प्रयत्न करतो. तेव्हा इन्द्रियापासून होणाऱ्या सुखाला साधन असलेले घर आपले आहे असे तो मानतो. पण त्यातील सुख व आयु नाश पावणारे आहेत असे पाहून दुसऱ्या स्थलाची इच्छा करतो ।। ६१-६२ ॥
(४२-६१
पण ज्याच्या ठिकाणी ज्ञान, दर्शन, वीर्य आणि सुख या गुणांचा समूह अतीन्द्रिय आहे व आत्माच ज्याचे शरीर, गृह व सौन्दर्य आहे, त्याला वर वर्णिलेल्या दोषांचा स्पर्श केव्हाही होत नाही. अतीन्द्रिय अशा विज्ञानादि गुणानी युक्त असलेला तो आत्मा आप्त होय. पण हे गुण ज्याच्या ठिकाणी नाहीत तो आप्त नाही ।। ६३-६४॥
आतां याच वाक्याच्या अर्थाची फोड करून आम्ही वर्णन करतो. कारण जोपर्यन्त स्पष्टपणे न सांगितलेले तत्त्व यथार्थरूपाने जाणले जात नाही ॥ ६५ ॥
ज्याला अतीन्द्रिय ज्ञान झाले आहे तो दुसऱ्यानी सांगितलेल्या शास्त्रार्थाचा मुळीच आश्रय घेत नाही कारण त्याचा केवलज्ञानरूपी डोळा अतिशय निर्मळ असतो. तो त्रिकालातील वस्तूंचे स्वरूप स्वत: जाणत असतो व स्वतः तो शास्त्र असतो शास्त्राची रचना करणारा असतो ॥ ६६ ॥
तसे तो अतीन्द्रिय नेत्राना धारण करणारा शास्त्र पूर्वी न पाहिलेली वस्तु पाहण्यास दुसऱ्याची गरज बाळगीत नाही. कारण तो एकदम सगळे विश्व जाणतो व पाहतो त्याने न पाहिलेले असे कांहीं नाहींच ।। ६७ ।।
त्या सर्वज्ञाच्या ठिकाणी क्षायिक अनन्त शक्ति आहे. म्हणून तो दुसऱ्या मदतीची अपेक्षा करीत नाही आणि तो स्वतः लोकाचे अग्रशिरवर असे उत्कृष्ट स्थान प्राप्त करून घेतो ॥ ६८ ॥
हा अतीन्द्रियसुखी आत्मा विषयभोगानी उत्कंठित झालेला नसतो म्हणून याला भोग्यवस्तूची प्राप्ति केव्हा होईल मशी चिन्ता केव्हाही उत्पन्न होत नाही ।। ६९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org