Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४९०)
महापुराण
(४२-७८
निगलस्थो विपाशश्च स एवैकः पुमान्यथा । कर्मबद्धो विमुक्तश्च स एवात्मा मतस्तथा ॥ ७८
इति निगलदर्शनम्। मुक्तेतरात्मनोळक्त्यै द्वयमेतन्निदर्शनम् । तदृढीकरणायेष्टं सत्संसारिनिदर्शनम् ॥ ७९ यत्संसारिणमात्मानमुरीकृत्यान्यतन्त्रताम् । तस्योपदेशे मुक्तस्य स्वातन्त्र्योपनिदर्शनम् ॥ ८० मतः संसारिदृष्टान्तः सोऽयमाप्तीयदर्शने । मुक्तात्मनां भवेदेवं स्वातन्त्र्यं प्रकटीकृतम् ॥ ८१ तद्यथा संसृतौ देही न स्वतन्त्रः कथञ्चन । कर्मबन्धवशीभावाज्जीवत्यन्याश्रितश्च यत् ॥ ८२ ततः परप्रधानत्वमस्यैतत्प्रतिपादितम् । स्याच्चलत्वं च पुंसोऽस्य वेदनासहनादिभिः ॥ ८३ वेदनाव्याकुलीभावश्चलत्वमिति लक्ष्यताम् । क्षयकत्वं च देवादिभवे लब्धद्धिसडक्षयात् ॥ ८४ बाध्यत्वं ताडनानिष्टवचनप्राप्तिरस्य वै । अन्तवच्चास्य विज्ञानमक्षबोषः परिक्षयी ॥ ८५
जसे एकच पुरुष बेड्या ठोकलेला व बन्धनरहितहि होतो तसे तोच आत्मा कर्मबद्ध व विमुक्त-कर्मरहित होतो असे मानले जाते. याप्रमाणे बेडीचा दृष्टान्त दाखविला ॥ ७८ ।।
मुक्तजीव व इतर कर्मबद्धजीव यांचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी हे दोन दृष्टान्त सांगितले व यानाच दृढ करण्यासाठी संसारीजीवाचा दृष्टान्त सांगितला आहे ॥ ७९ ॥
संसारीजीवाला उद्देशून जे त्यांच्या परतन्त्रतेचे वर्णन आहे ते परतन्त्रतावर्णन मुक्त जीवाच्या स्वतन्त्रतेचे उदाहरण होते. भावार्थ- संसारीजीवाच्या परतन्त्रतेचे वर्णन करण्याने मुक्तजीवाच्या स्वतन्त्रतेचे वर्णन आपोआप होते. कारण संसारीजीवाच्या परतन्त्रतेचा अभाव होणे म्हणजे मुक्तजीवाची स्वतन्त्रता होय ॥ ८० ॥
तोच हा संसारी जीवाचा दृष्टान्त आप्त-सर्वज्ञ जिनेश्वराच्या दर्शनात-मतांत सांगितला आहे. या दृष्टान्तावरून मुक्तजीवाचे स्वरूप संसारीजीवाच्या स्वरूपाहून वेगळे असल्यामुळे मुक्तांचे स्वातन्त्र्य प्रकट केले जाते ॥ ८१ ॥
___ या संसारात देहधारी प्राणी- संसारी कोणत्याही प्रकाराने स्वतन्त्र नाही. कारण हा कर्मबंधाच्या अधीन झाला आहे व त्यामुळे तो अन्याश्रित-कर्माश्रित होऊन जगत आहे ।। ८२ ।।
म्हणून या संसारीजीवाला कर्माश्रित होऊन-पराश्रित होऊन जगावे लागते असे सांगितले आहे व हा संसारी आत्मा चल आहे कारण याला वेदनादिक सहन कराव्या लागत आहेत. वेदनामुळे चंचलता याच्या ठिकाणी उत्पन्न होते ॥ ८३ ॥
वेदनानी व्याकुळ होणे याला चलत्व म्हटले आहे व या संसारीजीवाच्या ठिकाणी क्षयकत्वही आहे कारण देवादिकांच्या भवात प्राप्त झालेल्या ऋद्धीचा क्षय होत असल्यामुळे याला क्षयकत्वही आहे ।। ८४ ।।
___ या संसारीजीवाला बाध्यत्वहि आहे अर्थात् ठोकला जाणे, अप्रिय भाषण वगैरेनी बाध्यता आहे हे प्रत्यक्ष दिसते व या संसारीजीवाचे ज्ञान-इन्द्रियज्ञान नाशवंतही आहे म्हणून ते अन्तवान् आहे ।। ८५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org