Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२-९३)
महापुराण
(४९१
अन्तवदर्शनं चास्य स्यादैन्द्रियकदर्शनम् । वीर्य च तद्विधं तस्य शरीरबलमल्पकम् ॥ ८६ स्यादस्य सुखमप्येवम्प्रायमिन्द्रियगोचरम् । रजस्वलत्वमप्यस्य स्यात्काशः कलङ्कनम् ॥ ८७ भवेत्कर्ममलावेशादत एव मलीमसः । छेद्यत्वं चास्य गात्राणां द्विधाभावेन खण्डनम् ॥८८ मुद्गराधभिघातेन भेद्यत्वं स्याद्विदारणम् । जरावत्वं वयोहानिः प्राणत्यागो मतिर्मता ॥ ८९ प्रमेयत्वं परिच्छिन्नदेहमात्रावरुद्धता । गर्भवासोऽर्भकत्वेन जनन्युदरदुःस्थितिः ॥ ९० अथवा कर्मनोकर्मगर्भेऽस्य परिवर्तनम् । गर्भवासो विलीनत्वं स्याद्देहान्तरसङक्रमः ॥ ९१ क्षभितत्वं च संक्षोभः क्रोषाधाविष्टचेतसः । भवेद्विविधयोगोऽस्य नानायोनिष सङक्रमः ॥ ९२ संसारावास एषोऽस्य चतुर्गतिविवर्तनम् । प्रतिजन्मान्यथाभावो ज्ञानादीनामसिद्धता ॥ ९३
याचे दर्शन- इन्द्रियापासून होणारे दर्शन- वस्तूचे सामान्य अवलोकन तेही अन्तवत्नाशाने युक्त आहे व त्याचे वीर्यही अल्प आहे व नाशवंत आहे ।। ८६ ।।
याचप्रमाणे या संसारीजीवाचे इन्द्रियानी अनुभवले जाणारे सुख देखिल इन्द्रिय बलाप्रमाणे अल्प आहे आणि कर्माच्या अंशानी ते मळकट व कलंकित आहे ।। ८७ ॥
म्हणूनच हा आत्मा कर्ममलाच्या आवेशाने मळकट होतो. कर्ममलाने अत्यन्त व्याप्त झाल्याने मळकट होतो. ते त्याचे चैतन्यस्वरूप त्यामुळे दिसेनासे होते. याचप्रमाणे हा आत्मा कर्मानी मळकट झाल्यामुळे याच्या शरीराचे दोन तुकडे करता येत असल्यामुळे याच्या ठिकाणी छेद्यत्वही आहे- तुकडे होण्याची योग्यता आहे ।। ८८ ।।
मदगर, तरवार आदिकानी फोडणे हे देखिल याच्या अवयवात आहे यालाच विदारणही म्हणतात आणि जरावत्त्व म्हणजे वयाचा नाश होणे हेही पण आहे व त्यामुळे प्राण त्याग करणे- हा देह सोडून अन्य देह घेण्यासाठी जाणे हेही याच्या ठिकाणी आहे ॥ ८९ ॥
हा संसारी आत्मा प्रमेयत्वाला धारण करीत आहे. अर्थात् काही विशिष्ट लांबी, रुंदी, उंची याला धारण करणारा असा जो देह त्यात हा अडकून पडला आहे व बालक होऊन मातेच्या पोटात दुःखाने राहणे हे अर्थात् गर्भावासही याला प्राप्त झाला आहे. अथवा कर्म आणि नो कर्मरूप गर्भात फिरणे हेही याला प्राप्त होते अर्थात् या आत्म्याला संसारात भ्रमण करावे लागत आहे व हा संसारी आत्मा विलीनत्वधर्माला स्वभावाला धारण करीत आहे अर्थात् दुसऱ्या देहात प्रवेश करणे या स्वभावाला हा धारण करीत आहे ॥९०-९१ ॥
क्रोध, मान, माया, लोभादिक विकारानी युक्त होऊन अन्तःकरणाचा क्षोभ होणे या विकारानी अन्तःकरण भडकणे याला संक्षोभ म्हणतात. हा क्षोभ संसारी जीवात आढळतो व त्यामुळे अनेकप्रकारच्या पशुपक्ष्यादिकयोनीमध्ये तो जन्म घेतो. याला विविधयोग म्हणतात ॥ ९२ ॥
देवगति, मनुष्यगति, पशुगति व नरकगति या चार गतीमध्ये फिरणे याला संसारावास म्हणतात व प्रत्येक जन्मामध्ये ज्ञानादिगुणांची प्राप्ति न होणे याला असिद्धि म्हणतात ॥ ९३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org