Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२-६०)
महापुराण
(४८७
ज्ञेयः पुरुषदृष्टान्तो नाम मुक्तेतरात्मनोः । यनिदर्शनभावेन मुक्त्यमुक्त्योः समर्थनम् ॥ ५२ संसारीन्द्रियविज्ञानदृग्वीर्यसुखचारुताः । तन्वावासौ च निर्वेष्टुं यतते सुखलिप्सया ॥ ५३ मुक्तस्तु न तथा किन्तु गणरुक्तैरतीन्द्रियैः । परं सौख्यं स्वसाद्भुतमनुभुक्ते निरन्तरम् ॥ ५४ तन्द्रियिकविज्ञानः स्वल्पज्ञानतया स्वयम् । परं शास्त्रोपयोगाय श्रयति ज्ञानचिन्तकम् ॥ ५५ तथैन्द्रियकदृकशक्तिरात्मार्वाग्भागदर्शनः । अर्थानां विप्रकृष्टानां भवेत्सन्दर्शनोत्सुकः ॥ ५६ तथैन्द्रियकवीर्यश्च सहायापेक्षयप्सितम् । कार्य धटयितुं वाञ्छेत्स्वयं तत्साधनाक्षमः ॥ ५७ तथेन्द्रियसुखी कामभोगरत्यन्तमुन्मनाः । वाञ्छेत्सुखं पराधीनमिन्द्रियार्थानुतर्षतः ॥ ५८ तथन्द्रियकसौन्दर्यः स्नानमाल्यानुलेपनैः । विभूषणश्च सौन्वयं संस्कर्तुमभिलष्यति ॥ ५९ दोषधातुमलस्थानं देहमैन्द्रियकं वहन् । पुमान्विष्वाणभैषज्यतद्रक्षास्वाकुलो भवेत् ॥ ६०
___ ज्या उदाहरणाने मुक्तात्मा व अमुक्तात्मा म्हणजे बद्ध झालेला आत्मा याच्या मुक्तीचे-मोक्षाचे व बंधाचे समर्थन करता येते त्याला पुरुष-दृष्टान्त म्हणावे ॥ ५२ ।।
संसारी पुरुष सुख मिळविण्याच्या इच्छेने इन्द्रियापासून होणारे ज्ञान, इन्द्रियापासून होणारे दर्शन, इन्द्रियाची शक्ति, इन्द्रियाचे सुख, इन्द्रियाचे सौन्दर्य, शरीर आणि घर यांचा अनुभव घेण्यासाठी यत्न करीत असतो ।। ५३ ।।।
परंतु मुक्त तसा नसतो. तो ज्याचे वर्णन पूर्वी केले आहे अशा अतीन्द्रिय अनन्तज्ञान, अनन्तदर्शन, अनन्तसुख व अनन्तशक्ति अशा अतीन्द्रिय गुणानी उत्कृष्ट सुख जे स्वतःपासूनच उत्पन्न होते व त्याचा तो निरन्तर अनुभव घेतो ।। ५४ ।।
इन्द्रियापासून होणान्या ज्ञानाने युक्त असा मनुष्य स्वतः अल्पज्ञानी असल्यामुळे शास्त्राचे ज्ञान व्हावे म्हणून शास्त्रज्ञान असलेच्या दुसन्या पुरुषाचा आश्रय घेतो ।। ५५ ।।
तसेच इन्द्रियाच्या योगाने पदार्थ पाहण्याची शक्ति ज्याला आहे असा मनुष्य पदार्थाचा अलिकडचा भाग पाहतो व अशा त्या मानवाला दूरचे जे पदार्थ आहेत ते पाहावेत अशी उत्सुकता उत्पन्न होते ॥ ५६ ॥
___ज्याला इन्द्रियासंबंधी सामर्थ्य प्राप्त झाले आहे असा मनुष्य दुस-याच्या सहाय्याची अपेक्षा ठेवतो. कारण स्वतः ते कार्य सिद्ध करण्यास तो समर्थ असत नाही ।। ५७ ॥
___याचप्रमाणे इन्द्रियापासून उत्पन्न होणान्या सुखाने युक्त असलेला तो मनुष्य काम व भोगासाठी अत्यन्त उत्कंठिन असतो. इन्द्रियानी उपभोगण्याला योग्य अशा पदार्थांची त्याला तहान लागलेलो असते व त्यामुळे तो पराधीन सुखाची इच्छा करतो ।। ५८ ।।
तसेच इन्द्रियाच्या सौन्दर्याने युक्त असलेला पुरुष स्नान करणे, पुष्प, मालादिक धारण करणे, अंगाला उटी लावणे व इतर सुवर्णादिकाच्या अलंकारानी आपल्या सौन्दर्यावर तो संस्कार करण्याची अभिलाषा करतो ।। ५९ ।।
__ वातपित्तकफादिक दोष, रक्तादिक धातु आणि मलमूत्रादिकांचे स्थान असलेल्या इन्द्रियानी युक्त अशा देहाला धारण करणारा पुरुष अन्न व औषधानी त्या देहाचे रक्षण करण्यात व्याकुळ झालेला असतो ॥ ६० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org