________________
४८४)
महापुराण
(४२-२८
अक्षत्रियाश्च वृत्तस्थाः क्षत्रिया एव दीक्षिताः। ततो रत्नत्रयायत्तजन्मना तेऽपि तद्गुणाः ॥ २८ ततः स्थितमिदं जैनान्मतादन्यमतस्थिताः । क्षत्रियाणां न शेषादिप्रदानेऽधिकृता इति ॥ २९ कुलानुपालने यत्नमतः कुर्वन्तु पार्थिवाः । अन्यधान्यः प्रतार्येरन् पुराणाभासदेशनात् ॥ ३० कुलानुपालनं प्रोक्तं वक्ष्ये मत्यनुपालनम् । मतिहिताहितज्ञानमात्रिकामुष्मिकार्ययोः ॥ ३१ तत्पालनं कथं स्याच्चेदविद्यापरिवर्जनात् । मिथ्याज्ञानमविद्या स्यादतत्त्वे तत्त्वभावना ॥ ३२ आप्तोपझं भवेत्तत्त्वमाप्तो दोषावृतिक्षयात् । तस्मात्तन्मतमभ्यस्येन्मनोमलमपासितुम् ॥ ३३ राजविद्यापरिज्ञानादेहिकेर्थे दृढामतिः । धर्मशास्त्रपरिज्ञानान्मतिर्लोकद्वयाश्रिता ॥ ३४
जे क्षत्रिय नाहीत असे जैनसाधु मुनिचारित्र धारण करणारे असल्यामुळे ते देखिल दीक्षा घेतल्यामुळे क्षत्रियच समजावेत. कारण रत्नत्रयाच्या स्वाधीन त्यांचा जन्म असल्यामुळे ते मुनिराज देखिल राजाप्रमाणे क्षत्रियच समजावेत. कारण ते देखिल क्षत्रियाच्या गुणांचे धारक होत ॥ २८ ॥
___ यामुळे जैनमताहून भिन्न मतात असलेले लोक क्षत्रियाना प्रसाद देणे, शेषा देणे वगैरेमध्ये अधिकारी नाहीत हे सिद्ध झाले ॥ २९ ॥
यास्तव राजानी आपल्या कुलानुपालनाविषयी यत्न करावा. तो जर त्यानी केला नाही तर ते अन्यमतातील लोकाकडून पुराणाभासाच्या उपदेशाने फसविले जातील ॥ ३० ॥
कुलानुपालनाचे हे वर्णन केले. आता मत्यनुपालन मी सांगतो. मति म्हणजे इहलोक व परलोकसंबंधी वस्तुविषयी आपल्याला हितकारक वस्तु कोणती व अहितकारक वस्तु कोणती याचे ज्ञान होणे हे होय ।। ३१ ॥
त्या मतीचे रक्षण कसे होईल ? या प्रश्नाचे उत्तर अविद्येचा त्याग केल्याने मतिपालन होते असे आहे व मिथ्याज्ञानाला अविद्या म्हणतात. अर्थात् कोणतीही वस्तु ज्या स्वरूपाची नाही ती त्या स्वरूपाची आहे असे ज्ञान होणे ती अविद्या होय. जसे अंधारात पडलेली दोरी सर्प आहे असे वाटणे. शरीर आत्मा नाही असे असता त्याविषयी शरीर म्हणजे मी आहे अशी बुद्धि होणे ती अविद्या होय ॥ ३२॥
___वस्तूचे खरे स्वरूप आप्ताने सांगितले आहे व रागादिक दोष ज्ञानावरणादि कर्मे ही वस्तूचे खरे ज्ञान होऊ देत नाहीत. जेव्हा रागादिक दोष व ज्ञानावरणादि कर्माचा नाश होतो तेव्हा आत्म्यात आप्तपणा येतो. म्हणून अशा आप्ताने सांगितलेल्या मताचा अभ्यास करावा व त्या अभ्यासाने मनाचा मल नाहीसा होतो ॥ ३३ ॥
राजविद्येच्या ज्ञानाने या जगातील वस्तुविषयी खरे ज्ञान होते व दृढ होते. धर्म शास्त्राच्या ज्ञानापासून इहलोक व परलोकाच्या वस्तूंचे ज्ञान होते म्हणून त्या धर्मशास्त्राचे अध्ययन करावे ॥ ३४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org