________________
४८२)
महापुराण
(४२-१०
तत्कथं कर्मभूमित्वादद्यत्वे द्वितयो प्रजा । कर्तव्या रक्षणीयका प्रजान्या रक्षणोद्यता ॥१० रक्षणाभ्युद्यता येऽत्र क्षत्रियाः स्युस्तदन्वयाः । सोऽन्वयोऽनादिसन्तत्या बीजवृक्षवदिष्यते ॥ ११ विशेषतस्तु तत्सर्गः क्षेत्रकालव्यपेक्षया । तेषां समुचिताचारः प्रजार्थे न्यायवृत्तिता ॥ १२ स तु न्यायोऽनतिक्रान्त्या धर्मस्यार्थसमर्जनम् । रक्षणं वर्धनं चास्य पात्रे च विनियोजनम् ॥ १३ सैषा चतुष्टयी वृत्तिायः सद्धिरुदीरितः । जैनधर्मानुवृत्तिश्च न्यायो लोकोत्तरो मतः ॥ १४ दिव्यमूर्तेस्तदुत्पद्य जिनादुत्पादयज्जिनान् । रत्नत्रयं तु तद्योनिर्नपास्तस्मादयोनिजाः ॥ १५ ततो महान्वयोत्पन्ना नृपा लोकोत्तमा मताः । पथि स्थिताः स्वयं स्थापयन्तः परानपि ॥१६ तैस्तु सर्वप्रयत्नेन कार्य स्वान्वयरक्षणम् । तत्पालनं कथं कार्यमिति चेत्तदनूच्यते ॥ १७ स्वयं महान्वयत्वेन महिम्नि क्षत्रियाः स्थिताः। धर्मास्थया न शेषादि ग्राह्यं तैः परलिङ्गिनाम् ॥१८
तो अशी- आज या भारतामध्ये कर्मभूमि असल्यामुळे येथे दोन प्रकारची प्रजा आहे. एक प्रजा रक्षण करण्यास योग्य आहे व दुसरी प्रजा तिचे रक्षण करणारी आहे. अर्थात् एक प्रजा रक्ष्य आहे व दुसरी प्रजा रक्षक आहे. रक्षण करण्यामध्ये जे उद्युक्त झाले आहेत ते क्षश्रिय होत व त्यांचा जो अन्वय-वंश तो क्षत्रियवंश होय व हा अन्वय-वंश अनादि परंपरेने बीज वक्षाप्रमाणे मानला जातो. जसे बीजापासन वक्ष होतो व त्या वक्षापासून पून: बीज उत्पन्न होते त्याप्रमाणे ही क्षत्रिय परंपरा चालली आहे ।। १०-११।।
क्षेत्र व कालाच्या अपेक्षेने त्या क्षत्रियाची विशेष उत्पत्ति सांगितली आहे. अर्थात् भरतक्षेत्र व उत्सर्पिणी व अवसर्पिणी काल यांच्या अपेक्षेने हा विशेष आहे. प्रजेचे न्यायाने रक्षण करणे हा त्यांचा योग्य आचार आहे ॥ १२ ॥
न्यायवृत्तीचे लक्षण असे- धर्माचे उल्लंघन न करता धन मिळविणे, त्याचे रक्षण करणे ते वाढविणे व पात्राचे ठिकाणी दान देणे ॥ १३ ॥
हे वर सांगितलेले जे वागणे, प्रवृत्ति करणे त्याला सज्जन न्याय म्हणतात व जैनधर्माला अनुसरणे हा लोकोत्तर न्याय आहे असे सज्जन म्हणतात ।। १४ ।।
दिव्यमूर्ति अशा जिनेश्वरापासून उत्पन्न होऊन पुढेही जिनाना उत्पन्न करणारे जे रत्नत्रय ते या क्षत्रियांचे उत्पादक आहे म्हणून हे क्षत्रियराजे अयोनिज आहेत ।। १५ ।।
म्हणून महावंशात उत्पन्न झालेले व स्वतः धर्ममार्गात स्थिर राहून इतरानाही धर्मात स्थापन करणारे हे राजे लोकोत्तम मानले जातात ॥ १६ ॥
या राजानी सर्व प्रयत्नाने आपल्या वंशाचे रक्षण केले पाहिजे. त्यानी स्वतःच्या वंशाचे रक्षण कसे करावे अशा प्रश्नाचे उत्तर याप्रमाणे येथे सांगत आहेत. हे राजे स्वतः महावंशात उत्पन्न झाले असल्यामुळे स्वतः आपल्या मोठेपणात स्थिर आहेत. म्हणून त्यानी अन्य धर्मात श्रद्धा ठेवू नये व अन्यधर्मीय साधूपासून शेषा- अक्षतपुष्पादिक धारण करू नये, ग्रहण करू नये ॥ १७-१८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org