Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२-२७)
महापुराण
(४८३
तच्छेषादिग्रहे दोषः कश्चेन्माहात्म्यविच्युतिः । अपाया बहवश्चास्मिन्नतस्तत्परिवर्जनम् ॥ १९ माहात्म्यप्रच्युतिस्तावत्कृत्वान्यस्य शिरोनतिम् । ततः शेषाद्यपादाने स्यान्निकृष्टत्वमात्मनः ॥ २० प्रद्विषन्परपाखण्डी विषपुष्पाणि निक्षिपेत् । यद्यस्य मूनि नन्वेवं स्यादपायो महीपतेः ॥ २१ वशीकरणपुष्पाणि निक्षिपेद्यदि मोहने । ततोऽयं मूढवद्वृत्तिरुपेयादन्यवश्यताम् ॥ २२ तच्छेषाशीर्वचः शान्तिवचनाद्यन्यलिङ्गिनाम् । पार्थिवैः परिहर्तव्यं भवेन्यक्कुलताऽन्यथा ॥ २३ जैनास्तु पार्थिवास्तेषामहत्पादोपसेविनाम् । तच्छेषानुमतिया॑य्या ततः पापक्षयो भवेत् ।। २४ रत्नत्रितयमूर्तित्वादादिक्षत्रियवंशजाः । जिनाः सनाभयोऽमीषामतस्तच्छेषधारणम् ॥ २५ यथाहि कुलपुत्राणां माल्यं गुरुशिरोधृतम् । मान्यमेवं जिनेन्द्राङघ्रिस्पर्शान्माल्यादि भूक्षिताम् ॥२६ कथं मुनिजनादेषां शेषोपादानमित्यपि । नाशङक्यं तत्सजातीयास्ते राजपरमर्षयः ॥ २७
त्यानी दिलेली फुले, अक्षता, प्रसाद वगैरे घेण्यात कोणता दोष आहे असे म्हणाल तर सांगतो. ते घेण्यामुळे आपल्या मोठेपणाचा नाश होतो आणि ते घेण्यात पुष्कळ अनिष्टही उद्भवतात. म्हणून त्यांचा त्याग करावा ॥ १९ ॥
__ इतराना मस्तक नम्र करण्याने प्रथमतः आपला मोठेपणा नाहीसा होतो व नंतर त्यांच्या शेषेचे ग्रहण केले असता आपणास निकृष्टपणा येईल ॥ २० ॥
तो अन्य पाखंडी आपल्याशी द्वेष करून आपल्या मस्तकावर विषारी पुष्पे टाकील व त्याने असे केले तर आपणास ( राजाला ) खचित अपाय होईल ।। २१ ।।
तो पाखंडी जर राजावर मोह उत्पन्न करण्यासाठी वशीकरणमंत्रानी मंत्रित झालेली फुले टाकील तर हा राजा मूढाप्रमाणे वागणारा होईल व इतरांच्या वश होईल ॥ २२ ॥
म्हणून अन्यमतीयांच्या शेषा, आशीर्वाद व शान्तिवचन वगैरेचा राजानी त्याग करावा. जर त्यांचा ते स्वीकार करतील तर त्याना नीचकुलोत्पन्नता प्राप्त होईल ॥ २३ ॥
जनराजानी-जिनचरणाची सेवा करणाऱ्या जैनराजानी जिनेश्वराच्या चरणावरची माला, पुष्प, अक्षता घेणे मान्य आहे, न्याय्य आहे व त्यापासून पापाचा क्षय होतो ॥ २४ ॥
. जिन हे सम्यग्दर्शनादि रत्नत्रयाची मूर्ति असल्यामुळे ते आदिक्षत्रिय जे आदिभगवंत त्यांचे वंशज आहेत म्हणून ते ह्या राजाचे एक गोत्रज आहेत. यास्तव त्याची शेषादिक राजानी घ्यावी ॥ २५ ॥
ज्याप्रमाणे उत्तम कुलात उत्पन्न झालेल्या मुलाना त्यांच्या वडिलानी मस्तकावर धारण केलेली माला आदरणीय होते त्याप्रमाणे जिनेश्वराच्या चरणांच्या स्पर्शाने मालादिक आदरणीय होतात. त्यांचा राजानी मस्तकाने स्वीकार करावा ॥ २६ ॥
या राजानी मुनिजनापासून शेषादिक कसे ग्रहण करावेत अशी ही शंका घेऊ नये. कारण ते मुनिजनही राजर्षि, परमर्षि आदिक जिनेश्वराचेच सजातीय आहेत म्हणून त्यांच्या चरणांच्या पुष्पाक्षता मस्तकावर धारण करणे योग्यच आहे ॥ २७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org