Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
द्विचत्वारिंशत्तमं पर्व । मध्येसभमथान्येद्युनिविष्टो हरिविष्टरे । क्षात्रं वृत्तमुपादिक्षत्संहितान्पार्थिवान्प्रति ॥ १ श्रूयतां भो महात्मानः सर्वक्षत्रियपुङ्गवाः । क्षतत्राणे नियुक्ताः स्थ यूयमाद्येन वेषसा ॥२ तत्राणे च नियुक्तानां वृत्तं वः पञ्चधोदितम् । तन्निशम्य यथाम्नायं प्रवर्तध्वं प्रजाहिते ॥ ३ तच्चेदं कुलमत्यात्मप्रजानामनुपालनम् । समञ्जसत्वं चेत्येवमुद्दिष्टं पञ्चभेदभाक् ॥ ४ कुलानुपालनं तत्र कुलाम्नायानुरक्षणम् । कुलोचितसमाचारपरिरक्षणलक्षणम् ॥ ५ क्षत्रियाणां कुलाम्नायः कीदृशश्चेन्निशम्यताम् । आद्येन वेधसा सष्टः सर्गोऽयंक्षत्रपूर्वकः ॥६ स चैष भारतं वर्षमवतीर्णो विवोऽग्रतः । पुरा भवे समाराध्य रत्नत्रितयमूजितम् ॥७ द्विरष्टौ भावनास्तत्र तीर्थकृत्वोपपादिनः । भावयित्वा शुभोदर्का धुलोकाग्रमधिष्ठितः ॥ ८ तेनास्मिन्भारते वर्षे धर्मतीर्थप्रवर्तने । ततः कृतावतारेण क्षात्रसर्गः प्रवर्तितः ॥ ९
यानंतर कोण्या एके दिवशी भरतमहाराज सभेमध्ये सिंहासनावर बसले व त्यांनी त्यावेळी जमलेल्या सर्व राजांना क्षत्रियांच्या आचारांचा उपदेश केला ।। १ ।।
ज्यांची मने उदार आहेत अशा हे श्रेष्ठ क्षत्रियानो ऐका, तुम्हाला पहिल्या प्रजापतीने अर्थात् श्रीवृषभजिनेश्वराने दुःखी प्रजेचे रक्षण करण्यासाठी नेमलेले आहे ॥ २ ॥
त्या आदिप्रजापतीने प्रजेच्या रक्षणासाठी तुम्हाला पाच प्रकारचा आचार सांगितला आहे. तो तुम्ही ऐका व शास्त्राला अनुसरून प्रजेच्या हितामध्ये प्रवृत्त व्हा अर्थात् प्रजेच्या कल्याणासाठी झटा ।। ३ ॥
तो तुमचा आचार कुलानुपालन, मत्यनुपालन, आत्मानुपालन, प्रजानुपालन आणि समंजसपणा असा पाच प्रकारचा सांगितला आहे अर्थात् कुलाचे रक्षण करणे, आपल्या बुद्धीचे रक्षण करणे, स्वतःचे रक्षण करणे, प्रजेचे रक्षण करणे व समंजसपणा धारण करणे हा पाच प्रकारचा आचार आहे ॥ ४॥
__ कुलानुपालन म्हणजे कुलाम्नायाचे रक्षण करणे अर्थात् आपल्या कुलाला योग्य असलेल्या सदाचाराचे सर्व प्रकारे रक्षण करणे असे त्याचे स्वरूप आहे ।। ५ ॥
क्षत्रियांचा कुलाम्नाय-कुलाचा आचार कसा आहे असे विचाराल तर तो मी सांगतो ऐका. आद्य ब्रह्मदेवाने अर्थात् वृषभजिनेश्वराने क्षत्रपूर्वकच या सृष्टीची रचना केली आहे. अर्थात् प्रथमतः क्षत्रिय वर्णाचीच त्यानी रचना केली आहे ।। ६॥
या आदिभगवंताने पूर्वभवामध्ये उत्कृष्ट रत्नत्रयाची आराधना केली. याचप्रमाणे पूर्वभवात दर्शनविशुद्धयादिक सोळा भावनांचे चिन्तन केले. त्यामुळे त्याना तीर्थकरकर्माचा बंध झाला. या भावना भावी जन्मात शुभ फळ देणाऱ्या असतात. यानंतर ते स्वर्गलोकात जन्मले. तेथील आयुष्य समाप्त झाल्यावर हे प्रभु तेथून या भारतवर्षात अवतरले. या भारतवर्षात धर्मतीर्थाची प्रवृत्ति करण्यासाठी अवतरलेल्या भगवंतानी क्षत्रियांची सृष्टि केली ।। ७-९॥ म. ६१
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org