Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७६)
महापुराण
(४१-१३१
तत्र वारविलासिन्यो नपवल्लभिकाश्च तम् । परिवरुपारूढतारुण्यमवकर्कशाः ॥ १३१ तासामालापसंलापपरिहासकथादिभिः । सुखासिकामसौ भेजे भोगाङ्गश्च मुहूर्तकम् ॥ १३२ ततस्तुर्यावशेषेऽह्नि पर्यटन्मणिकुट्टिमे । वीक्षतेस्म परां शोभामभितो राजवेश्मनः ॥ १३३ स नर्मसचिवं कञ्चित्समालम्ब्यांसपीठके । परिकामग्नितश्चेतो रेजे सुरकुमारवत् ॥ १३४ रजन्यामपि यत्कृत्यमुचितं चक्रवर्तिनः । तदाचरन्सुखेनैव त्रियामामत्यवाहयत् ॥ १३५ कदाचिदुचितां वेलां नियोग इति केवलम् । मन्त्रयामास मन्त्रः कृतकार्योऽपि चक्रभृत् ॥ १३६ तन्त्रावापगता चिन्ता नास्यासीद्विजितक्षितेः । तन्त्रचिन्तव नन्वस्य स्वतन्त्रस्येह भारते ॥ १३७
----------------------
त्याठिकाणी उत्पन्न झालेल्या तारुण्याच्या मदाने ज्यांना उन्मत्तता आली आहे अशा वारविलासिनी आणि प्रियराण्या येऊन त्याला घेरीत असत तेव्हा त्यांची भाषणे व आपसात बोलणे, थट्टामस्करी आदिक भोगांच्या साधनानी हा चक्रवर्ती काही वेळपर्यन्त सुखाने बसत असे ॥ १३१-१३२ ॥
यानंतर दिवसाचा जेव्हा चौथा भाग शेष राहत असे त्यावेळी रत्ने जिच्यात जडविलेली आहेत अशा जमिनीवरून फिरत फिरत आपल्या राजमहालाची सर्व बाजूनी उत्कृष्ट शोभा हा चक्रवर्ती पाहत असे ॥ १३३ ।।
तो चक्रवर्ती एखाद्या खुष मस्कऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून जेव्हा इकडे तिकडे विहार करीत असे तेव्हा तो देवकुमाराप्रमाणे शोभत असे ॥ १३४ ॥
रात्रीच्या वेळीही आपल्या चक्रवर्तीपणाला जे कार्य योग्य असेल तेच हा भरतप्रभु करीत असे, अशा रीतीने तो रात्र सुखानेच घालवीत असे ॥ १३५ ॥
तो चक्रधर आपली सर्व राजनीतीची कर्तव्ये योग्य बजावलेली असल्यामुळे जरी कृत कार्य झाला होता तरीही राजनीतीच्या शास्त्रात सांगितलेले असल्यामुळे राजनीतिज्ञ लोकाबरोबर योग्य वेळी राज्यासंबंधी कार्याचा विचार करीत असे ॥ १३६ ॥
याने सर्व पृथ्वीला जिंकले असल्यामुळे या भारतात हा पूर्ण स्वतंत्र झालेला होता. त्यामुळे आपल्या राष्ट्रासंबंधी किंवा इतरांच्या राष्ट्रासंबंधी काहीही चिन्ता करण्याचे कारण नव्हते. पण राजाने काही राज्यासंबंधी विचार केला पाहिजे. या नियमाचे पालन करावे म्हणून तो तद्विषयक विचार करीत असे ॥ १३७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org