________________
४१-१३०)
महापुराण
(४७५
नपासनमथाध्यास्य सभासदनमध्यगः । नृपान्सम्भावयामास सेवावसरकाइक्षिणः ॥ १२३ कांश्चिदालोकनः कांश्चिस्मितैराभाषणैः परान् । कांश्चित्सम्मानदानाद्येस्तर्पयामास पार्थिवान् ॥ तत्रोपायनसम्पत्या समायातान्महत्तमान् । वचोहरांश्च संमान्य कृतकार्यान्व्यसर्जयत् ॥ १२५ कलाविदश्च नृत्तादिदर्शनैः समुपस्थितान् । पारितोषिकदानेन महता समतर्पयत् ॥ १२६ ततो विसजितास्थानः प्रोत्थाय नपविष्टरात् । स्वेच्छाविहारमकरोद्विनोदैः सुकुमारकः ॥ १२७ ततो मध्यन्दिनेऽभ्यणे कृतमज्जनसंविधिः । तनुस्थिति स निर्वयं निरविक्षत्प्रसाधनम् ॥ १२८ चामरोपेतताम्बूलवानसंवाहनादिभिः । परिचेरुरुपेत्यैनं परिवाराङ्गन्नाः स्वतः ॥ १२९ ततो भक्तोत्तरास्थाने स्थितः कतिपयैर्नृपः । समं विदग्धमण्डल्या विद्यागोष्ठीरभावयत् ॥ १३०
यानन्तर सभागृहाच्या मध्यभागी राजसिंहासनावर चक्रवर्ती बसला व सेवा करण्याचा प्रसंग आपणास केव्हा मिळेल असे इच्छिणाऱ्या राजांचा त्याने आदर केला ॥ १२३ ॥
त्याने कित्येक राजाना पाहण्याने सन्तुष्ट केले, कित्येकाना मंद हास्याने, कित्येकाना थोड्याशा शब्दानी व कित्येकाना सन्मानाने व कित्येकाना दान देण्याने सन्तुष्ट केले ॥ १२४ ।।
त्यावेळी काही मोठे लोक सरदार आदिक नजराणे घेऊन आले होते व काही दूतवार्ताहरही आले होते त्यांचा चक्रवर्तीने सन्मान केला आणि ज्यांचे कार्य झाले आहे अशा त्याना त्याने सत्कारून पाठविले ।। १२५ ॥
नृत्य वगैरे कला दाखवून चक्रवर्तीला प्रसन्न करावे या हेतूने आलेल्या कलावंताना हा चक्रवर्ती मोठे बक्षिस देऊन सन्तुष्ट करीत असे ॥ १२६ ।।
यानन्तर राजसिंहासनावरून उठून ज्याने सभागृह सोडले आहे असा हा चक्रवर्ती सुकुमार अशा विनोदानी शरीराला त्रास न होईल अशा खेळानी इच्छेप्रमाणे क्रीडा करीत असे ॥ १२७ ॥
मध्याह्न कालाची वेळ जवळ आली असता हा चक्रवर्ती स्नान करीत असे व नंतर तनुस्थिति-देह टिकविण्याचे साधन म्हणजे जेवण करीत असे व ते उरकल्यावर तो आपल्या अंगावर अलंकार धारण करीत असे ॥ १२८ ॥
त्यावेळी परिवाराङ्गना- सेवा करणाऱ्या स्त्रिया या चक्रवर्तीजवळ येऊन चवऱ्या वारणे, तांबूल देणे व संवाहन- पाय चुरणे अशा क्रिया करून सेवा करीत असत ।। १२९ ।।
भोजन झाल्यावर बसावयाच्या ठिकाणी हा चक्रवर्ती काही राजाबरोबर बसून विद्वान् लोकाबरोबर ज्ञानाच्या गोष्टींचा विचार करीत असे, चर्चा करीत असे ॥ १३० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org