________________
४१-१४३)
महापुराण
(४७७
तेन पाङगुण्यमभ्यस्तमपरिज्ञानहानये । शासतोऽस्याविपक्षां क्ष्मां कृतं सन्ध्यादिचर्चया ॥ १३८ राजविद्याश्चतस्रोऽमः कदाचिच्च कृतक्षणः । व्याचख्यौ राजपुत्रेभ्यः ख्यातये स विचक्षणः ॥१३९ कदाचिन्निधिरत्नानामकरोत्स निरीक्षणम् । भाण्डागारपदे तानि तस्य तन्त्रपदेऽपि च ॥ १४० कदाचिद्धर्मशास्त्रेषु याः स्युविप्रतिपत्तयः । निराचकार ताः कृत्स्नाः ख्यापयन्विश्वविन्मतम् ॥१४१ आप्तोपज्ञेषु तत्त्वेषु कांश्चित्सजातसंशयान । ततोऽपाकृत्य संशीतेस्तत्तत्वं निरणीनयत् ॥ १४२ तथासावर्थशास्त्रेषु कामनीतौ च पुष्कलम् । प्रावीण्यं प्रथयामास यथात्र न परः कृती ॥ १४३
___ या चक्रवर्तीने संधि, विग्रह वगैरे सहा गुणांचा अभ्यास तद्विषयक ज्ञान आपले नष्ट होऊ नये म्हणून केला. याशिवाय दुसरा कोणता हेतु नव्हता. कारण याला कोणताही शत्रु नव्हता. निःशत्रुक अशी ही पृथ्वी याच्याच शासनाखाली नांदत होती. म्हणून सन्धि विग्रह आदिक सहा गुणांची चर्चा करणे निरुपयोगी होते. संधि- तह करणे, विग्रह- युद्ध करणे. यान काही निमित्त उपस्थित करून शत्रूच्या राज्यात घुसणे. आसन- एके ठिकाणी दबा धरून बसणे. संश्रय- किल्ल्याचा किंवा राजाचा आश्रय घेऊन राहणे, द्वैधीभाव- शत्रूच्या सैन्यात फितुरी करणे. या गुणांचे ज्यात वर्णन केले आहे अशा शास्त्राचा अभ्यास याने केला. त्या गुणाविषयीचे आपले अज्ञान नाहीसे व्हावे हाच हेतु या चक्रवर्तीचा होता. म्हणून मुत्सद्दी लोकाबरोबर हा राजा या गुणांचा विचार करीत असे ॥ १३८ ।।
ज्याच्या ठिकाणी उत्साह आहे व जो विद्वान् आहे असा हा राजा राजपुत्रांना या चार राजविद्यांचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांचे निरूपण करीत असे. त्या चार विद्या या- १) न्याय करण्याचे शास्त्र, २) त्रयी- म्हणजे वृद्धि- संपत्ति वाढविणे, क्षय- संपत्ति, नाश आणि स्थानराहण्याचे ठिकाण या तीनांचे वर्णन करणारे शास्त्र त्याला त्रयीविद्या म्हणतात. ३) वार्तादुस-याच्या राज्यातील गुप्त बातमी मिळविण्याचे शास्त्र त्याला वार्ता म्हणतात. ४) दंडनीतिअपराध्यास शिक्षा देण्याचे शास्त्र. या चार शास्त्राना चार राजविद्या म्हणतात. याची माहिती हा चक्रवर्ती राजपुत्रांना सांगत असे ॥ १३९ ।।
एकादेवेळी तो चक्रवर्ती आपल्या निधिरत्नांचे अवलोकन करीत असे. काही रत्ने व निधि त्यांच्या भाण्डागारात होती व कांही त्याच्या सैन्यात होती ॥ १४० ॥
केव्हा केव्हा सर्वज्ञ जिनेश्वराचे मत प्रकट करताना धर्मशास्त्रात जे विवाद उत्पन्न होत असत त्या सर्वांचे तो चक्रवर्ती निराकरण करीत असे ॥ १४१॥
श्रीजिनेश्वरानी जी जीवादिक तत्त्वे सांगितली आहेत त्याविषयी कोणाला उत्पन्न झालेल्या संशयाचे तो चक्रवर्ती निराकरण करून त्या जीवादिकतत्त्वांचा निर्णय करीत असे ॥ १४२ ॥
या भरतेशाने अर्थशास्त्रामध्ये व कामनीतीत आपले कौशल्य-चातुर्य दाखविले. ते पाहून याच्यासारखा या शास्त्रात दुसरा कोणी ज्ञानी नाही असे लोकाना वाटले ।। १४३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org