Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७८)
महापुराण
(४१-१४४
हस्तितन्त्रेऽश्वतन्त्रे च दृष्ट्वा स्वातन्त्र्यमोशितुः । मूलतन्त्रस्य कर्तायमित्यास्था तद्विदामभूत् ॥१४४ आयुर्वेदे स दीर्घायुरायुर्वेदो नु मूर्तिमान् । इति लोको निरारेकं श्लाघते स्म निधीशिनम् ॥ १४५ सोऽधीती पदविद्यानां स कृती वागलङकृतौ । स छन्दसां प्रतिच्छंद इत्यासीत्सम्मतः सताम् ॥१४६ तदुपज्ञं निमित्तानि शाकुनं तदुपक्रमम् । तत्सर्गो ज्योतिषां ज्ञानं तन्मतं तेन तत्त्रयम् ॥ १४७ स निमित्तं निमित्तानां तन्त्रे मन्त्रे च शाकुने । दैवज्ञाने पदं देवमित्यभूत्सम्मतोऽधिकम् ॥ १४८ तत्सम्भूतो समुद्भूतमभूत्युरुषलक्षणम् । उदाहरणमन्यत्र लक्षितं येन तत्तनोः ॥ १४९ अन्येष्वपि कलाशास्त्रसङग्रहेषु कृतागमाः । तमेवादर्शमालोक्य संशयांशाद्वधरंसिषः ॥ १५० येनास्य सहजा प्रज्ञा पूर्वजन्मानुषडगिणी । तेनैषा विश्वविद्यासु जाता परिणतिः पुरा ॥ १५१ इत्थं सर्वेषु शास्त्रेषु कलासु सकलासु च । लोके स सम्मति प्राप्य तद्विधानां मतोऽभवत् ।। १५२
हस्तितंत्र-गजशास्त्र व अश्वपरीक्षाशास्त्र यामध्ये याचा स्वतन्त्रपणा- प्रावीण्य बघून हाच या शास्त्रांचा मूळ कर्ता असावा अशी या शास्त्राच्या जाणत्यांच्या मनात बुद्धि उत्पन्न झाली. हा भरतच या शास्त्रांचा मळकर्ता आहे असे त्याना वाटू लागले ॥ १४४ ॥
आयुर्वेदात-वैद्यशास्त्रात तो दीर्घायुषी भरतराजा मूर्तिमन्त आयुर्वेद आहे अशी शंकारहित होऊन लोक त्या निधीशाची स्तुति करीत असत ॥ १४५ ॥
त्याने व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले आहे, तो शब्दालंकारात कृती-कुशल आहे व तो छन्दःशास्त्राचे प्रतिबिंब आहे. याप्रमाणे तो भरतेश्वर विद्वान् लोकाना मान्य झाला ॥१४६।।
निमित्तशास्त्र हे प्रथमतः या भरतराजानेच बनविले आहे व शकुनशास्त्रही त्यानेच प्रथम रचिले आहे व चंद्र, सूर्य, ग्रह नक्षत्रादिकांचे ज्ञानही त्यानेच प्रथम केले आहे. म्हणून ही तीनही शास्त्रे या भरतानेच प्रथम रचिली आहेत असे समजावे ॥ १४७ ॥
तो भरत राजा निमित्तशास्त्राच्या रचनेचे कारण आहे. तसेच तन्त्र, मन्त्र व शकुन शास्त्रात त्याचे मुख्य स्थान आहे आणि दैवज्ञानात- ज्योतिष शास्त्रात तर तो उत्तम देव आहे. याप्रमाणे तो सर्व लोकात अधिक मान्य झाला ॥ १४८ ॥
जेव्हा भरतराजा जन्मला तेव्हाच पुरुषाची सर्व लक्षणे उत्पन्न झाली, म्हणून इतर ठिकाणी या भरताच्या शरीराचेच उदाहरण पाहिले जात होते ॥ १४९ ॥
शास्त्रामध्ये ज्यानी प्रावीण्य मिळविले आहे. असे विद्वान लोक अन्य कलाशास्त्रांच्या संग्रहामध्येही या भरतराजालाच दर्पणासारखा मानून संशयरहित झाले ॥ १५ ॥
__ या भरतेश्वराची स्वाभाविक बुद्धि पूर्व जन्माशी संबन्ध ठेवणारी होती. म्हणून याच्या बुद्धीची परिणति सर्व विद्यामध्ये त्यावेळी प्रकट झाली होती ॥ १५१॥
याप्रमाणे सर्व शास्त्रे व सर्व कलामध्ये तो भरतेश्वर सर्व लोकात संमानाला पावला व त्या त्या विद्यांना जाणणाऱ्याकडून तो संमानिला गेला ।। १५२ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org