Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४०-२२१)
महापुराण
(४५९
गुणेष्वेव विशेषोऽन्यो यो वाच्यो बहुविस्तरः । स उपासकसिद्धान्तादधिगम्यः प्रपञ्चतः ॥ २१३ क्रियामन्त्रानुषङ्गेण व्रतचर्याक्रियाविधौ । दशाधिकारा व्याख्याताः सद्वृत्तरादृता द्विजैः ॥ २१४ क्रियामन्त्रास्त्विह ज्ञेया ये पूर्वमनर्वाणताः । सामान्यविषयाः सप्तपीठिकामन्त्ररूढयः ॥ २१५ ते हि साधारणाः सर्वक्रियासु विनियोगिनः । तत उत्सगिकानेतान्मन्त्रान्मन्त्रविदो विदुः ॥ २१६ विशेषविषया मन्त्राः क्रियासूक्तासु दर्शिताः । इतः प्रभुति चाभ्यूह्यास्ते यथाम्नायमग्रजः ॥ २१७ मन्त्रानिमान्यथायोग्यं यः क्रियासु नियोजयेत् । स लोके सम्मति याति युक्ताचारो द्विजोत्तमः॥२१८ क्रिया मन्त्रविहीनास्तु प्रयोक्तणां न सिद्धये । यथा सुकृतसन्नाहाः सेनाध्यक्षा विनायकाः ॥ २१९ ततो विधिममुं सम्यगवगम्य कृतागमैः । विधानेन प्रयोक्तव्याः क्रिया मन्त्रपुरस्कृताः ॥ २२० इत्थं स धर्मविजयी भरताषिराजो। धर्मक्रियासु कृतधीनूपलोकसाक्षि ॥ तान्सुव्रतान्द्रिजवरान्विनियम्य सम्यक् । धर्मप्रियः समसृजत् द्विजलोकसर्गम् ॥ २२१
या अतिबालविद्यादिगुणामध्ये अन्य जो विशेष आहे त्याचे फार विस्ताराने वर्णन करावे लागेल. यास्तव तो विस्तार अधिक स्पष्टरीतीने उपासकाध्ययनसिद्धान्तातून जाणन घ्यावा ।। २१३ ॥
याप्रमाणे क्रियामन्त्राच्या वर्णनाच्या निमित्ताने व्रतचर्या या प्रकरणात त्या दहा अधिकाराचे व्याख्यान केले आहे व सदाचारी ब्राह्मणानी त्याचा आदर केला आहे ॥ २१४ ॥
या क्रियामंत्रांचे पूर्वी वर्णन केले आहे व ते ते मंत्र त्या त्या क्रियेच्या स्वरूप वर्णनात चणिरूपाने दिले आहेत व त्यामध्ये सामान्य विषयांच्या मंत्रात पीठिका मंत्र म्हणतात व ते सामान्यमंत्र सर्व क्रियामध्ये उपयोगी पडतात. म्हणून मंत्रज्ञविद्वान् या मंत्राना औत्सर्गिक मन्त्र म्हणतात ।। २१५-२१६ ॥
विशेष विषय ज्यांचा आहे असे जे मंत्र आहेत ते ते त्या त्या उपनयादिविशेष क्रियामध्ये सांगितले आहेत व ब्राह्मणानी आगमाला अनुसरून त्या मंत्रांचा त्या त्या क्रियामध्ये उपयोग करावा ।। २१७ ॥
जो या मंत्राची यथायोग्य क्रियामध्ये योजना करतो तो ज्याचा आचार योग्य आहे असा व ब्राह्मणात श्रेष्ठ असलेला तो ब्राह्मण लोकात सम्मान पावतो ।। २१८ ।।
जसे युद्धासाठी शस्त्रादिक घेऊन तयार असलेले योद्धे विनायक-सेनापतीने रहित असतील तर जयसिद्धीला कारण होत नाहीत. तसे मंत्ररहित अशा क्रिया त्या त्या उपनयादि क्रियांच्या सिद्धीला कारण होत नाहीत ॥ २१९ ॥
यासाठी ज्यानी शास्त्राभ्यास केला आहे अशा ब्राह्मणानी हा विधि चांगला जाणून मंत्रोच्चारपूर्वक विधियुक्त क्रिया कराव्यात ।। २२० ॥
याप्रमाणे ज्याला धर्माच्या साहाय्याने विजय प्राप्त झाला आहे व जो धर्मक्रियामध्ये निपुण आहे अशा धर्मप्रिय त्या भरतचक्रीने जे आपली व्रते उत्तम पाळतात अशा त्या ब्राह्मणाना सर्व राजांच्या समक्ष उत्तम शिक्षण देऊन ब्राह्मणसृष्टीला उत्पन्न केले ॥ २२१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org