________________
४१-४७)
महापुराण
(४६५
शुष्कमध्यं तडागं च पर्यन्तप्रचुरोदकम् । पांसुषसरितो रत्नराशिः श्वार्घभुहितः ॥ ३८ तारुण्यशाली वृषभः शीतांशुः परिवेषयुक् । मिथोऽङ्गीकृतसाङ्गत्यौ पुङ्गवो सङ्गलच्छ्यिौ ॥ ३९ रविराशावधूरत्नवतंसोऽब्दस्तिरोहितः । संशुष्कस्तरुरच्छायो जीर्णपर्णसमुच्चयः ॥ ४० बोडीतेऽद्ययामिन्यां दृष्टाः स्वप्ना विदांवर । फलविपत्तिपत्ति मे तद्गतां त्वमपाकुरु ॥ ४१ इति तत्फलविज्ञाननिपुणोऽप्यवषित्विषा । सभाजनप्रबोधार्थ पप्रच्छ निधिराट् जिनम् ॥ ४२ तत्प्रश्नावसितावित्थं व्याचष्टे स्म जगदगुरुः । वचनामृतसंसेकैः प्रीणयन्निखिलं सदः ॥ ४३ भगवहिव्यवागर्थशश्रषावहितं तदा । ध्यानोपगमिवाभत्तत्सदश्चित्रगतं न वा ॥४॥ साध वत्स कृतं साध धामिकद्विजप्रजनम । किन्तु दोषानुषङ्गोऽत्र कोऽप्यस्ति स निशम्यताम् ॥४५ आयटमम्भवता सष्टा य एते गहमेधिनः । ते तावचिताचारा यावत्कृतयगस्थितिः ॥ ४॥ ततः कलियुगेऽभ्यणे जातिवादावलेपतः । भ्रष्टाचाराः प्रपत्स्यन्ते सन्मार्गप्रत्यनीकताम् ॥ ४७
अर्घ्य भक्षण करीत असलेला कुत्रा, ११) तारुण्यशाली असा बैल, १२) ज्याचे सभोवती खळे उत्पन्न झाले आहे असा चंद्र, १३) ज्याची शोभा नष्ट झाली आहे असे एकमेकाचे मित्र असलेले दोन बैल, १४) जणु दिशारूपी स्त्रियांच्या रत्नकुंडलासारखा असलेला सूर्य मेघानी आच्छादलेला होता, १५) सावलीने रहित व वाळलेला असा वृक्ष, १६) वाळलेल्या जुन्या पानांचा ढीग. हे जानिजनश्रेष्ठ ! अशी सोळा स्वप्ने मी आज रात्री पाहिली आहेत. त्यांच्या फलाविषयी जो मला संशय वाटत आहे त्याचे आपण निराकरण करा. आपल्या अवधिज्ञानाच्या तेजाने त्या स्वप्नाचे फल जाणण्यास समर्थ अशाही त्या निधीश भरताने सभेत आलेल्या लोकाना समजण्यासाठी श्रीजिनाला स्वप्नांची फले विचारली ।। ३६-४२ ।।
याप्रमाणे भरताचे प्रश्न करणे संपल्यावर आपल्या वचनामृताच्या सिंचनाने सगळ्या सभेला आनंदित करणाऱ्या जगद्गुरु आदि प्रभूनी याप्रमाणे वर्णन करावयास सुरुवात केली ॥ ४३ ॥
__ भगवंताच्या दिव्यवाणीचा अर्थ ऐकण्यासाठी एकाग्रचित्त झालेली ती सभा त्यावेळी ध्यानात निमग्न झाल्याप्रमाणे किंवा चित्रात काढल्याप्रमाणे जणु भासली ।। ४४ ।।
प्रभु म्हणाले- हे वत्सा, तूं धार्मिक ब्राह्मणांचे पूजन केलेस ही गोष्ट चांगली केली आहेस. परन्तु यात काही दोषांचा सम्बन्ध आहे तो तू ऐक ।। ४५ ॥
हे आयुष्मन्ता, तू जे हे गृहस्थाश्रमी ब्राह्मण उत्पन्न केले आहेस ते जोपर्यन्त कृतयुग आहे तोपर्यन्त योग्य आचारात प्रवृत्त होतील ॥ ४६ ।।
यानन्तर म्हणजे जेव्हा कलियुग जवळ येईल त्यावेळी यांच्या ठिकाणी जातिमद उत्पन्न होईल व हे सन्मार्गाचे उलट वागतील व आचारभ्रष्ट होतील ॥ ४७ ॥
म. ५९
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org