Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४१-२८)
महापुराण
स तां प्रदक्षिणीकृत्य बहिर्भागे सदोऽवनिम् । प्रविवेश विशामोशः कान्त्वा कक्षाः पृथग्विधाः ॥१९ मानस्तम्भमहाचैत्यद्रुमसिद्धार्थपादपान् । प्रेक्षमाणो व्यतीयाय स्तूपाश्चाचितपूजितान् ॥ २० चतुष्टयों वनश्रेणी ध्वजान्हावलीमपि । तत्र तत्रेक्षमाणोऽसौ तां तां कक्षामलङ्घयत् ॥ २१ प्रतिकक्ष सुरस्त्रीणां गीतैनृत्यैश्च हारिभिः । रज्यमानमनोवृत्तिस्तत्रास्यासीत्परा धृतिः ॥ २२० ततः प्राविक्षदुत्तङ्गगोपुरद्वारवर्त्मना । गणेरध्युषितां भूमि श्रीमण्डपपरिष्कृताम् ॥ २३ त्रिमेखलस्य पीठस्य प्रथमां मेखलामतः । सोऽधिरुह्य परीयाय धर्मचक्राणि पूजयन् ॥ २४ मेखलायां द्वितीयस्यां वरिवस्यन्महाध्वजान् । प्रापद्गन्धकुटी चक्री न्यक्कृतत्रिजगच्छ्यिम् ॥ २५ देवदानवगन्धर्वसिद्धविद्यापरेडितम् । भगवन्तमथालोक्य प्राणमद्भक्तिनिर्भरः ॥ २६ स्तुत्वा स्तुतिभिरीशानमभ्यर्च्यच यथाविधि । निषसाद यथास्थानं धर्मामृतपिपासितः॥ २७ भक्त्या प्रणमतस्तस्य भगवत्पादपङ्कजे । विशुद्धिपरिणामाङ्गमवधिज्ञानमुद्बभौ ॥ २८
समवसरणाच्या बाह्यभागी सभास्थानाला त्याने प्रदक्षिणा घातली व अनेक विभाग ओलांडून त्या प्रजेशभरताने आत प्रवेश केला ।। १९ ॥
मानस्तंभ, महाचैत्यवृक्ष व सिद्धार्थवृक्ष आणि ज्यांची पूजाअर्चा केली आहे अशा स्तूपाना पाहत तो भरतेश्वर पुढे गेला ।। २० ।।
अशोकवनादिक चार वनांची पंक्ति, ध्वज आणि प्रासादपंक्ति त्या त्या ठिकाणी पाहत त्यांना उल्लंघून तो पुढे गेला ।। २१ ।।
समवसरणाच्या प्रत्येक विभागात देवांगनांचे मनोहर गायन व नृत्य पाहून भरतेशाचे मन त्या गायननृत्यावर अनुरक्त झाले व त्यापासून त्याला मोठा सन्तोष वाटला ॥ २२ ॥
यानन्तर श्रीमण्डपाने शोभत असलेला व बारा गणांचा निवास जेथे आहे अशा सभास्थानी भरतचक्रीने अतिशय उंच अशा वेशीच्या द्वारमार्गांनी प्रवेश केला ॥ २३ ॥
यानंतर ज्याला तीन कट्टे आहेत, अशा पीठाकडे जाऊन पहिल्या कट्टयावर तो चढला. तेथे त्याने धर्मचक्रांचे पूजन करून त्यास प्रदक्षिणा घातल्या ।। २४ ।।
यानंतर दुसन्या कट्टयावरील महाध्वजांचे त्याने पूजन केले व त्रैलोक्याच्या शोभेला जिने तिरस्कृत केले आहे अशा गन्धकुटीजवळ तो चक्री पोहोचला ॥ २५ ।।
यानंतर देव, दैत्य, गन्धर्व, सिद्ध आणि विद्याधर या सर्वानी ज्याची स्तुति केली आहे अशा भगवन्ताला पाहून भक्तिरसाने पूर्ण भरलेल्या चक्रोने नम्र होऊन नमस्कार केला ॥ २६ ॥
यानंतर भरताने आदि प्रभूची स्तोत्रानी स्तुति केली व विधीला अनुसरून त्याना पूजिले. नंतर धर्मामृत प्राशन करण्याच्या इच्छेने योग्य स्थानी तो बसला ॥ २७ ॥
भक्तीने भगवंताच्या दोन चरणकमलाना नमस्कार करीत असता विशुद्धि परिणाम ज्याला कारण आहेत अशा अवधिज्ञानाने भरत फार शोभू लागला ॥ २८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org