Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७२)
महापुराण
एष धर्मप्रियः सम्राद्धर्मस्थानभिनन्दति । मत्वेति निखिलो लोकस्तदा धर्मे रति व्यषात् ॥ १०० स धर्मविजयी सम्राट् सवृत्तः शुचिजितः । प्रकृतिष्वनुरक्तासु व्यधाद्धर्मक्रियादरम् ॥ १०१ भरतो निरतो धर्मे वयं तदनुजीविनः । इति तद्वत्तमन्वीयु लिबद्धा महीक्षितः॥१०२ सोऽयं स्वाधीनकामार्थश्चक्री चक्रानुभावतः । चरितार्थद्वये तस्मिन्भेजे धर्मेकतानताम् ॥ १०३ वानं पूजां च शीलं च दिने पर्वण्युपोषितम् । धर्मश्चतुर्विधः सोऽयमाम्नातो गहमेधिनाम् ॥१०४ बवो वानमसौ सद्भ्यो मुनिभ्यो विहितादरम् । समेतो नवभिः पुण्यैर्गुणैः सप्तभिरन्वितः ॥ १०५
हा भरतचक्री धर्मावर प्रेम करणारा आहे व तो धर्माचरणात तत्पर असलेल्या लोकांचे अभिनंदन करतो, त्यांचा आदर करतो असे मानून सर्व लोक त्यावेळी धर्मावर प्रेम करू लागले ॥१०० ।।
ज्याला धर्माचरणाने जय प्राप्त झाला आहे असा तो सदाचारी, पवित्र आणि उत्कर्षशील भरतराजा आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रधान व प्रजा वगैरेवर त्याच्या धर्माचरणामुळे फार प्रेम करीत असे ।। १०१ ।।
भरतमहाराज धर्मात तत्पर आहेत व आम्ही त्यांचे नोकर आहोत म्हणून त्यांच्या चारित्रधर्मांचे अनुसरण करतो असे म्हणून मुकुटबद्ध राजानी त्याच्या चारित्र धर्माचे अनुसरण केले ॥ १०२ ॥
तो हा चक्रवर्ती चक्राच्या प्रभावाने अर्थ व कामपुरुर्षाना आपल्या स्वाधीन ठेवून या दोन पुरुषार्थात तो कृतकृत्य झालेला आहे म्हणून आता त्याने धर्मपुरुषार्थात एकाग्रता धारण केली आहे ॥ १०३ ॥
सत्पात्राना दान देणे, जिनपूजा करणे, व्रतांचे पालन ज्यानी करता येते अशा रीतीचे नियम पाळणे व पर्वतिथीच्या दिवशी उपोषण करणे असा गृहस्थांचा चार प्रकारचा धर्म सांगितला आहे ।। १०४ ॥
हा चक्री नऊ पुण्ये व सात गुणानी युक्त होऊन गुणवान् अशा अनेक मुनीना आदर करून दान देत असे. नऊ पुण्ये- १) प्रतिग्रह- मुनि आले असता त्यांचा आदराने स्वीकार करणे, २) उच्चस्थान- त्यांना उच्चासनावर बसविणे, ३) पादोदक- त्यांचे पाय धुणे, ४) पूजनअष्ट द्रव्यानी पूजा करणे अर्घ देणे, ५) प्रणाम नमस्कार करणे, ६) वचनशुद्धि, ७) मनःशुद्धि, ८) शरीरशुद्धि आणि ९) आहारशुद्धि या नऊ शुद्धि आहेत याना नऊ पुण्ये म्हणतात. १) दात्याचे सात गुण- भक्ति-पात्राच्या गुणावर प्रेम करणे, २) श्रद्धा- सत्पात्राला दिलेल्या दानापासून प्राप्त होणा-या फलावर विश्वास ठेवणे तो श्रद्धा गुण होय, ३) सत्त्व- दात्याचा उदारता गुण, ४) तुष्टि- दान देतेवेळी दात्याला होणारा हर्ष, ५) विज्ञान- पात्राला दान कसे द्यावे याची माहिती असणे, ६) क्षमा- क्रोधाचे कारण उपस्थित झाले तरी शांति धारण करणे, ७) अलुब्धता- दानफलाची इच्छा नसणे हे दात्याचे सात गुण आहेत ॥ १०५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org