Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४१-९१)
महापुराण
रेजः सूत्रेषु संप्रोता घण्टास्ताः परमेष्ठिनाम् । सदर्थघटिताष्टीका ग्रन्थानामिव पेशलाः ॥ ९१ लोकचूडामणेस्तस्य मौलिलग्ना विरेजिरे । पादच्छाया जिनस्येव घण्टास्ता लोकसम्मताः ॥ ९२ रत्नतोरणविन्यासे स्थापितास्ता निधीशिना । दृष्ट्वाहद्वन्दनाहेतोर्लोकोऽप्यासीत्कृतादरः ॥ ९३ पौरर्जनैरतः स्वेष वेश्मतोरणदामसु । यथाविभवमाबद्धा घण्टास्ताः सपरिच्छवाः ॥९४ आदिराजकृतां सृष्टि प्रजास्ता बहु मेनिरे । प्रत्यगारं यथाद्यापि लक्ष्या वन्दनमालिकाः ॥ ९५ वन्दनाथं कृता माला यतस्ता भरतेशिना । ततो वन्दनमालाख्यां प्राप्य रूढिं गताः क्षितौ ॥ ९६ धर्मशीले महीपाले यान्ति तच्छोलतां प्रजाः । अताच्छील्यमतच्छोले यथा राजा तथा प्रजाः॥९७ तदा कालानुभावेन प्रायो धर्मप्रिया नराः । साधीयः साधुवृत्तेऽस्मिन्स्वामिन्यासन् हिते रताः ॥९८ सुकालश्च सुराजा च समं सन्निहितं द्वयम् । ततो धर्मप्रिया जाताः प्रजास्तद्नुरोधतः ॥ ९९
। सूत्रानी अर्थात् उत्तम सोन्याच्या साखळ्यानी बांधलेल्या त्या अर्हदादिपरमेष्ठींच्या घण्टा अशा उत्तम शोभत असत की जणु त्या उत्तमोत्तम अर्थानी भरलेल्या व सूत्रांच्या-आगम वाक्यांच्या सुंदर टीका आहेत ।। ९१ ॥
लोकाला-जगाला चूडामणीप्रमाणे सुंदर वाटणारा-श्रेष्ठ वाटणारा अशा त्या भरताच्या मुकुटाला स्पर्श करणाऱ्या त्या लोकप्रिय घंटा जिनेश्वराच्या चरणाच्या जणु छाया आहेत अशा शोभत असत ।। ९२ ।।
निधिस्वामी अशा भरतेश्वराने जिनेश्वराना वंदन करण्याच्या हेतूने त्या घंटा रत्नाच्या तोरणाच्या रचनेत स्थापन केल्या होत्या. त्या पाहन लोक देखिल त्यांचा आदर करू लागले. अर्थात नागरिक लोक देखिल आपल्या घराच्या तोरणमालामध्ये आपल्या वैभवाला अनसरून जिनप्रतिमेच्या सामग्रीने युक्त अशा त्या घंटा बांधू लागले ॥ ९३-९४ ॥
पहिला राजा जो भरत त्याने केलेली ती सृष्टि ( दरवाजावरील तोरणामध्ये घंटा बांधण्याची पद्धति ) लोकाना फार पसन्त पडली व त्यामुळे प्रत्येक घराच्या दरवाजावर वंदनमाला आढळून येतात ।। ९५ ॥
ज्याअर्थी भरतचक्रीने वंदन करण्यासाठी ( जिनेश्वराचे स्मरण होऊन त्याना नमस्कार करण्याची प्रवृत्ति व्हावी म्हणून ) त्या माला बांधल्या असल्यामुळे त्यांना वंदनमाला हे नांव या पृथ्वीतलावर रूढ झाले ॥ ९६ ।।
राजा जर धर्मशील असेल तर प्रजाही तशाच धर्मशील बनतात व तो तसा अर्थात् धर्मशील नसेल तर प्रजाही धर्मशील होत नाहीत कारण जसा राजा असतो प्रजाही तशाच होतात ।। ९७ ॥
त्यावेळी कालाच्या सामर्थ्याने बहुत करून सर्व लोक धर्मप्रियच होते. सदाचारी भरतराजा असल्यामुळे सर्व प्रजाही आपल्या हितकर कार्यात तत्पर होत्या ॥ ९८ ।।
. धर्माला अनुकूल असा काल व चांगला राजा हे दोघेही एकत्र जुळले असल्यामुळे त्या दोवाना अनुसरून प्रजा वागू लागली म्हणून तीही धर्मप्रिय झाली ॥ ९९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org