Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४७० )
इत्याकर्ण्य गुरोर्वाक्यं स वर्णाश्रमपालकः । सन्देहकर्दमापायात्सुप्रसन्नमधान्मनः ॥ ८२ भूयो भूयः प्रणम्येशं समापृच्छ्य पुनः पुनः । पुनराववृते कृच्छ्रात्स प्रीतो गुर्वनुग्रहात् ॥ ८३ ततः प्रविश्य साकेतपुरमाबद्धतोरणम् । केतुमालाकुलं पौरैः सानन्दमभिवन्दितः ॥ ८४ शान्तिक्रियामतश्च दुःस्वप्नानिष्टशान्तये । जिनाभिषेकसत्पात्रदानाद्यैः पुण्यचेष्टितः ॥ ८५ गोदोहैः प्लाविता धात्री पूजिताश्च महर्षयः । महादानानि दत्तानि प्रीणितः प्रणयी जनः ॥ ८६ निर्मापितास्ततो घण्टा जिनबिम्बैरलङ्कृताः । परार्ध्यरत्न निर्माणाः सम्बद्धा हेमरज्जुभिः ॥ ८७ लम्बिताश्च बहिर्द्वारि ताश्चतुर्विंशतिप्रमाः । राजवेश्ममहाद्वार गोपुरेष्वप्यनुक्रमात् ॥ ८८ या किल विनिर्याति प्रविशत्यप्ययं प्रभुः । तदा मौल्यग्रलग्नाभिरस्य स्थादर्हतां स्मृतिः ॥ ८९ स्मृत्वा ततोऽर्हदर्चानां भक्त्या कृत्वाभिवन्दनाम् । पूजयत्यभिनिष्क्रामन्प्रविशश्च स पुण्यधीः ॥ ९०
महापुराण
याप्रमाणे जगद्गुरु श्री आदिभगवंताचे वचन ऐकून ब्राह्मण क्षत्रियादि वर्ण व ब्रह्मचर्यादि चार आश्रमांचे रक्षण करणाऱ्या भरतचक्रवर्तीचे मन संशयरूपी चिखल नाहीसा झाल्यामुळे अतिशय प्रसन्न झाले ॥ ८२ ॥
( ४१-८२
पुनः पुनः प्रभूला नमस्कार करून व पुनः पुनः विचारून गुरूच्या अनुग्रहाने आनंदित झालेला तो चक्रवर्ती मोठ्या कष्टाने परत नगराकडे जाण्यासाठी निघाला ॥ ८३ ॥
यानंतर जेथे जागोजागी तोरणे बांधलेली आहेत, जे अनेक ध्वजापताकानी युक्त आहे अशा साकेतनगरात चक्रीने प्रवेश केला तेव्हा नागरिकानी आनंदाने त्याचा बहुमान केला त्याला नमस्कार केला ॥ ८४ ॥
यानंतर वाईट स्वप्नाच्या अनिष्टांचा उपशम व्हावा म्हणून चक्रीने श्री जिनाभिषेक, सत्पात्राना आहारादि दान देणे वगैरे पुण्य क्रियानी शान्तिक्रिया केली ॥ ८५ ॥
त्या भरतचक्रेशाने गायीच्या दुधानी भूमि भिजविली, प्रोक्षण केले. महाऋषींची पूजा केली. मोठी दाने दिली व प्रेमळ मित्रादिकाना सन्तुष्ट केले ॥ ८६ ॥
यानंतर त्याने जिनबिंबानी युक्त व शोभणाऱ्या, उत्तम अमूल्य रत्नानी बनविलेल्या ज्याना सोन्याच्या साखळ्या बांधल्या आहेत अशा चोवीस घण्टा त्या चक्रीने निर्माण करविल्या. त्या घंटा नगराच्या बाहेरच्या महाद्वारावर व राजवाड्याच्या मोठ्या दरवाज्यावर आणि अनेक वेशीवर अनुक्रमाने बांधल्या ॥। ८७-८८ ॥
Jain Education International
जेव्हा जेव्हा हा चक्रवर्ती बाहेर जातो व आत येतो तेव्हा याच्या मुकुटाच्या अग्रभागाला त्यांचा स्पर्श होत असे व त्यावेळी त्याला जिनेश्वराचे स्मरण होत असे ।। ८९ ।। त्यावेळी त्या जिनप्रतिमांचें त्याला स्मरण होई व तो पुण्ययुक्त बुद्धीचा राजा भक्तीने जिन प्रतिमांचे वंदन करीत असे व बाहेर जाताना व प्रवेश करताना त्याचे पूजन करीत असे ॥ ९० ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org