Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६८)
महापुराण
(४१-६५
पुनरेकाफिनः सिंहपोतस्यान्वकमगेक्षणात् । भवेयुः सन्मतेस्तीर्थे सानुषङ्गाः कुलिगिनः ॥ ६५ करीन्द्रभारनिर्भग्नपृष्ठस्याश्वस्य वीक्षणात् । कृत्स्नांस्तपोगुणान्वोढुं नालं दुष्षमसाषवः ॥ ६६ मूलोत्तरगुणेष्वात्तसङ्गराः केचनालसाः । भक्ष्यन्ते मूलतः केचित्तेषु यास्यन्ति मन्दताम् ॥ ६७ निर्ध्यानादजयूथस्य शुष्कपत्रोपयोगिनः । यान्त्यसद्वृत्ततां त्यक्तसदाचाराः पुरा नराः ॥ ६८ करीन्द्रकन्धरारूढशाखामृगविलोकनात् । आविक्षत्रान्वयोच्छित्तो क्षमा पास्यन्त्यकुलीनकाः ।। ६९ कारुलूकसम्बाधवर्शनाद्धर्मकाम्यया । मुक्त्वा जैनान्मुनीनन्यमतस्थानन्वियुर्जनाः ॥ ७० प्रनृत्यतां प्रभूतानां भूतानामीक्षणात्प्रजाः । भजेयुर्नामकर्माधय॑न्तरान्देवतास्थया ॥७१ शुष्कमध्यतडागस्य पर्यन्तेम्बुस्थितीक्षणात् । प्रच्युत्यायनिवासात्स्याधर्मः प्रत्यन्तवासिषु ॥ ७२
पुनः एका सिंहाच्या बच्चाच्या मागे हरिण चालले आहेत असे दुसरे स्वप्न तू पाहिलेस त्याचे फल असे- सन्मति-महावीराच्या तीर्थप्रवर्तनकाली परिग्रहधारी अनेक कुलिंगी साधु उत्पन्न होतील ॥ ६५ ।।
___ यानंतर तिसऱ्या स्वप्नात मोठ्या हत्तीच्या ओझ्याने ज्याची पाठ वाकली आहे असा घोडा तू पाहिलास त्याचे फल असे- दुःषमकालातील- पंचमकालातील साधु- तपश्चरणाच्या सर्व गुणाना धारण करण्यास असमर्थ होतील. हे त्या स्वप्नाचे फल आहे ।। ६६ ।।
मूलगुण व उत्तरगुणांचे पालन करू अशी प्रतिज्ञा केलेले कित्येक मुनि आळशी होऊन ती प्रतिज्ञाच सगळी मोडून टाकतील व काही मुनि त्यांचे पालन करण्यात मंद होतील ।। ६७ ।।
वाळलेली पाने खाणारा बकऱ्यांचा समूह स्वप्नात तू पाहिलास त्याचे फल असेपुढील काली माणसे सदाचाराला त्यागूम दुराचारी होतील ।। ६८ ॥
मोठ्या हत्तीच्या खांद्यावर वानर चढून बसलेले तू स्वप्नात पाहिलेस. त्याचे फल असे- पुढील काली प्राचीन क्षत्रिय वंश नष्ट होऊन जातील व नीचकुलवाले राजे पृथ्वीचे पालन करतील ॥ ६९॥
कावळ्यानी घुबडाला पीडा दिली हे स्वप्नात पाहिलेस. त्याचे फल असे- धर्माच्या इच्छेने जैनमुनीना त्यागून लोक अन्य मतातल्या साधूंचे अनुयायी-भक्त बनतील ।। ७० ।।
नाचत असलेल्या पुष्कळ भूताना स्वप्नात पाहिलेस त्याचे फल असे-प्रजा नामस्मरण, पूजनादिकांच्या योगाने व्यन्तराना देव समजून भजतील ।। ७१ ॥
ज्याचा मध्यभाग शुष्क आहे व ज्याच्या सभोवती पाणी पसरले आहे असे तळे पाहिलेस त्याचे फळ असे- आर्य जेथे राहतात तेथून धर्म नाहीसा होऊन म्लेच्छांच्या देशात जाईल ।। ७२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org