Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
महापुराण
(४१-४८
तेऽमो जातिमदाविष्टा वयं लोकाधिका इति । पुरा दुरागमैलॊकं मोहयन्ति षनाशया ॥ ४८ सत्कारलाभसंवृद्धगर्वा मिथ्यामदोद्धताः । जनान्प्रतारयिष्यन्ति स्वयमुत्पाद्य दुःश्रुतीः ॥ ४९ त इमे कालपर्यन्ते विक्रियां प्राप्य दुर्दशः । धर्मद्रुहो भविष्यन्ति पापोपहतचेतनाः ॥५० सत्त्वोपघातनिरता मधुमांसाशनप्रियाः। प्रवृत्तिलक्षणं धर्म घोषयिष्यन्त्यषामिकाः ॥ ५१ अहिंसालक्षणं धर्म दूषयित्वा दुराशयाः । चोदनालक्षणं धर्म घोषयिष्यन्त्यमी बत ॥ ५२ पापसूत्रधरा धूर्ताः प्राणिमारणतत्पराः । वय॑द्युगे प्रवस्य॑न्ति सन्मार्गपरिपन्थिनः ॥ ५३ द्विजातिसर्जनं तत्स्यान्नाद्य यद्यपि दोषकृत् । स्याद्दोषबीजमायत्यां कुपाषण्डप्रदर्शनात् ॥ ५४ इति कालान्तरे दोषबीजमप्येतदञ्जसा । नाधना परिहर्तव्यं धर्मसृष्टयनतिक्रमात् ॥ ५५ यथान्नमुपयुक्तं सत्क्वचित्कस्यापि दोषकृत् । तथाप्यपरिहार्य तद्बुधैर्बहुगुणास्थया ॥ ५६
--------...................................
जातिगर्वाने मत्त झालेले हे ब्राह्मण आम्ही सर्वापेक्षा श्रेष्ठ आहोत असे समजून कुत्सित आगमाची रचना करून धनाशेने लोकाना मोहयुक्त करतील ॥ ४८ ।।
सत्काराच्या लाभामुळे यांच्या ठिकाणी गर्व वाढेल व मिथ्या अभिमानाने उद्धत होतील व स्वतः दुःश्रुति-वेदाची उत्पत्ति करून लोकाना फसवतील ॥ ४९ ॥
ज्यांचे श्रद्धान विपरीत बनले आहे असे हे ब्राह्मण या कृतयुगाच्या शेवटी पापाने ज्यांचे सम्यग्ज्ञान नष्ट झाले आहे असे होऊन अहिंसा धर्माचा द्वेष करतील ॥ ५० ॥
प्राणिहिंसेत तत्पर होतील, दारू, मध व मांसभक्षण यांना आवडेल व अधार्मिक बनून धर्म प्रवृत्तिलक्षण रूप आहे -प्राणिहिंसात्मक आहे अशी घोषणा करतील ॥ ५१ ॥
दुष्टाभिप्राय धारण करणारे हे ब्राह्मण अहिंसालक्षण ज्याचे आहे अशा धर्माला दोषयुक्त ठरवून वेदात सांगितलेल्या धर्माची घोषणा करतील. ही खेदाची गोष्ट होय ।। ५२ ॥
पापाचे समर्थन करणाऱ्या शास्त्राला जाणणारे, प्राण्यांना मारण्यात तत्पर राहणारे व व सन्मार्गाचे शत्रु असे हे धूर्त द्विज पुढे येणाऱ्या कलियुगात प्राणिहिंसात्मक यज्ञाची प्रवृत्ति करतील ॥ ५३ ॥
या ब्राह्मणांची उत्पत्ति जरी आज दोष उत्पन्न करणारी नाही तरी पण ती पुढे येणाऱ्या कलियुगात दोष उत्पन्न करण्यास बीजरूपाची होणार आहे. कारण त्यावेळी ती दुष्ट पाखण्डमताचे प्रदर्शन करील ॥ ५४ ॥
आणि कालान्तरी ही ब्राह्मणसृष्टि निश्चयाने दोषांचे बीजरूप असली तरीही आज या सृष्टीचा परिहार-संहार करू नये कारण आज या सृष्टीने धर्मसृष्टीचे उल्लंघन केले नाही ॥५५॥
___ जसे अन्न भक्षण केले असता एखादेवेळी एखाद्या व्यक्तीला दोष उत्पन्न करणारे होते. त्याच्या शरीरात दोषविकार उत्पन्न करणारे होते, तरीही ते पुष्कळ गुण उत्पन्न करणारे असल्यामुळे शाहण्यानी त्याचा त्याग करू नये ।। ५६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org