Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६४)
महापुराण
(४१-२९
पोस्वाथो धर्मपीयूषं परां तृप्तिमवापिवान् । स्वमनोगतमित्युच्चभगवन्तं व्यजिजपत् ॥ २९ मया सृष्टा द्विजन्मानः श्रावकाचारचञ्चवः । त्वद्गीतोपासकाध्यायसूत्रमार्गानुगामिनः ॥ ३० एकाकादशाङ्गानि दत्तान्येभ्यो मया विभो । व्रतचिह्नानि सूत्राणि गुणभूमिविभागतः ॥ ३१ विश्वस्य धर्मसर्गस्य त्वयि साक्षात्प्रणेतरि । स्थिते मयाति बालिश्यादिदमाचरितं विभो ? ॥ ३२ दोषः कोऽत्र गुणःकोऽत्र किमेतत्साम्प्रतं न वा । दोलायमानमिति मे मनः स्थापय निश्चिती ॥३३ अपि चाद्य मया स्वप्ना निशान्ते षोडशेक्षिताः । प्रायोऽनिष्टफलाश्चंते मया देवाभिलक्षिताः ॥३४ यथावृष्टमपन्यस्ये तानिमान्परमेश्वर । यथास्वं तत्फलान्यस्मत्प्रतीतिविषयं नय ॥ ३५ सिंहो मृगेन्द्रपोतश्च तुरगः करिभारभृत् । छागा वृक्षलतागुल्मशुष्कपत्रोपभोगिनः ॥ ३६ शाखामृगा द्विपस्कन्धमारूढाः कौशिकाः खगैः । विहितोपद्रवा ध्वाक्षः प्रमथाश्च प्रमोदिताः॥ ३७
यानंतर धर्मामृताचे प्राशन करून तो अतिशय तृप्त झाला आणि त्याने आपल्या मनातील अभिप्रायाबद्दल गंभीर स्वराने प्रभूला विनविले ॥ २९ ।।
हे प्रभो, श्रावकांच्या आचारधर्मात निपुण असे ब्राह्मण मी उत्पन्न केले आहेत व ते आपण सांगितलेण्या उपासकाध्ययनसूत्राच्या मार्गाला अनुसरणारे आहेत ।। ३० ॥
हे प्रभो, मी याना गुणभूमिविभागाला अनुसरून अर्थात् दर्शनप्रतिमा, व्रतप्रतिमा वगैरे प्रतिमा विभागाला अनुसरून एक-दोन-तीन अशा अकरा प्रतिमापर्यन्त व्रतांचे चिह्नस्वरूप अशी यज्ञोपवीते दिली आहेत ।। ३१ ॥
हे स्वामिन्, या सर्व धर्मसृष्टीचे प्रणेते आपण साक्षात् असता मी अतिशय मूर्खपणाने हे कृत्य केले आहे ॥ ३२ ॥
या माझ्या कार्यात दोष कोणता आहे किंवा गुण कोणता आहे अथवा हे माझे कार्य साम्प्रत-योग्य आहे किंवा नाही. याप्रमाणे झोपाळ्याप्रमाणे माझे मन झोके खात आहे. हे प्रभो, त्या माझ्या मनाला निश्चयात स्थिर करा ॥ ३३ ॥
हे प्रभो, आज रात्र संपण्याच्या वेळी- पहाटेच्या समयी सोळा स्वप्ने पाहिली. त्या सर्व स्वप्नांची फले बहुत करून अनिष्ट आहेत असे मला वाटते ॥ ३४ ॥
हे परमेश्वरा, मी ती स्वप्ने जशा क्रमाने पाहिली आहेत तशी मी आपणासमोर वर्णितो. त्याचे जसे फल आहे त्याची तशी प्रतीति मला येईल अशा रीतीने आपण मला त्याचे ज्ञान करून द्यावे ॥ ३५ ॥
सिंह, २) सिंहाचा बच्चा, ३) हत्तीचे ओझे वाहणारा घोडा, ४) झाडे, वेली व झुडपे यांची वाळलेली पाने खाणारे बकरे, ५) हत्तीच्या खांद्यावर बसलेली माकडे, ६) अनेक पक्ष्यानी व कावळयानी ज्यांना उपद्रव केला आहे अशी घुबडे, ७) आनंदित झालेली पिशाचभुते, ८) ज्याचा मध्यभाग शुष्क आहे व ज्याच्या सभोवती मात्र पुष्कळ पाणी पसरले आहे असे तळे, ९) धुळीने मळकट झालेला रत्नसमूह, १०) ज्याची पूजा केली जात आहे असा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org