Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६२)
महापुराण
( ४१-१०
तत्त्वावर्शे स्थिते देवे को नामास्मन्मतिभ्रमः । सत्यादर्शे करामर्शात्कः पश्येन्मुख सौष्ठवम् ॥ १० तदत्र भगवद्वक्त्रमडलादर्शदर्शनात् । युक्ता नस्तत्त्वनिर्णीतिः स्वप्नानां शान्तिकर्म च ॥ ११ अपि चास्मदुपज्ञं यद्विजलोकस्य सर्जनम् । गत्वा तदपि विज्ञाप्यं भगवत्पाद सन्निधौ ॥ १२ द्रष्टव्या गुरवो नित्यं प्रष्टव्याश्च हिताहितम् । महेज्यया च यष्टव्याः शिष्टानामिष्टमीदृशम् ॥१३ इत्यात्मगतमालोच्य शय्योत्सङ्गात्पराद्धर्चतः । प्रातस्तरां समुत्थाय कृतप्राभातिक क्रियः ॥ १४ ततः क्षणमिव स्थित्वा महास्थाने नृपैर्वृतः । वन्दनाभक्तये गन्तुमुद्यतोऽभूद्विशाम्पतिः ॥ १५ वृतः परिमितैरेव मौलिबद्धेरनूत्थितैः । प्रतस्थे वन्दनाहेतोविभूत्या परयाऽन्वितः ॥ १६ ततः क्षेपीय एवासौ गत्वा सैन्यैः परिष्कृतः । सम्राट् प्रापत्तमुद्देशं यत्रास्तेस्म जगद्गुरुः ॥ १७ दूरादेव जिनास्थानभूमिं पश्यन्निषीश्वरः । प्रणनाम चलन्मौलिघटिताञ्जलिकुड्मलः ॥ १८
प्रभु आदिभगवंत तत्त्वाचे स्वरूप दाखविण्यास दर्पणाप्रमाणे या भूतलावर विद्यमान आहेत. अशा वेळी आमच्या बुद्धीला हा भ्रम का बरे उत्पन्न व्हावा ? खरा आरसा आपल्यापुढे असता कोणता मनुष्य आपल्या हाताच्या स्पर्शाने आपल्या मुखाचा सुन्दरपणा पाहील बरे ? ॥ १० ॥
म्हणून येथे भगवंताचा मुखरूपी मंगलदायक दर्पण विद्यमान आहे. त्याचे दर्शन आपण घेतले असता स्वप्नांच्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय होईल व स्वप्नाचे शान्तिकर्मही करता येईल ॥। ११ ॥
याचप्रमाणे आम्ही जी प्रथमतःच ब्राह्मणलोकांची उत्पत्ति केली आहे तिचे देखिल वर्णन भगवंताच्या चरणाजवळ आम्हाला करता येईल ।। १२ ।
नेहमी गुरुजनाना पाहावे व त्यांना आपले हिताहित विचारावे व त्यांचा मोठा उत्सव करून पूजा करावी हे सज्जनांचे आवडते प्रिय कार्य आहे ॥ १३ ॥
याप्रमाणे भरतचक्रवर्तीने आपल्याशी विचार केला व नन्तर अमूल्य अशा शयनाचा त्याग केला व अगदी सकाळी तो उठला आणि सकाळची स्नानादिक कार्ये त्याने केली ॥ १४ ॥
यानंतर महासभागृहात काही वेळपर्यंन्त भरतचक्री राजानी घेरलेला असा बसला व नंतर वन्दना भक्तीसाठी जाण्यास उद्युक्त झाला ।। १५ ।।
आपल्याबरोबरच आसनावरून उठलेल्या काही थोड्या मुकुटबद्ध राजानी घेरलेला तो भरतचक्रेश्वर मोठ्या वैभवानं सहित होऊन आदिभगवंताना वंदन करण्यासाठी निघाला ॥ १६ ॥
यानन्तर लौकरच सेनासहित असा तो सम्राट् भरत अयोध्येहून निघून ज्या ठिकाणी जगद्गुरु आदिनाथ विराजमान होते तेथे जाऊन पोहोचला ।। १७ ।।
निधीश्वर भरताने दुरूनच प्रभूचे समवसरण - सभास्थान पाहिले व नम्र अशा मस्तकावर त्याने आपली दोन हाताची ओंजळ कळीच्या आकाराची करून ठेवली आणि त्याने नमस्कार केला ॥ १८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org