Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४६०)
महापुराण
(४०-२२२
इति भरतनरेन्द्रात्प्राप्तसत्कारयोगा। व्रतपरिचयचारूदारवृत्ताः श्रुतार्थाः ॥ जिनवृषभमतानुव्रज्यया पूज्यमानाः । जगति बहुमतास्ते ब्राह्मणाः ख्यातिमीयुः ॥ २२२
वृतस्थानथ तान्विधाय स भवानिक्ष्वाकु चूडामणिः । जैने वर्त्मनि सुस्थितान्द्विजवरान्सम्मानयन्प्रत्यहम् ॥ स्वं मेने कृतिनं मुदा परिगतः स्वां सृष्टिमुच्चैः कृताम् । पश्यन्कः सुकृती कृतार्थपदवी नात्मानमारोपयेत् ॥ २२३ ॥
इत्याचे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीते त्रिषष्टिलक्षणमहापुराणसखग्रहे द्विजोत्पत्तो क्रियामन्त्रानुवर्णनं नाम चत्वारिंशत्तमं पर्व ॥ ४० ॥
याप्रमाणे भरतचक्रवर्तीकडून ज्याना चांगला सत्कार मिळाला आहे, व्रतांच्या अभ्यासामुळे ज्यांचे चारित्र सुंदर-दोषरहित व महत्वाला प्राप्त झाले आहे, ज्यानी आगमाचा अर्थ जाणला आहे व जिनेश्वर वृषभांच्या मताला अनुसरून जे पूजिले जात आहेत असे बहुजनाना मान्य झालेले ते ब्राह्मण जगात प्रख्यात झाले ॥ २२२ ।।
यानन्तर इक्ष्वाकुकुलाचा चूडामणि महाराज भरताने त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना गृहस्थाचारात तत्पर केले व जैनमार्गात स्थिर केले आणि दररोज त्यांचा त्याने आदर केला व आनंदित होऊन स्वतःला त्याने कृतकृत्य मानले. बरोबरच आहे की, स्वतःच उत्पन्न केलेल्या आपल्या उत्कृष्ट सृष्टीला पाहणारा कोण पुण्यवान् पुरुष आपणाला कृतार्थ मानीत नाही बरे ? अर्थात् आपल्याकडून झालेल्या उत्कृष्ट कार्यामुळे प्रत्येक व्यक्तीला फार आनंद वाटतो व आपणास ती व्यक्ति कृतकृत्य मानून आनंदित होत असते ॥ २२३ ।।
____ याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादामध्ये ब्राह्मणांच्या उत्पत्तिप्रकरणात क्रियामंत्रांचे वर्णन करणारे हे चाळीसावे पर्व समाप्त झाले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org