Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४१-८१ )
पांसुषू सररत्नौघनिर्ध्यानादृद्धिमत्तमाः । नैव प्रादुर्भविष्यन्ति मुनयः पञ्चमे युगे ॥ ७३ शुनोऽचितस्य सत्कारैश्चरुभोजनदर्शनात् । गुणवत्पात्रसत्कार माप्स्यन्त्यव्रतिनो द्विजाः ॥ ७४ तरुणस्य वृषस्योच्चैर्नदतो विहृतीक्षणात् । तारुण्य एव श्रामण्ये स्थास्यन्ति न दशान्तरे ॥ ७५ परिवेषोपरक्तस्य श्वेतभानोनिशामनात् । नोत्पत्स्यते तपोभूत्सु समन:पर्ययोऽवधिः ॥ ७६ अन्योन्यं सह सम्भूय वृषयोर्गमनेक्षणात् । वत्र्त्स्यन्ति मुनयः साहचर्यातक विहारिणः ॥ ७७ बनावरणरुद्धस्य दर्शनादंशुमालिनः । केवलार्कोदयः प्रायो न भवेत्पञ्चमे युगे ॥ ७८ पुंसां स्त्रीणां च चारित्रच्युतिः शुष्कद्रुमेक्षणात् । महौषधिरसोच्छेदो जीर्णपर्णावलोकनात् ॥ ७९ स्वप्नानेवं फलानेतान्विद्धि दूरविपाकिणः । नाद्यदोषस्ततः कोऽपि फलमेषां युगान्तरे ॥ ८० इति स्वप्नफलान्यस्मद्बुद्ध्वा वत्स यथातथा । धर्मे मतिं दृढं धत्स्व विश्वविघ्नोपशान्तये ॥ ८१
महापुराण
धुळीनी मळकट झालेला रत्नांचा समूह पाहिल्याने पंचमकालात जैनमुनि ज्यांना ऋद्धि प्राप्त झाल्या आहेत असे होणार नाहीत || ७३ ॥
(४६९
पूजिलेल्या कुत्र्याला सत्काराने नैवेद्य खाऊ घालीत आहेत असे स्वप्न पाहिल्याचे फल असे- व्रतांचे पालन न करणारे व्रतरहित असे ब्राह्मण गुणयुक्त अशा उत्तम पात्राच्या सत्काराला प्राप्त होतील अर्थात् अव्रती ब्राह्मण महाव्रती जैनमुनीप्रमाणे आदरिले जातील ॥ ७४ ॥
तरुण असा बैल डरकाळी फोडीत चालत आहे असे पाहिले त्याचे फल असे- लोक तरुणावस्थेतच मुनिव्रताचे आचरण करतील. दुसऱ्या अवस्थेत वृद्धावस्थेत मुनिव्रताचे आचरण करणार नाहीत ।। ७५ ।।
ज्याच्या सभोवती खळे पडले आहे असा चंद्र पाहिल्याचे फल असे - तपश्चरणकरण्यात तत्पर असलेल्या मुनीना अवधिज्ञान व मन:पर्ययज्ञान उत्पन्न होणार नाही ।। ७६ ।।
दोन बैल एकमेकाबरोबर मिळून जात असलेले स्वप्नात तू पाहिलेस त्याचे फल असेमुनि संघरूपाने विहार करतील. एकटे विहार करणार नाहीत ।। ७७ ।।
मेघांच्या आवरणाने आच्छादित झालेला सूर्य पाहिलास त्याचे फल- पंचमयुगात - पंचमकालात प्रायः केवलज्ञान सूर्याचा उदय होणार नाही ।। ७८ ॥
वाळलेले झाड पाहिले त्याचे फल- पुरुष आणि स्त्रिया चारित्रापासून च्युत होतील आणि जीर्ण पाने स्वप्नात दिसली त्याचे फल, महान् वनस्पतीच्या रसांचा नाश होईल ।। ७९ ।। ज्यांच्या फलांचे अनुभव फार दूर कालाने येणार आहेत अशी ही स्वप्ने आहेत असे हे वत्सा तू समज. म्हणून आज या स्वप्नापासून काही दोष उत्पन्न होणार नाही. यांची फले युगान्तरी-पंचमकाली प्राप्त होतील ॥ ८० ॥
Jain Education International
याप्रमाणे आमच्यापासून ही स्वप्न फले जाणून हे वत्सा, तू जगाचे विघ्न शान्त व्हावे म्हणून धर्मात आपली बुद्धि दृढपणाने ठेव ।। ८१ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org