________________
४०-२०४)
महापुराण
करतो
तस्मादवध्यतामेव पोषयेद्वामिके जने । धर्मस्य तद्धि माहात्म्यं तत्स्थो यन्नाभिभूयते ॥ १९६ तदभावे च वध्यत्वमयमच्छति सर्वतः । एवं च सति धर्मस्य नश्यत्प्रामाण्यमहताम् ॥ १९७ ततः सर्वप्रयत्नेन रक्ष्यो धर्मः सनातनः। स हि संरक्षितो रक्षां करोति सचराचरे ॥ १९८ स्याददण्डयत्वमप्येवमस्य धर्मे स्थिरात्मनः । धर्मस्थो हि जनोऽज्यस्य दण्डप्रस्थापने प्रभः ॥ १९९ तधर्मस्थीयमाम्नायं भावयन्धर्मदर्शिभिः । अधर्मस्थेषु दण्डस्य प्रणेता धार्मिको नपः ॥ २०० परिहार्य यथा देवगुरुद्रव्यं हितार्थिभिः । ब्रह्मस्वं च तथाभूतं न दण्डाहस्ततो द्विजः ॥ २०१।। युक्त्यानया गुणाधिक्यमात्मन्यारोपयन्वशी । अदण्डयपक्षे स्वात्मानं स्थापयेद्दण्डधारिणाम् ॥ २०२ अधिकारे ह्यसत्यस्मिन्स्याद्दण्डयोऽयं यथेतरः । ततश्च निस्स्वतां प्राप्तो नेहामुत्र च नन्दति ॥२०३ मान्यत्वमस्य सन्धत्ते मानाहत्वं सुभावितम् । गुणाधिको हि मान्यः स्याद्वन्धः पूज्यश्च सत्तमैः ॥२०४
म्हणून धार्मिक जनामध्ये त्याने आपल्या अवध्यतेचे पोषण केले पाहिजे व धर्माचे तर असे माहात्म्य आहे की धर्मतत्पर मनुष्य कोणाकडूनही तिरस्कृत होत नाही ॥ १९६ ॥
___ अवध्याधिकाराच्या अभावी हा ब्राह्मणसमूह सर्वाकडून वध्य होईल आणि असे झाले असता जिनेन्द्रानी सांगितलेल्या धर्माची प्रमाणता-खरेपणा नष्ट होईल ॥ १९७ ॥
म्हणून सर्व प्रकारच्या प्रयत्नानी हा प्राचीन कालापासून चालत असलेला सत्य धर्म रक्षिला पाहिजे व त्याचे रक्षण केले गेले असता तो सवाचे रक्ष
। १९८॥ याचप्रमाणे धर्मात जो अन्तःकरणाने स्थिर राहिला आहे अशा या ब्राह्मणाचे अदण्डयत्व देखिल - अदण्ड्य अधिकारही स्थिर राहील. कारण धर्मात स्थिर राहणारा जो आहे तोच अन्याला दण्ड करण्यास समर्थ होतो ।। १९९ ॥ ।
जो राजा धार्मिक आहे तो धर्मज्ञान ज्याना आहे त्यांच्याशी धर्मविषयक आगमाचा विचार करतो व अधर्मात प्रवृत्त झालेल्या लोकाना दण्डित करतो व अशा राजाला धार्मिक राजा म्हणतात ॥ २०० ॥
__आपले कल्याण व्हावे असे इच्छिणाऱ्यानी जसे देवद्रव्य व गुरुद्रव्य घेऊ नये तसेच ब्राह्मणाचेही द्रव्य घेऊ नये म्हणून ब्राह्मण दण्डाह-दण्डित करण्यास योग्य नाही ।। २०१॥
अशा युक्तीने जितेन्द्रिय ब्राह्मणाने आपल्या ठिकाणी गुणांचा अधिकपणा स्थापन करावा व दंड करण्याचे सामर्थ्य धारण करणाऱ्या राजांच्या अदण्ड्य पक्षात आपल्याला सिद्ध करावे ॥ २०२॥
__हा अदण्डयाधिकार नसेल तर इतर लोकाप्रमाणे हा ब्राह्मणही दण्डित करण्यास योग्य होईल व त्यामुळे हा निःस्व-दरिद्री होईल व इहपरलोकी सुखी होणार नाही ।। २०३।।
__ या ब्राह्मणाने प्राप्त करून घेतलेला जो मान आहे तो याला मान्यपणा आणून देतो व जो गुणानी युक्त आहे तो ब्राह्मण मान्य व वन्द्य होतो व तोच सज्जनानी पूजा करण्यास योग्य होतो ।। २०४॥ म. ५८
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org