________________
४५६)
महापुराण
(४०-१८७
रक्ष्यः सृष्टयधिकारोऽपि द्विजैरुत्तमसृष्टिभिः । असदृष्टिकृतां सृष्टि परिहत्य विदूरतः ॥ १८७ अन्यथासृष्टिवादेन दुर्दष्टेन कुदृष्टयः । लोकं नृपांश्च सम्मोह्य नयन्त्युत्पथगामिताम् ॥ १८८ सृष्टयन्तरमतो दूरमपास्य नयतत्त्ववित् । अनादिक्षत्रियः सृष्टां धर्मसृष्टि प्रभावयेत् ॥ १८९ तीर्थकृद्भिरियं सृष्टा धर्मसृष्टिः सनातनी । तां संश्रितान्नृपानेव सृष्टिहेतून्प्रकाशयेत् ॥ १९० अन्यथान्यकृतां सृष्टि प्रपन्नाः स्युनूपोत्तमाः । ततो नैश्वर्यमेषां स्यात्तत्रस्थाश्च स्युराहताः ॥ १९१ व्यवहारेशितां प्राहुः प्रायश्चित्तादिकर्मणि । स्वतन्त्रता द्विजस्यास्य श्रितस्य परमां श्रुतिम् ॥ १९२ तदभावे स्वमन्यांश्च न शोधयितुमर्हति । अशुद्धः परतः शुद्धिमभीप्सन्न्यक्कृतो भवेत् ॥ १९३ स्यादवध्याधिकारेऽपि स्थिरात्मा द्विजसत्तमः । ब्राह्मणो हि गुणोत्कर्षान्नान्यतो वधमर्हति ॥ १९४ सर्वः प्राणी न हन्तव्यो ब्राह्मणस्तु विशेषतः । गुणोत्कर्षापकर्षाभ्यां वधेऽपि द्वयात्मता मता ॥१९५
ज्यांची सृष्टि-उत्पत्ति उत्तम आहे अशा जैन द्विजानी मिथ्यादृष्टिलोकांच्याद्वारे केलेल्या सृष्टीला दूरूनच त्यागणे योग्य आहे ॥ १८७ ।।
जर असे त्यानी केले नाही तर मिथ्यादृष्टि लोक आपल्या दूषित सृष्टिवादाने लोकाना आणि राजाना मोहित करून कुमार्गगामी बनवितील ॥ १८८ ॥
नय व तत्त्वांचे स्वरूप जाणणाऱ्या ब्राह्मणाने मिथ्यादृष्टीच्या अन्य सृष्टीचा दुरूनच त्याग करावा आणि अनादि क्षत्रियांनी उत्पन्न केलेल्या धर्म सृष्टीचीच प्रभावना करावी ॥१८९।।
ही तीर्थकरानी रचलेली धर्मसृष्टि सनातन आहे- अनादिकालाची आहे. अशा या धर्म सृष्टीचा आश्रय घेणाऱ्या राजाना या धर्मसृष्टीच्या कारणांचे वर्णन स्पष्ट करून सांगावे ।। १९० ॥
जर ब्राह्मणानी या धर्मसृष्टीचे वर्णन व तिची कारणे स्पष्ट सांगितली नाहीत तर ते राजे अन्य लोकानी केलेल्या धर्मसृष्टीला मानतील व त्यामुळे त्यांचे ऐश्वर्य-प्रभुत्व नाहीसे होईल. ते राजे ब्राह्मणांच्या अधीन होतील व जिनमतानुयायी लोक देखील त्या धर्मसृष्टीला मानतील. त्या धर्माचे अनुयायी होतील ॥ १९१ ॥
परमागमाचा आश्रय करणाऱ्या या ब्राह्मणाचा प्रायश्चित्तादि कार्यामध्ये जो स्वतन्त्रपणा आहे त्यालाच व्यवहारेशिता म्हणतात. असे पूर्वाचार्य म्हणतात ॥ १९२ ॥
व्यवहारेशिता त्याच्या ठिकाणी नसेल तर तो स्वतःला व इतरानाही शुद्ध करण्यास समर्थ होणार नाही व अशुद्ध असा तो ब्राह्मण इतराकडून आपणाला शुद्ध करून घेण्यास इच्छील तर ते त्याचा तिरस्कार करतील ॥ १९३ ॥
ज्याचे मन स्थिर आहे असा हा श्रेष्ठ ब्राह्मण अवघ्याधिकारातही योग्य आहे. कारण याच्या ठिकाणी गुणांचा उत्कर्ष झाला असल्यामुळे तो इतराकडून वध करण्यास योग्य होत नाही ॥ १९४ ॥
___ सर्व प्राणि मारू नयेत व ब्राह्मण तर विशेष करून अवध्य आहे. गुणांचा उत्कर्ष व गुणांचा अपकर्ष यामुळे वधामध्ये देखील दोन प्रकार उत्पन्न झाले आहेत ॥ १९५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org