Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५४)
महापुराण
(४०-१७०
अदीक्षार्हे कुले जाता विद्याशिल्पोपजीविनः । एतेषामुपनीत्यादिसंस्कारो नाभिसंमतः ॥ १७० तेषां स्यादुचितं लिङ्ग स्वयोग्यवतधारिणाम् । एकशाटकधारित्वं संन्यासमरणावधि ॥ १७१ स्यान्निरामिषभोजित्वं कुलस्त्रीसेवनव्रतम् । अनारम्भवधोत्सर्गो ह्यभक्ष्यापेयवर्जनम् ॥ १७२ इति शुद्धितरां वृत्ति व्रतपूतामुपेयिवान् । यो द्विजस्तस्य सम्पूर्णो व्रतचर्याविधिः स्मृतः ॥ १७३ दशाधिकारास्तस्योक्ताः सूत्रेणोपासिकेन हि । तान्यथाक्रममुद्देशमात्रेणानुप्रचक्ष्महे ॥ १७४ तत्रातिबालविद्याद्याः कुलावधिरनन्तरम् । वर्णोतमत्वपात्रत्वे तथा सृष्टयधिकारिता ॥ १७५ व्यवहारेशितान्या स्यादवध्यत्वमदण्डयता । मानार्हता प्रजासम्बन्धान्तरं चेत्यनक्रमात् ॥ १७६ दशाधिकारि वास्तूनि स्युरुपासकसङग्रहे । तानीमानि यथोद्देशं सङक्षेपेण विवृण्महे ॥ १७७ बाल्यात्प्रभृति या विद्या शिक्षोद्योगाद्विजन्मनः । प्रोक्तातिबालविद्येति सा क्रिया द्विजसम्मता ॥
दीक्षा घेण्यास अधिकार नसलेल्या कुलात ज्यांचा जन्म झालेला आहे व जे गाणे, नृत्य करणे अशा विद्या व शिल्प यावर ज्यांची उपजीविका चालते अशाना उपनयनादिक संस्कार करणे हे शास्त्रसंमत नाही ।। १७० ॥
स्वतःला योग्य असे व्रत त्यानी धारण करावे व अशांचे योग्य लिंग असे आहे- म्हणजे त्यांनी संन्यासमरणापर्यन्त एक छाटी धारण करावी ॥ १७१ ।।
यज्ञोपवीत धारण करणारे अशा द्विजाने अमुक पदार्थ मला आज जेवावयास मिळावा अशी इच्छा धारण न करता जो शुद्ध पदार्थ मिळेल तो त्याने खावा अर्थात् त्याने आपल्या इच्छेला आळा घालावा. त्याने आपल्या विवाहित स्त्रीमध्येच सन्तुष्ट राहावे. त्याने शेतकी व उद्योग-व्यापार याशिवाय होणाऱ्या हिंसेचा त्याग करावा. अभक्ष्य म्हणजे मांसादिक व अपेय म्हणजे दारू मध वगैरेंचा त्याग करावा. हे मद्यादिक अपेय आहेत त्यांचा आजीवन त्याग करावा ॥ १७२ ।।
याप्रमाणे व्रताने पवित्र झालेली अधिक शुद्ध अशी वृत्ति-उपजीविका जो धारण करतो अशा त्या द्विजाचा तो संपूर्ण व्रतचर्याविधि येथे समजावा ।। १७३ ॥
त्या द्विजासाठी येथे दहा अधिकारांचे वर्णन उपासकाचाराच्या सूत्राने सांगितले आहे त्याचे येथे क्रमाने नांवे आम्ही सांगत आहोत ।। १७४ ।।
___ अतिबालविद्या हा पहिला अधिकार, यानंतर २) कुलावधि, ३) वर्णोत्तमत्व, ४) पात्रत्व, ५) सृष्टयधिकार, ६) व्यवहारेशिता, ७) अवध्यत्व, ८) अदण्डयत्व, ९) मानार्हता, १०) प्रजासम्बन्धान्तर असे अनुक्रमाने दहा अधिकार आहेत. अर्थात् त्या दहा अधिकाराचे येथे आम्ही वर्णन करतो ॥ १७५-१७७ ।।
ब्राह्मणाला बालपणापासूनच विद्या शिकविण्याचा जो उद्योग -प्रयत्न केला जातो त्याला बालविद्या हे नाव आहे. ही विद्या ब्राह्मणाना अत्यन्त इष्ट आहे ।। १७८ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org