Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५२)
महापुराण
उपनीतिक्रियामन्त्रं स्मरन्तीमं द्विजोत्तमाः । परमनिस्तारकादिलिङ्गभागी भवेत्यतः ।। १५३ युक्तं परमर्षिलिङ्गेन भागी भव पदं भवेत् । परमेन्द्रादिलिङ्गादिभागी भव पदं परम् ॥ १५४ एवं परमराजादिपरमार्हन्त्यादि च क्रमात् । युक्तं परमनिर्वाणपदेन च शिखापदम् ।। १५५ चूणि:- परमनिस्तारकलिङ्गभागी भव । परमर्षिलिङ्गभागी भव । परमेन्द्र लिङ्गभागी भव । परमराज्यलिङ्गभागी भव । परमार्हन्त्यलिङ्गभागी भव, परमनिर्वाणलिङ्गभागी भव । ( इत्युपनीतिक्रियामन्त्रः )
या उपनीतिसंस्काराचे विशेषवर्णन
( ४०-१५३
मन्त्रेणानेन शिष्यस्य कृत्वा संस्कारमादितः । निर्विकारेण वस्त्रेण कुर्यादेनं सवाससम् ॥ १५६ कौपीनाच्छादनं चैनमन्तर्वासेन कारयेत् । मौञ्जीबन्धमतः कुर्यादनुबद्धत्रिमेखलम् ।। १५७ सूत्रं गणधरैर्दृब्धं व्रतचिह्नं नियोजयेत् । मन्त्रपूतमतो यज्ञोपवीती स्यादसौ द्विजः ॥ १५८ जात्यैव ब्राह्मणः पूर्वमिदानीं व्रतसंस्कृतः । द्विर्जातो द्विज इत्येवं रूढिमास्तिनुते गुणैः ॥ १५९ देयान्यणुव्रतान्यस्मै गुरुसाक्षि यथाविधि । गुणशीलानुगैश्चैनं संस्कुर्याद्व्रतजातकैः ॥ १६०
द्विजोत्तम श्रेष्ठ जैनब्राह्मण उपनीतिक्रियेचे मंत्र याप्रमाणे सांगतात- १) परम निस्तारकलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट गृहस्थाचार्यांच्या चिह्नांना धारण करणारा हो. २) परषिलिङ्गभागी भव- तूं उत्तम ऋषि - आचार्य परमेष्ठीचे पद चिह्न धारण करणारा हो. ३) परमेन्द्रलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट इन्द्रपदाची चिह्न धारण करणारा हो. ४) परमराज्य - लिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट राज्याची चिह्न धारण करणारा हो. ५) परमार्हन्त्यलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट अर्हत्पदाची चिह्ने धारण करणारा हो. ६) परमनिर्वाणलिङ्गभागी भव- तूं उत्कृष्ट मोक्षाच्या चिह्नाना धारण करणारा हो. याप्रमाणे उपनीतिक्रियेच्या मंत्राचा अर्थ आहे ।। १५३ - १५५ ।।
वर सांगितलेल्या मंत्रानी प्रथमतः शिष्यावर संस्कार करावा व त्याला निर्विकार अशा वस्त्राने युक्त करावे ।। १५६ ।।
या वस्त्राच्या आत लंगोटीचे आच्छादन असावे व त्या लंगोटीवर तीन पदरांचा मुंज गवताने बनविलेला कडदोरा बांधावा ।। १५७ ।।
यानंतर गणधरानी वर्णिलेले व मंत्रानी पवित्र झालेले व व्रताचे चिह्न असलेले असे यज्ञोपवीत त्याच्या गळ्यात घालावे. अशा रीतीने तो ब्राह्मण होतो ।। १५८ ।।
पूर्वी तो जातीनेच ब्राह्मण होता पण आता तो व्रतानी संस्कृत झाला. त्यामुळे तो गुणानी दोन वेळा उत्पन्न झाला म्हणून द्विज या नावाला तो धारण करतो ।। १५९ ।।
Jain Education International
अशा या उपनयनसंस्कारयुक्त या ब्राह्मणाला गुरुसाक्षीने अणुव्रते द्यावीत आणि व्रतसमूहानी - गुणव्रते व शीलव्रतानी याला उत्तम संस्कारयुक्त करावे अर्थात् त्याला पाच अणुव्रते, तीन गुणव्रते व चार शिक्षाव्रते देऊन सुसंस्कृत करावे ।। १६० ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org