Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४०-१६९)
महापुराण
(४५३
ततोऽतिबालविद्यादीन्नियोगादस्य निदिशेत् । दत्त्वोपासकाध्ययनं नामापि चरणोचितम् ॥ १६१ ततोऽयं कृतसंस्कारः सिद्धार्चनपुरःसरम् । यथाविधानमाचार्यपूजां कुर्यादतः परम् ॥ १६२ तस्मिन्दिने प्रविष्टस्य भिक्षार्थ जातिवेश्मसु । योऽर्थलाभः स देयः स्यादुपाध्यायाय सादरम् ॥१६३ शेषो विधिस्तु प्राक्प्रोक्तस्तमनूनं समाचरेत् । यावत्सोऽधीतविद्यः सन्भजेत्स ब्रह्मचारिताम् ॥ अथातोऽस्य प्रवक्ष्यामि व्रतचर्यामनुक्रमात् । स्याद्यत्रोपासकाध्यायः समासेनानुसंहृतः ॥ १६५ शिरोलिङ्गमुरोलिङ्ग लिङ्ग कटयूरुसंश्रितम् । लिङ्गमस्योपनीतस्य प्राग्निर्णीतं चतुर्विधम् ॥ १६६ तत्तु स्यादसिवृत्त्या वा मष्या कृष्या वणिज्यया। यथास्वं वर्तमानानां सदृष्टीनां द्विजन्मनाम्॥१६७ कुतश्चित्कारणाद्यस्य कुलं सम्प्राप्तदूषणम् । सोऽपि राजादिसम्मत्या शोधयेत्स्वं यदा कुलम् ॥१६८ तदास्योपनयाहत्वं पुत्रपौत्रादिसन्ततौ । न निषिद्धं हि दीक्षार्हे कुले चेदस्य पूर्वजाः ॥ १६९
त्याला उपासकाध्ययन द्यावे म्हणजे श्रावकाचाराचे शिक्षण द्यावे व त्याला चारित्रानुसार नांव देखिल योग्य असे ठेवावे. अतिबालविद्यादिकाची माहिती करून द्यावी ।। १६१ ।।
याप्रमाणे ज्याच्यावर सिद्धपूजनपूर्वक संस्कार केले आहेत अशा या उपनीतद्विजबालकाने विधिपूर्वक आचार्यपूजा करावी ।। १६२ ॥
त्यादिवशी भिक्षेसाठी त्या ब्राह्मणबटूने आपल्या जातीच्या घरी जावे व त्या भिक्षेच्या दिवशी जो अर्थलाभ होईल तो उपाध्यायाला आदराने द्यावा ॥ १६३ ॥
बाकीचा जो विधि पूर्वी सांगितला आहे तो सर्व पूर्णपणे आचरणात आणावा व जोपर्यन्त तो विद्याध्ययन करील तोपर्यन्त त्याने ब्रह्मचर्यव्रताचे पालन करावे ॥ १६४ ॥
यानन्तर याच्या वतचर्येचे मी अनुक्रमाने वर्णन करतो. या वर्णनात-व्रतचर्या वर्णनात संक्षेपाने उपासकाध्यायाचा संग्रह केला आहे ॥ १६५ ॥
___ ज्याची उपनयक्रिया केली गेली आहे अशा याचे चार प्रकारचे लिंग पूर्वी वणिले आहे, ते असे शिरोलिङ्ग- शेंडी ठेवणे, उरोलिङ्ग- यज्ञोपवीत धारण करणे, कटिलिंग- कडदोरा मुंजाचा धारण करणे व ऊरूलिंग- शुभ्रवस्त्र धारण करणे ॥ १६६ ॥
जे शस्त्र धारण करून अजीविका करतात, जे लेखन कलेने उपजीविका करतात, जे शेतकीने उदरनिर्वाह करतात व जे वणिज्येने– व्यापार करून उदरनिर्वाह करतात, असे ते आपणास योग्य अशा वृत्तीने वागणारे सम्यग्दृष्टि लोक आहेत ॥ १६७ ॥
त्यांचे कुल काही कारणामुळे जर दूषित झाले तर त्याने राजा आदिकांची संमति मिळवून आपल्या कुलाची शुद्धि करून घ्यावी ।। १६८ ।।
अर्थात् ज्याचे पूर्वज दीक्षा घेण्यास योग्य अशा कुलामध्ये जर जन्मलेले असतील तर याच्या पुत्र, नातू, पणतू आदि सन्ततीच्या परम्परेत उपनयाला योग्यता आहे तिचा निषेध नाही असे समजावे ॥ १६९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org