Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४०-१८६)
महापुराण
(४५५
तस्यामसत्यां मूढात्मा हेयादेयानभिज्ञकः । मिथ्याश्रुतं प्रपद्येत द्विजन्मान्यैः प्रतारितः ॥ १७९ बाल्य एव ततोऽभ्यस्येद् द्विजन्मौपासिकों श्रुतिम् । स तया प्राप्तसंस्कारः स्वपरोत्तारको भवेत् ॥ कुलावधिः कुलाचाररक्षणं स्याद्विजन्मनः । तस्मिन्नसत्यसो नष्ट क्रियोऽन्यकुलतां व्रजेत् ॥ १८१ वर्णोत्तमत्त्वं वर्णेषु सर्वेष्वाधिक्यमस्य वै। तेनायं श्लाघ्यतामेति स्वपरोद्धारणक्षमः ॥ १८२ वर्णोत्तमत्वं यद्यस्य न स्यान्न स्यात्प्रकृष्टता । अप्रकृष्टश्च नात्मानं शोधयन्न परानपि ॥ १८३ ततोऽयं शुद्धिकामः सन्सेवेतान्यं कुलिङगिनम् । कुब्रह्म वा ततस्तज्जान्दोषान्प्राप्नोत्यसंशयम् ॥१८४ प्रदानाहत्वमस्येष्टं पात्रत्वं गुणगौरवात् । गुणाधिको हि लोकेऽस्मिन्पूज्यः स्याल्लोकपूजितः ॥ १८५ ततो गुणकृतां स्वस्मिन्पात्रतां दृढ़येद्विजः । तदभावे विमान्यत्वाहियर्तेऽस्य धनं नृपैः ॥ १८६
तो बालविद्या युक्त जर नसेल अर्थात् बालपणी जर ब्राह्मणाने अध्ययन केले नाही तर तो ब्राह्मण मूढ राहील. त्याला त्याज्य व ग्राह्य याचे ज्ञान होणार नाही व अन्यधर्मीयानी फसविल्याने तो मिथ्याज्ञानाचा स्वीकार करून कुमार्गी बनेल ।। १७९ ॥
___म्हणून बालपणीच ब्राह्मणाने उपासकचाराचे-श्रावकाचाराचे अध्ययन करावे व त्याच्या अध्ययनाने सुसंस्कृत झालेला तो स्वतःचा व इतरांचा उद्धार करण्यास समर्थ होईल ॥ १८० ॥
अशा सुशिक्षित ब्राह्मणापासून आपल्या कुलाच्या आचारांचे रक्षण होते व त्याला कुलावधि म्हणतात व त्या कुलाचाराचे जर रक्षण झाले नाही तर ते सर्व कुलाचार नष्ट होऊन तो ब्राह्मण अन्य कुलाला प्राप्त होईल ।। १८१ ।।
सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ होणे हीच याची वर्णोत्तमक्रिया आहे. या वर्णोत्तमपणाने हा प्रशंसनीय होतो आणि स्वतःचा व इतरांचा उद्धार करण्यास समर्थ होतो ॥ १८२ ॥
___ जर याच्या ठिकाणी वर्णोत्तमपणा राहिला नाही तर याला श्रेष्ठता प्राप्त होणार नाही व हीनावस्थेला प्राप्त झालेला हा आपणास शुद्ध करू शकत नाही व इतराना शुद्ध करू शकणार नाही ।। १८३ ।।
__ व स्वतःला शुद्धता प्राप्त व्हावी म्हणून हा अन्यकुलिंगीची किंवा इतर कुदृष्टि ब्राह्मणाची सेवा करील व त्यामुळे त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या दोषाना हा निःसंशय प्राप्त होईल ।। १८४ ॥
__ हा ब्राह्मण गुणानी श्रेष्ठ झाल्यामुळे याच्या ठिकाणी दान घेण्याची योग्यता व पात्रत्वाला हा प्राप्त होतो व जगात जो गुणानी अधिक आहे तोच लोकपूजित अशा लोकाकडून पूज्य होतो ॥ १८५ ॥
म्हणून ब्राह्मणाने आपल्या ठिकाणी गुणामुळे प्राप्त झालेल्या पात्रतेला दृढ करावे व त्या पात्रतेच्या अभावी तो ब्राह्मण जनमान्य होणार नाही व मान्यतेच्या अभावी याचे धन राजे लोकाकडून हरण केले जाईल ।। १८६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org