Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४५०)
महापुराण
(४०-१४१
प्राशनेऽपि तथा मन्त्रपदस्त्रिभिरुदाहरेत् । तानि दिब्यविजयाक्षीणामतपदानि वै ॥ १४१ भागी भवपदेनान्ते युक्तेनानुगतानि च । पदैरेभिरयं मन्त्रः प्रयोज्यः प्राशने बुधैः ॥ १४२ चूणिः- दिव्यामृतभागी भव । विजयामृतभागी भव । अक्षीणामृतभागी भव । व्युष्टिः ।। व्युष्टिक्रियाश्रितं मन्त्रमितो वक्ष्ये यथाश्रुतम् । तत्रोपनयनं जन्मवर्षवर्द्धनवाग्युतम् ॥ १४३ भागी भवपदं ज्ञेयमादौ शेषपदाष्टके । वैवाहनिष्ठशब्देन मुनिजन्मपदेन च ॥ १४४ सुरेन्द्रजन्मना मन्दराभिषेकपदेन च । यौवराज्यमहाराज्यपदाभ्यामप्यनुक्रमात् ॥ १४५ परमार्हन्त्यराज्याभ्यां वर्षवर्धनसंयुतम् । भागी भव पदं योज्यं ततो मन्त्रोऽयमुद्भवेत् ॥ १४६ चणिः- उपनयनजन्मवर्षवर्धनभागी भव। वैवाहनिष्ठवर्षवर्धनभागी भव । मुनीन्द्रजन्मवर्षवर्धनभागी
भव। सुरेन्द्रजन्मवर्षवर्धनभागी भव । मन्दराभिषेकवर्षवर्धनभागी भव। यौवराज्यवर्षवर्धनभागी भव । महाराज्यवर्षवर्धनभागी भव । परमराज्यवर्षवर्धनभागी भव । आर्हन्त्यराज्यवर्षवर्धनभागी भव । व्युष्टिक्रियामन्त्रः ॥
अन्नप्राशनक्रियेच्या वेळी तीन पदानी मन्त्र म्हणावेत ते असे- दिव्य, विजय व अक्षीण या शब्दापुढे अमृतभागी भव हे शब्द विद्वानांनी जोडावेत म्हणजे दिव्यामृतभागी भवदिव्य अमृत भक्षण करणारा हो। विजयामृतभागी भव- विजयरूपी अमृताचा भोक्ता हो व अक्षीणामृतभागी भव- कधीही न संपणाऱ्या अमृताचे प्राशन करणारा हो अर्थात् मोक्षरूप अमृत भक्षणारा हो. यानंतर व्युष्टिक्रिया संस्काराचे-वाढदिवसाचे मंत्र- ।। १४१ ॥
येथे श्रुतानुसार व्युष्टिक्रिया मंत्र मी सांगतो. प्रथमतः उपनयनजन्मवर्षवर्धन या शब्दाच्या पुढे भागी भव हा शब्द जोडावा म्हणजे १ उपनयनजन्मवर्षवर्धनभागी भव हे वाक्य तयार होते. याचा अर्थ- मौंजीबंधनरूप जन्माचे वर्ष वाढविणारा हो. वैवाहनिष्ठ शब्दाच्या पुढे वर्षवर्धनभागी भव हे पद जोडावे. म्हणजे वैवाहनिष्ठवर्षवर्धनभागी भव हे पद तयार होते. याचा अभिप्राय- विवाहक्रियेच्या वर्षाचा वाढदिवस धारण करणारा हो. मुनिजन्म शब्दाच्या पुढे वर्षवर्धनभागी भव हे पद जोडावे म्हणजे मुनीन्द्रजन्मवर्षवर्धनभागी भव हा मंत्र तयार होतो. याचा अर्थ- मुनीन्द्रपदधारण करणाऱ्या तुला वर्षवृद्धीचा दिवस प्राप्त होवो. यानंतर सुरेन्द्र जन्म याच्यापुढे वर्षवर्धन शब्द व भागी भव हे शब्द जोडावेत. त्यामुळे सुरेन्द्रजन्मवर्षवर्धनभागी भव हा मंत्र सिद्ध होतो. याचा अभिप्राय- देवेन्द्राच्या वर्षाला वाढविणारा दिवस तुला प्राप्त होवो हा आहे. यानंतर मन्दराभिषेक या पदाशी वर्षवर्धनभागी भव हे शब्द जोडावेत म्हणजे मन्दराभिषेकवर्षवर्धनभागी भव हा मंत्र होतो- सुमेरुपर्वतावर होणाऱ्या अभिषेकाची वर्षवृद्धि तुला प्राप्त होवो. यौवराज्य हे पद व महाराज्य हे पद या दोन पदाबरोबर वर्षवर्धनभागी भव हे शब्द क्रमाने जोडावेत म्हणजे यौवराज्यवर्षवर्धनभागी भव हे मंत्रपद तयार होते व महाराज्य वर्षवर्धनभागी भव हे मंत्रपद तयार होते. यांचा क्रमाने अर्थ- युवराजपदाची वर्षवृद्धि करणारा वाढदिवस तुला प्राप्त होवो. महाराज्यपदाची वर्षवृद्धि करणारा वाढदिवस तुला प्राप्त होवो व यानंतर परमराज्यवर्षवर्धनभागी भव आणि आर्हन्त्यराज्यवर्षवर्धनभागी भव हे दोन मंत्र त्याचे अभिप्राय चक्रवर्तीचे राज्याच्या वर्षाचा वाढदिवस तुला प्राप्त होवो व उत्कृष्ट अर्हत्पदाच्या प्राप्तीचा वर्षवर्धनदिवस तुला प्राप्त होवो. या प्रकारे हा वर्षवृद्धिचूणिमंत्र तयार झाला व तो चूर्णीमध्ये दाखविला आहे १४२-१४६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org