Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४०-१४०)
महापुराण
मन्दराभिषेकनिष्क्रान्तिभागी भव पदं ततः । यौवराज्यमहाराज्यपदे भागी भवान्विते ॥ १३७ निष्क्रान्तिपदमध्ये त्वं परमराज्यपदं तथा । आर्हन्त्यराज्यनिष्क्रान्तिभागी भव शिखापदम् ॥ १३८ पदैरेभिरयं मन्त्रस्तद्विद्भिरनुजप्यताम् । प्रागुक्तो विधिरन्यस्तु निषद्यामन्त्र उत्तरः ॥ १३९ चूणिः- उपनयनिष्क्रान्तिभागी भव । वैवाहनिष्क्रान्तिभागी भव । मुनीन्द्र निष्क्रान्तिभागी भव ।
सुरेन्द्रनिष्क्रान्तिभागी भव । मन्दराभिषेकनिष्क्रान्तिभागी भव । यौवराज्यनिष्क्रान्तिभागी भव । महाराज्यनिष्क्रान्तिभागी भव । परमराज्यनिष्क्रान्तिभागी भव । आर्हन्त्य
निष्क्रान्तिभागी भव । बहिर्यानमन्त्रः॥ मिषद्या- दिव्यसिंहासनपदाभागी भव पदं भवेत् । एवं विजयपरमसिंहासनपदद्वयात् ॥ १४० चूणिः- दियसिंहासनभागी भव । विजयसिंहासनभागी भव । परमसिंहासनभागी भव ।
निषद्यामंत्रः॥ १० अन्नप्राशनक्रिया।
यानंतर मन्दराभिषेकनिष्क्रान्तिभागी भव हे पद बोलावे. मेरुपर्वतावर अभिषेकासाठी तू निघणारा हो हे पद म्हणावे. तदनन्तर यौवराज्यनिष्क्रान्तिभागी भव युवराजपदासाठी निघणारा तू हो हा मंत्र बोलावा ।। १३७ ॥
यानंतर महाराज्यपदभागी भव हे पद बोलावे. महाराज्यपदप्राप्तिसाठी निघणारा हो हे पद बोलावे ॥ १३८ ।
नंतर परमराज्यपदनिष्क्रान्तिभागी भव- चक्रवर्तीचे उत्कृष्ट राज्य मिळविण्याकरिता तू निघणारा हो असे म्हणावे. तदनन्तर आर्हन्त्यराज्यनिष्क्रान्तिभागी भव हे पद म्हणावे अर्थात् अर्हत्पदप्राप्तिसाठी तू निघणारा हो. हा मंत्र विद्वानानी बोलावा. बाकीचा विधि पूर्वी सांगितला आहे. यानन्तर निषद्यामन्त्र आहेत ।। १३८-१३९ ॥ चूर्णि- उपनयनिष्क्रान्तिभागी भव, वैवाहनिष्क्रान्तिभागी भव वगैरे मंत्राचा अर्थ वर दिला
असल्यामुळे येथे द्विरुकतिभयाने दिला नाही.
जेव्हा बालकाला गादीवर बसवितात तेव्हा केला जाणारा जो संस्कार त्याला निषद्या म्हणतात. या संस्काराचे वेळी दिव्यसिंहासन पदाच्या पुढे भागी भव हे पद जोडावे, याचप्रमाणे विजयसिंहासन पदापुढे व परमसिंहासन पदापुढे भागी भव हे पद जोडावे. म्हणजे क्रमाने दिव्य सिंहासनभागी भव । म्हणजे दिव्यसिंहासनाचा भोक्ता हो। विजयसिंहासनभागी भवचक्रवर्तीच्या विजयाने शोभित सिंहासनावर बसणारा हो आणि परमसिंहासनभागी भवतीर्थंकराच्या उत्कृष्ट सिंहासनावर बसणारा हो असे तीन मंत्र म्हणावेत. यानन्तर अन्नप्राशन क्रियामंत्र याप्रमाणे-॥१४० ॥
म. ५७
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org