Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४८)
महापुराण
(४०-१२९
तृतीयेऽहनि चानंतज्ञानदी भवेत्यमम् । आलोकयेत् समुत्क्षिप्य निशि ताराडकितं नभः ॥ १२९ पुण्याहघोषणापूर्व कुर्याद्दानं च शक्तितः। यथायोगं विदध्याच्च सर्वस्याभयघोषणाम् ॥ १३० जातकर्मविधिः सोऽयमाम्नातः पूर्वसूरिभिः । यथायोगमनुष्ठेयः सोऽद्यत्वेऽपि द्विजोत्तमः ॥ १३१ नामकर्मविधाने च मन्त्रोयऽमनुकीय॑ते । सिद्धार्चनविधौ सप्त मन्त्राः प्रागनवणिताः ॥ १३२ ततो दिव्याष्टसहस्रनामभागी भवादिकम् । पदत्रितयमुच्चार्य मन्त्रोऽत्र परिवर्त्यताम् ॥ १३३ चणि:- दिव्याष्टसहस्रनामभागी भव । विजयनामाष्टसहस्रभागी भव । परमनामाष्टसहस्र
भागी भव । नामकर्ममन्त्रः। शेषो विधिस्तु निःशेषः प्रागुक्तो नोच्यते पुनः । बहिर्यातक्रियामन्त्रस्ततोऽयमनुगम्यताम् ॥ १३४ तत्रोपनयनिष्क्रान्तिभागी भव पदात्परम् । भवेद्ववाहनिष्क्रान्तिभागी भव पदं ततः ॥ १३५ क्रमान्मुनीन्द्रनिष्क्रान्तिभागी भव पदं वदेत् । ततः सुरेन्द्र निष्क्रान्तिभागी भव पदं स्मृतम् ॥ १३६
__ यानन्तर तिसऱ्या दिवशी त्या बालकाला आपल्या हातात घेऊन रात्री त्याला तारकानी युक्त असे आकाश दाखवावे व तू अनंतज्ञानाला पाहणारा हो 'अनंतज्ञानदी भव' हा मंत्र म्हणावा व त्यादिवशी पुण्याहवाचन करून यथाशक्ति दान करावे व जसे शक्य होईल तशी अभयघोषणा करावी यथाशक्ति अभय द्यावे ।। १२९-१३० ॥
हा जन्मकर्माचा विधि पूर्वाचार्यानी गुरुपरंपरेस अनुसरून सांगितलेला आहे व श्रेष्ठ ब्राह्मणानी आज देखिल तो विधि यथायोग्य करावा ।। १३१॥
नामकर्मविधाने- बालकाचे नाव ठेवणे या कार्यात सिद्धपूजन करून ज्यांचे वर्णन पूर्वी केले आहे ते सात पीठिकामन्त्र येथे म्हटले जातात. त्याचे नन्तर येथे 'दिव्याष्टसहस्रनाम भागी भव' आदिक तीन पदांचे उच्चारण करून त्या मंत्रांचे परिवर्तन करावे. अर्थात् दिव्याष्टसहस्रनामभागी भव- एक हजार आठ दिव्य नावांचा धारक तू हो. 'विजयाष्टसहस्रनामभागी भव- विजयरूप एक हजार आठ नावांचा धारक तूं हो. परमनामाष्टसहस्रभागी भवअतिशय उत्कृष्ट एक हजार आठ नावांचा तू धारक हो असे तीन मंत्र येथे बोलावेत. बाकीचा विधि पूर्वी सांगितला असल्यामुळे तो येथे सांगितला जात नाही. यानंतर बहिर्यानक्रिया मन्त्र पुढे लिहिल्याप्रमाणे जाणावेत ॥ १३२-१३४ ।।
या बहिर्यान क्रियेमध्ये उपनयननिष्क्रान्तिभागी भव- यज्ञोपवीत धारण करण्यासाठी बाहेर निघणारा हो. हे पद बोलावे. यानंतर 'वैवाहनिष्क्रान्तिभागी भव' हे पद बोलावे. अर्थात् विवाह करून घेण्यासाठी बाहेर निघणारा हो हा मंत्र म्हणावा ॥ १३५ ।।
त्यानंतर क्रमाने मुनीन्द्रनिष्क्रान्तिभागी भव मुनीन्द्रपद प्राप्त करून घेण्यासाठी बाहेर निघणारा हो हे पद बोलावे. त्यानंतर सुरेन्द्रनिष्क्रान्तिभागी भव हे पद सांगितले आहे. सुरेन्द्र पदाच्या प्राप्तिसाठी बाहेर निघणारा हो. हे पद बोलावे ॥ १३६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org