Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४४६)
महापुराण
(४०-११०
जन्मसंस्कारमन्त्रोऽयमेतेनार्भकमादितः । सिद्धाभिषेकगन्धाम्बुसंसिक्तं शिरसि स्पृशेत् ॥ ११० कुलजातिवयोरूपगुणः शीलप्रजान्वयः । भाग्याविधवतासौम्यमूर्तित्वैः समषिष्ठिता ॥ १११ सम्यग्दृष्टिस्तवाम्बेयमतस्त्वमपि पुत्रक । सप्रीतिमाप्नुहि त्रीणि प्राप्य चक्राण्यनुक्रमात् ॥ ११२ इत्याङ्गानि स्पृशेदस्य प्रायः सारूप्ययोगतः । तत्राधायात्मसङ्कल्पं ततः सूक्तमिदं पठेत् ॥ ११३ अङ्गादङ्गात्सम्भवसि हृदयावपि जायसे । आत्मा वै पुत्रनामासि त्वं जीव शरदः शतम् ॥ ११४ क्षीराज्यममृतं पूतं नाभावावय॑ युक्तितः । घातिञ्जयो भवेत्यस्य हासयेन्नाभिनालकम् ॥ ११५ श्रीदेव्यो जात ते जात क्रियां कुर्वन्त्विति ब्रुवन् । तत्तनुं चूर्णवासेन शनैरुद्वर्त्य यत्नतः ॥ ११६ त्वं मन्दराभिषेकाहॊ भवेति स्नापयेत्ततः । गन्धाम्बुभिश्चिरं जीव्या इत्याशास्याक्षतं क्षिपेत् ॥११७ नश्यात्कर्ममलं कृत्स्नमित्यास्येऽस्यसनासिके । घतमौषधसंसिद्धमावपेन्मात्रया द्विजः ॥ ११८
दिव्यनेमिविजयाय स्वाहा इत्यादिरूपाचा मंत्र हा जन्मसंस्काराचा आहे प्रथमतः सिद्धभगवंताच्या अभिषेकाच्या गन्धोदकाने सिंचन केलेल्या या बालकाच्या मस्तकाला वरील मंत्र म्हणून स्पर्श करावा ॥ ११० ।।
व असे म्हणावे- ही तुझी माता कुल, जाति, वय, रूप या गुणानी युक्त आहे व शीलवती आहे, सन्ततीने युक्त व उत्तम वंशात जन्मलेली आहे. भाग्यवती व अवैधव्याने युक्त आहे, सौम्य व शान्तमूर्ति आहे, या गुणानी युक्त व सम्यग्दृष्टि आहे, हे पुत्रा तू देखिल या मातेमुळे अनुक्रमाने तीन चक्रानी- म्हणजे दिव्यचक्र, विजयचक्र आणि परचक्र-उत्कृष्टचक्र यानी आनंदित हो ।। १११-११२ ।।
असे म्हणून याच्या अंगाना स्पर्श करावा व आपल्याशी तो सदृश असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या आत्म्याचा सङकल्प करून पुढील हे सूक्त म्हणावे ।। ११३ ॥
हे पुत्रा, तू माझ्या प्रत्येक अंगापासून उत्पन्न झाला आहेस व माझ्या हृदयापासूनही उत्पन्न झाला आहेस म्हणून पुत्रनामक माझा आत्माच आहेस म्हणून तू शेकडो वर्षावधि चिरंजीव हो ॥ ११४ ।।
दूध व तूप हेच एक पवित्र अमृत नाभीवर-बेंबीवर सिंचून व हे पुत्रा तू 'घातिं जयो भव' घातिकर्माना जिंकणारा हो असे म्हणून त्याची नाळ युक्तीने न दुखविता कातरावी. हे बालका, श्री वगैरे देवता तुझे जातकर्म करोत असे बोलून त्याच्या सर्वाङ्गावर सुगंधित चूर्ण उटी हळूच जपून लावावी व तू मेरुपर्वतावर अभिषेक करून घेण्यास योग्य हो असे म्हणून सुगंधित पाण्यानी त्याला स्नान घालावे. यानंतर दीर्घकालपर्यन्त जग असा आशीर्वाद देऊन त्याच्यावर अक्षताक्षेपण कराव्यात ॥ ११५-११७ ॥
हे बालका तुझे सर्व कर्ममल नष्ट होवोत असे म्हणून त्या ब्राह्मणाने त्या बालकाच्या तोंडात व नाकात औषधिद्रव्यानी तयार केलेले तूप स्वल्प प्रमाणाने घालावे ॥ ११८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org