Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२२)
महापुराण
(३९-१५४
सद्गृहित्वमिदं ज्ञेयं गुणरात्मोपबृंहणम् । पारिवाज्यमितो वक्ष्ये सुविशुद्ध क्रियान्तरम् ॥ १५४ गार्हस्थ्यमनुपाल्यैवं गृहवासाद्विरज्यतः । यद्दीक्षाग्रहणं तद्धि पारिवाज्यं प्रचक्ष्यते ॥ १५५ पारिवाज्यं परिवाजो भावो निर्वाणदीक्षणम् । तत्र निर्ममतावृत्त्या जातरूपस्य धारणम् ॥ १५६ प्रशस्ततिथिनक्षत्रयोगलग्नग्रहांशकः । निर्ग्रन्थाचार्यमाश्रित्य दीक्षा ग्राह्या ममक्षणा ॥ १५७ विशुखकुलगोत्रस्य सद्वृत्तस्य वपुष्मतः । दीक्षायोग्यत्वमाम्नातं सुमुखस्य सुमेघसः ॥ १५८ ग्रहोपरागग्रहणे परिवेषेन्द्रचापयोः । वक्रग्रहोदये मेघपटलस्थगिताम्बरे ॥ १५९ मष्टाधिमासदिनयोः सङक्रान्तौ हानिमत्तियो । दीक्षाविधि मुमक्षणां नेच्छन्ति कृतबुद्धयः॥ १६० सम्प्रदायमनावृत्य यस्त्विमं दीक्षयेदधीः । स साधुभिर्बहिः कार्यः वृद्धात्यासादनारतः ॥ १६१
याप्रमाणे गुणानी आपल्या आत्म्याची उत्तरोत्तर वृद्धि करणे याला गृहित्व म्हणतात श्रावकधर्म म्हणतात. यानंतर अतिशय विशुद्ध अशी पारिव्राज्य नांवाची अन्य क्रिया मी सांगतो ।। १५४ ॥
गृहस्थाचा आचार याप्रमाणे पाळून घरात राहण्यापासून जेव्हा वैराग्य उत्पन्न होते तेव्हा जी दीक्षा घेणे- मुनि होणे ते पारिव्राज्य होय. पारिव्राज्य म्हणजे परिव्राजक होणे म्हणजे निर्वाण दीक्षा घेणे. यात निर्ममतावृत्ति अतिशय वाढते सर्व परिग्रहांचा त्याग झाल्याने तो जातरूप धारण करतो अन्तर्बाह्य परिग्रहत्यागी जन्मलेल्या बालकाप्रमाणे नग्नरूप धारण करतो ॥ १५५-१५६ ॥
मुक्ति प्राप्त करून घेण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थाने शुभतिथि, शुभनक्षत्र, शुभयोग, शुभलग्न व शुभ ग्रहांचे अंश यांनी युक्त अशावेळी निर्ग्रन्थाचार्याजवळ जाऊन दीक्षा घ्यावी ॥ १५७ ॥
ज्याचे पितृवंश व मातृवंश निर्दोष आहेत व जो उत्तम व्रतपालक आहे व जो मजबुत शरीराचा आहे, जो सुमुख- म्हणजे सुन्दर अवयवांचा आहे आणि बुद्धिमान् आहे त्याच्या ठिकाणी निर्ग्रन्थ दीक्षा घेण्याची योग्यता आहे असे शास्त्रकारानी वणिले आहे ॥ १५८ ॥
ज्यादिवशी राहु व केतु यांचा वेध असता व ग्रहण लागले असता, सूर्याला व चन्द्राला परिवेष म्हणजे मंडलाकार त्यांच्या सभोवती उत्पन्न झाला असता इन्द्रधनुष्य उगवले असता, वक्री झालेल्या ग्रहांचा उदय झाला असता, आणि मेघांच्या समूहानी सर्व आकाश आच्छादित झाले असता, क्षय-मास व अधिक मासाचे दिवस असता, संक्रान्तीच्यावेळी व क्षयतिथीच्यादिवशी बुद्धिमान आचार्य, मुमुक्षूला दीक्षा देण्याची इच्छा करीत नाहीत अर्थात् दीक्षा देत नाहीत. पण जो मंदबुद्धियुक्त आचार्य वर सांगितलेल्या संप्रदायाचा अनादर करून दीक्षा देईल त्याला साधूनी वृद्ध आचार्याच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे संघातून बाहेर काढावे त्याला आपल्या संघाचा नेता मानू नये ।। १५९-१६१ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org