________________
४२४ )
(३९-१७०
कर्शयेन्मूर्तिमात्मीनां रक्षन्मूर्तिः शरीरिणाम् । तपोऽधितिष्ठेद्दिव्यादिमूर्तीराप्तुमना मुनिः ॥ १७० स्वलक्षणमनिर्देश्यं मन्यमानो जिनेशिनाम् । लक्षणान्यभिसंधाय तपस्येत्कृतलक्षणः ॥ १७१ म्लापयन्स्वाङ्ग सौन्दयं मुनिरुग्रं तपश्चरेत् । वाञ्छन्दिव्यादिसौन्दर्यमनिवार्यपरम्परम् ॥ १७२ मलीमसाङ्गो व्युत्सृष्टस्वकाय प्रभवप्रभः । प्रभोः प्रभां मुनिर्ध्यायन्भवेत्क्षिप्रं प्रभास्वरः ॥ १७३ स्वं मणिस्नेहदीपादितेजोऽपास्य जिनं भजन् । तेजोमयमयं योगी स्यात्तेजोवलयोज्ज्वलः ॥ १७४ त्यक्त्वास्त्रवस्त्रशस्त्राणि प्राक्तनानि प्रशान्तिभाक् । जिनमाराध्य योगीन्द्रो धर्मचक्राधिपो भवेत् ॥ त्यक्तस्नानादिसंस्कारः संश्रित्य स्नातकं जिनम् । मूनि मेरोरवाप्नोति परं जन्माभिषेचनम् ॥ १७६ स्वं स्वाम्यमैहिकं त्यक्त्वा परमस्वामिनं जिनम् । सेवित्वा सेवनीयत्वमेष्यत्येष जगज्जनैः ॥ १७७
1
महापुराण
दिव्यादिमूर्तीची प्राप्ति व्हावी असे इच्छिणाऱ्या मुनिवर्याने तपश्चरण करावे व प्राण्यांच्या मूर्तीचे - शरीराचे रक्षण करून आपली मूर्ति अर्थात् शरीर कृश करावे ।। १७० ।।
अनेक लक्षणाना धारण करणाऱ्या त्या मुनीने आत्म्याचे लक्षण वर्णन करण्यास अशक्य आहे असे समजून जिनेश्वराच्या लक्षणाचे चिन्तन करीत तपश्चरण करावे ।। १७१ ।।
ज्यांची परम्परा टाळणे अशक्य आहे दिव्या, विजया वगैरे चार जातीचे सौन्दर्य प्राप्त व्हावे अशी इच्छा करणाऱ्या मुनीने आपल्या अंगांचे सौन्दर्य कमी म्लान करून तपश्चरण करावे ।। १७२ ॥
ज्याचे अंग मळकट आहे व त्यामुळे ज्याच्या शरीराची कान्ति नष्ट झाली आहे असा हा मुनि जिनेश्वराच्या देहकान्तीचे भामण्डलाचे चिन्तन करण्याने शीघ्र कान्तिसम्पन्न होतो ।। १७३ ।।
जो योगीन्द्र मुनि रत्ने, तेल व दीपकाची कान्ती त्यागून जिनेश्वराची उपासना करतो. तो योगी तेजोमय जिनाच्या चिन्तनाने भामण्डलाने उज्ज्वल होतो ।। १७४ ।।
ज्याने आपली पूर्वीची अस्त्रे, वस्त्रे व शस्त्रे त्यागिली आहेत व ज्याने उत्कृष्ट शान्तीला धारण केले आहे असा तो योगीन्द्र जिनेश्वराची आराधना केल्याने धर्मचक्राचा अधिपति होतो अर्थात् जिनेश्वर होतो ।। १७५ ।।
जो योगीन्द्र स्नानादिकाचा संस्कार त्यागून स्नातक - केवलज्ञानी अशा जिनेश्वराचा आश्रय घेतो, त्याचे ध्यान करतो तो मेरुपर्वतावर उत्कृष्ट जन्माभिषेकाला प्राप्त होतो ॥ १७६ ॥
जो आपले लोकावरचे स्वामित्व त्यागतो, इहलोकी प्राप्त झालेला राजेपणा त्यागतो व उत्कृष्ट त्रैलोक्याच्या स्वामी अशा जिनेश्वराची सेवा करतो तो जगातील लोकाकडून सेवनीय होतो. अर्थात् तो जि ेश्वर होऊन सर्व लोकाकडून उपासिला जातो ।। १७७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org