Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
(४२३
तत्र सूत्रपदान्याहुर्योगीन्द्राः सप्तविंशतिम् । यैनिर्णीतं भवेत्साक्षात्पारिव्राज्यस्य लक्षणम् ॥ १६२ जातिर्मूर्तिश्च तत्रत्यं लक्षणं सुन्दराङ्गता । प्रभामण्डलचक्राणि तथाभिषवनाथते ॥ १६३ सिंहासनोपधाने च छत्रचामरघोषणाः । अशोकवृक्षनिधयो गृहशोभावगाहने ॥ १६४ क्षेत्रज्ञाज्ञासभाः कीर्तिर्वन्द्यता वाहनानि च । भाषाहारसुखानीति जात्यादिः सप्तविंशतिः ॥ १६५ जात्यादिकानिमान्सप्तविंशति परमेष्ठिनाम् । गुणानीप्सुर्भजेद्दीक्षां त्वेषु तेष्वकृतादरः ॥ १६६ जातिमानप्यनुत्सिक्तः सम्भजेदर्हतां क्रमौ । यतो जात्यन्तरे जात्यां याति जातिचतुष्टयीम् ॥१६७ जातिरैन्द्री भवेद्दिव्या चक्रिणां विजयाश्रिता । परमा जातिरार्हन्त्ये स्वात्मोत्था सिद्धिमीयुषाम् ॥१६८ मूर्त्यादिष्वपि नेतव्या कल्पनेयं चतुष्टयी । पुराणज्ञैरसंमोहात्क्वचिच्च त्रितयी मता ॥ १६९
३९-१६९)
महापुराण
या दीक्षेच्या लक्षणात योगीन्द्रानी सत्तावीस सूत्रपदे सांगितली आहेत. यांचा निर्णय झाल्याने दीक्षेच्या लक्षणाचा निर्णय होतो ।। १६२ ।।
१) जाति, २) मूर्ति, ३) जाति व मूर्तीचे लक्षण, ४) अंगांचे सौन्दर्य, ५) प्रभा, ६) मण्डल, ७) चक्र, ८) अभिषव, ९) नाथता, १०) सिंहासन, ११) उपधान, १२) छत्र, १३) चामर, १४) घोषणा, १५) अशोकवृक्ष, १६) निधि, १७) गृहशोभा, १८) अवगाहन १९) क्षेत्रज्ञ, २०) आज्ञा, २१) सभा, २२) कीर्ति, २३) वन्द्यता, २४) वाहन, २५) भाषा, २६) आहार, २७ ) सुख ही जाति आदिक सत्तावीस स्थाने जाणावीत ।। १६३-१६५ ॥
वर सांगितलेल्या जाति आदिक सत्तावीस परमेष्ठींच्या गुणांची प्राप्ति आपणास व्हावी म्हणून त्या भव्यपुरुषाने स्वतःच्या ठिकाणी असलेल्या गुणाविषयी आदर न बाळगता दीक्षा घ्यावी. हे जाति आदिक सत्तावीस गुण परमेष्ठीमध्ये असतात तसे दीक्षेच्छुकातही काही असतात पण स्वतःच्या त्या गुणांचा आदर मनात न धरता परमेष्ठींच्या जाति आदिक गुणांचा आदर बाळगावा. असे करण्याने तो दीक्षा घेणारा अहंकारादिकाच्या वश होणार नाही व त्यामुळे त्याचे उत्थान - उन्नति होऊन तो परमेष्ठिपदास प्राप्त होईल ।। १६६ ॥
दीक्षा घेणा-या व्यक्तीने स्वतःच्या जात्यादिक गुणाविषयी अहंकार, गर्व न बाळगता जिनेश्वराच्या पायांची पूजा त्याने करावी. असे जर तो करील तर पुढच्या जन्मात त्याची उत्पत्ति झाल्यावर त्याला परमेष्ठीच्या चार जातींची प्राप्ति होईल ।। १६७ ।।
जातीचे चार प्रकार आहेत. इंद्राच्या जातीला दिव्य जाति म्हणतात. चक्रवर्तीची जाति विजयाजाति आहे. अरहन्ताच्या जातीला परजाति म्हणतात व सिद्धांच्यात उत्पन्न झालेल्या जातीला स्वात्मोत्थजाति म्हणतात ।। १६८ ।।
मूर्ति आदिकात देखिल या चार जातींची कल्पना करावी. पण पुराणाचे जाणते अश आचार्यानी निर्मोह होऊन कोठे कोठे जाति मानल्या आहेत. ते सिद्धामध्ये स्वात्मोत्थजाति - मानीत नाहीत ॥ १६९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org