Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-१५३)
महापुराण
(४२१
अपि चैषां विशुद्धयङ्गं पक्षश्चर्या च साधनम् । इति त्रितयमस्त्येव तदिदानी विवृण्महे ॥ १४५ तत्र पक्षो हि जनानां कृत्स्नहिंसाविवर्जनम् । मैत्रीप्रमोदकारुण्यमाध्यस्थ्यरुपबृंहितम् ॥ १४६ । चर्या तु देवतार्थ वा मन्त्रसिद्ध चर्थमेव वा औषधाहारक्लप्त्यै वा न हिस्यामीति चेष्टितम् ॥१४७ तत्राकामकृते शुद्धिः प्रायश्चित्तविधीयते । पश्चाच्चात्मान्वयं सूनी व्यवस्थाप्य गृहोज्झनम् ॥१४८ चर्येषा गहिणां प्रोक्ता जीवितान्ते तु साधनम् । देहाहारेहितत्यागाद्धचानशुद्धयात्मशोधनम् ॥१४९ त्रिष्वेतेषु न संस्पर्शो वनाईद्धि जन्मनाम् । इत्यात्मपक्षनिक्षिप्तदोषाणां स्यान्निराकृतिः ॥ १५० चतुर्णामाश्रमाणां च शुद्धिः स्यादाहते मते । चातुराश्रम्यमन्येषामविचारितसुन्दरम् ॥ १५१ ब्रह्मचारी गृहस्थश्च वानप्रस्थोऽथ भिक्षुकः । इत्याश्रमास्तु जैनानामुत्तरोत्तरशुद्धितः ॥ १५२ ज्ञातव्याः स्युः प्रपञ्चेन सान्तर्भेदाः पृथग्विधाः । ग्रन्थगौरवभीत्या तु नात्रतेषां प्रपञ्चना ॥१५३
या जैन गृहस्थाना व जैन ब्राह्मणाना विशुद्ध होण्यास तीन कारणे म्हणजे पक्ष, चर्या आणि साधन अशी सांगितली आहेत. या कारणांचे आता येथे आम्ही (आचार्य) विवरण करतो॥ १४५ ॥
मैत्री, प्रमोद, कारुण्य-दया आणि रागद्वेषरहितता म्हणजे माध्यस्थ्य यांनी वृद्धिंगत झालेला जो संपूर्ण हिंसात्याग त्याला पक्ष म्हणतात ॥ १४६ ।।
अर्थात् देवतेसाठी, मन्त्र सिद्ध व्हावा म्हणून, औषधासाठी व आहारासाठी मी प्राण्यांना मारणार नाही अशी जी प्रतिज्ञा करणे तिला पक्ष म्हणतात ।। १४७ ।।
वर सांगितलेल्या कार्यात जी हिंसा घडलेली असते ती इच्छापूर्वक-संकल्पपूर्वक नसते म्हणून तिला अकामकृत म्हणतात. अशा हिंसेची शुद्धि ही प्रायश्चित्तानी केली जाते. याप्रमाणे पक्ष कशास म्हणतात त्याचे हे वर्णन झाले. यानन्तर चर्यावर्णन असे- आपल्या वंशाचा भार आपल्या पुत्रावर व्यवस्थेने ठेवून घराचा त्याग करणे ती चर्या होय व जीविताच्या समाप्तीच्यावेळी देह व आहाराविषयीच्या इच्छेचा त्याग करून ध्यानाच्या शुद्धीने आत्मा शुद्ध करणे अर्थात् सल्लेखनामरण साधणे याला साधन म्हणतात ॥ १४८-१४९ ॥
___या पक्ष, चर्या किंवा निष्ठा आणि साधन या तीन गृहस्थावस्थात जैन ब्राह्मणाना हिंसेशी स्पर्श होत नाही. म्हणून या जैनांच्या तीन पक्षात अवस्थात जे दोष अन्यमतीयानी लादले होते त्यांचे निराकरण केले ॥ १५० ।।
___ या जैनमतात चार आश्रमांची शुद्धीही सांगितलेली आहे. इतरांच्या चार आश्रमाचे वर्णन अविचाराने सुन्दर वाटते. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व भिक्षुक असे चार आश्रम आहेत व त्यात उत्तरोत्तर अधिक शुद्धि वाढत गेली आहे. या चार आश्रमांचे सविस्तर वर्णन जाणून ध्यावे. याच्यात अन्तर्भेद देखिल निरनिराळे पुष्कळ आहेत ते जाणून घ्यावेत. ग्रंथाचा विस्तार होईल या भीतीने त्याचे वर्णन केले नाही ॥ १५१-१५३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org