________________
४०-१५)
महापुराण
कुर्यादक्षतपूजार्थमक्षताय नमः पदम् । धूपार्घ्य श्रुतधूपाय नमःपदमुदाहरेत् ॥ ८ ज्ञानोद्योताय पूर्व च दीपदाने नमः पदम् । मन्त्रः परमसिद्धाय नम इत्यमृतोद्धृतौ ॥९ मन्त्ररेभिस्तु संस्कृत्य यथावज्जगतीतलम् । ततोऽन्वपीठिकामन्त्रः पठनीयो द्विजोत्तमैः ॥ १० सत्यजातपदं पूर्व चतुर्थ्यन्तं नमः परम् । ततोऽर्हज्जातशब्दश्च तदन्तस्तत्परो मतः ॥ ११ ततः परमजाताय नम इत्यपरं पदम् । ततोऽनुपमजाताय नम इत्युत्तरं पदम् ॥ १२ ततश्च स्वप्रधानाय नम इत्युत्तरो ध्वनिः । अचलाय नमः शब्दादक्षयाय नमः परम् ॥ १३ अव्याबाधपदं चान्यदनन्तज्ञानशब्दनम् । अनन्तदर्शनानन्तवीर्ययशब्दो ततः पृथक् ॥ १४ अनन्तसुखशब्दश्च नीरजः शब्द एव च । निर्मलाच्छेद्यशब्दौ च तथाऽभेद्याजरश्रुती ॥ १५
अक्षतानी पूजा करण्यासाठी अक्षताय नमः हा मन्त्र म्हणावा. क्षयरहित जिनेशाला नमस्कार असा याचा अर्थ आहे व धूपाने प्रभूना अर्घ्य देण्यासाठी श्रुतधूपाय नमः हा मंत्र म्हणावा. ज्ञान किंवा शास्त्र हे सुगंधित द्रव्य ज्यांच्याजवळ आहे अशा जिनेशाना नमस्कार असा याचा अर्थ आहे ॥ ८ ॥
दीपार्चन करताना ज्ञानोद्योताय नमः हा मंत्र म्हणावा. ज्ञानप्रकाशक जिनेश्वरास नमस्कार व नैवेद्य अर्पण करताना परमसिद्धाय नमः हा मंत्र म्हणावा, उत्कृष्ट सिद्धभगवंताला नमस्कार असा याचा अर्थ आहे ॥ ९ ॥
अशा या मंत्रानी जिनेश्वराची स्थापना जेथे करावयाची आहे अशा भूतलाची शुद्धि करून यानंतर श्रेष्ठ द्विजानी पीठिकामन्त्र म्हणावेत ॥ १० ॥
पीठिकामन्त्र याप्रमाणे आहेत- प्रथमतः सत्यजात हा चतुर्थ्यन्त शब्द योजून नंतर नमः शब्द योजावा. यानन्तर अर्हज्जात शब्द चतुर्थ्यन्त योजून त्याच्यापुढे नमः शब्द योजावा. म्हणजे सत्यजाताय नमः- सत्यरूप जन्म धारण करणाऱ्या जिनास नमस्कार 'अर्हज्जाताय नमः' प्रशंसनीय जन्म धारण करणाऱ्या जिनेशाला नमस्कार ।। ११ ॥
यानंतर परमजाताय नमः हे पद बोलावे आणि नंतर अनुपमजाताय नमः असे उत्तरपद बोलावे. या मंत्राचे क्रमाने उत्कृष्ट जन्मधारक जिनेशाला नमस्कार व अनुपमउपमारहित जन्मधारक जिनेश्वराला नमस्कार ।। १२ ।।
यानंतर स्वप्रधानाय नमः । अचलाय नमः, अक्षयाय नमः ही पदे आहेत. यांचा अर्थस्वतःच मख्यपद धारण करणान्या जिनेशाला नमस्कार हे पद बोलावे तदनन्तर अचलाय नमः स्वरूपात निश्चल अशा जिनेशाला नमस्कार आणि अक्षयाय नमः केव्हाही नाश न पावणाऱ्या जिनेश्वरास नमस्कार ॥ १३ ॥
यानन्तर अव्याबाध शब्द, अनन्तज्ञान शब्द, नंतर अनन्तदर्शन शब्द, अनंतवीर्य शब्द, पुनः अनन्तसुख शब्द, आणि नीरजः शब्द, पुनः निर्मल शब्द व अच्छेद्य शब्द व पुनः अभेद्य शब्द व अजर शब्द या सर्व चतुर्थ्यन्त शब्दापुढे नमः शब्द जोडन मन्त्र बनवावेत ते याप्रमाणे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org