Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४०-३७)
महापुराण
(४३५
......
चूणि- सत्यजन्मनः शरणं प्रपद्यामि । अर्हजन्मनः शरणं प्रपद्यामि। अर्हन्मातुः शरणं प्रपद्यामि ।
अर्हत्सुतस्थ शरणं प्रपद्यामि । अनादिगमनस्य शरणं प्रपद्यामि । अनुपमजन्मनः शरणं प्रपद्यामि । रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामि । हे सम्यग्दृष्ट, हे सम्यग्दृष्टे, हे ज्ञानमूर्ते, हे ज्ञानमूर्ते हे सरस्वति हे सरस्वति स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु, अपमृत्यविनाशनं भवतु ।
समाधिमरणं भवतु। जातिमन्त्रोऽयमाम्नातो जातिसंस्कारकारणम् । मन्त्रं निस्तारकादि च यथाम्नायमितो ब्रुवे ॥ ३१ स्वाहान्तसत्यजाताय पदमादावनुस्मृतम् । तदन्तमर्हज्जाताय पदं स्यात्तदनन्तरम् ॥ ३२ ततः षट्कर्मणे स्वाहा पदमुच्चारयेद्विजः । स्याद्ग्रामपतये स्वाहा पदं तस्मादनन्तरम् ॥ ३३ अनादिश्रोत्रियायेति ब्रूयात्स्वाहापदं ततः । तद्वच्च स्नातकायेति श्रावकायेति च द्वयम् ॥ ३४ स्याद्देवब्राह्मणायेति स्वाहेत्यन्तमतः पदम् । सुब्राह्मणाय स्वाहान्तः स्वाहान्तानुपमायणीः ॥ ३५ सम्यग्दृष्टिपदं चैव यथा निधिपतिश्रुतिम् । ब्रूयाद्वैश्रवणोक्ति च द्विःस्वाहेति ततःपदम् ॥३६ काम्यमन्त्रमतो बयात्पूर्वबन्मन्त्रविदद्विजः । ऋषिमन्त्रमितो वक्ष्ये यथाहोपासकश्रुतिः ॥ ३७
ज्यांचे वर्णन वर आले आहे व जे जातिसंस्काराला कारण आहेत ते मी सांगितले आहेत. आता निस्तारकादिमन्त्र आम्नायाला अनुसरून मी सांगतो ॥ ३१ ॥
स्वाहा ज्याच्या शेवटी आहे असे सत्यजाताय हे प्रथम सांगितले आहे. यानंतर स्वाहान्त अर्हज्जाताय हे पद सांगितले आहे ॥ ३२ ॥
यानंतर द्विजाने षट्कर्मणे स्वाहा हे पद उच्चारावे. यानंतर ग्रामपतये स्वाहा हे पद उच्चारावे. या पदाच्या उच्चारानंतर अनादिश्रोत्रियाय स्वाहा हे पद बोलावे. यानंतर स्नातकाय स्वाहा व श्रोत्रियाय स्वाहा ही दोन पदे बोलावीत ।। ३३-३४ ॥
__यानंतर देवब्राह्मणाय स्वाहा, सुब्राह्मणाय स्वाहा, अनुपमाय स्वाहा ही पदे क्रमाने बोलावीत ॥ ३५ ॥ यानंतर सम्यग्दृष्टिपद, निधिपतिपद व वैश्रवणपद ही पदे दोनदोन वेळा उच्चारावीत ॥३६॥
यानंतर पूर्वीप्रमाणे मंत्र जाणणाऱ्या द्विजाने काम्यमन्त्र बोलावा. यानंतर उपासक श्रुतीने जसे ऋषिमंत्राचे वर्णन केले आहे तसे मी करतो. चूर्णीमध्ये श्लोकात सांगितलेल्या मंत्राचे विवेचन आले आहे ते असे- सत्यजाताय स्वाहा-सत्यरूपजन्म धारण करणाऱ्याला मी हवि अर्पण करतो. अर्हज्जाताय स्वाहा अर्हन्तरूपजन्म धारण करणाऱ्याला मी हवि अर्पण करतो. षट्कर्मणे स्वाहा- देवपूजा आदि षट्कर्म करणाऱ्याला मी हवि अर्पण करतो. ग्रामपतये स्वाहामी ग्रामपतीला हवि अर्पण करतो. अनादिश्रोत्रियाय स्वाहा- अनादिकालापासून श्रुताचे अध्ययन करण्याची परम्परा ज्याची आहे त्याला मी हवि अर्पण करतो. स्नातकाय स्वाहा केवलि अरिहंतास मी हवि अर्पण करतो आणि श्रावकाय स्वाहा-श्रावकास निजगणांचा स्त्राव करणाऱ्या शुद्धात्म्याला मी हवि अर्पण करतो. देवब्राह्मणाय स्वाहा देवब्राह्मणास मी हवि अर्पण करतो. सुब्राह्मणाय स्वाहा- उत्तम ब्राह्मण स्वरूप ज्ञात्याला मी हवि अर्पण करतो. अनुपमाय स्वाहा निरुपम अशा ब्राह्मणास-शुद्धात्म्यास मी हवि अर्पण करतो. सम्यग्दृष्टे २ निधिपते २ वैश्रवण २ स्वाहा-हे सम्यग्दर्शन युक्त, हे निधीचा अधिपति असलेल्या कुबेरा मी तुला हवि अर्पण करतो. सेवाफलं षट्परमस्थानं भवतु, अपमृत्युविनाशनं भवतु, समाधिमरणं भवतु । या सेवेपासून मला सहा परमस्थानांची प्राप्ति होवो, अपमृत्यूचा नाश होवो आणि समाधिमरणाची प्राप्ति होवो॥३७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org