Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४०-५०)
महापुराण
(४३७
कालश्रमणशब्दं च द्विरुक्त्वामन्त्रणे ततः । स्वाहेति पदमुच्चार्य प्राग्वत्काम्यानि चोद्धरेत् ॥ ४६
सत्यजाताय नमः। अर्हज्जाताय नमः। निग्रन्थाय नमः। वीतरागाय नमः। महावताय नमः। त्रिगुप्ताय नमः। महायोगाय नमः। विविधयोगाय नमः। विविधर्द्धये नमः। अंगधराय नमः। पूर्वधराय नमः। गणधराय नमः । परमर्षिभ्यो नमो नमः । अनुपमजाताय नमो नमः । सम्यग्दृष्टे २ भूपते २ नगरपते २ कालश्रमण २ स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु।
अपमृत्युविनाशनं भवतु । समाधिमरणं भवतु । ऋषिमन्त्रः। मुनिमन्त्रोऽयमाम्नातो मुनिभिस्तत्त्वदशिभिः । वक्ष्ये सुरेन्द्रमन्त्रं च यथा स्माहार्षभीश्रुतिः ॥ ४७ प्रथमं सत्यजाताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् । ततः स्यादर्हज्जाताय स्वाहेत्येतत्परं पदम् ॥ ४८ ततश्च दिव्यजाताय स्वाहेत्येवमुदाहरेत् । ततो दिव्याच्चिर्जाताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् ॥ ४९ बयाच्च नेमिनाथाय स्वाहेत्येतदनन्तरम् । सौधर्माय पदं चास्मात्स्वाहोक्त्यन्तमनुस्मरेत् ॥ ५०
यानन्तर कालश्रमण शब्द देखिल सम्बोधनात्मक दोनवेळा म्हटला जावा व स्वाहा शब्द कालश्रमणशब्दापुढे जोडावा. यानंतर काम्यमंत्र जोडावा. हे सर्व सांगून तो समग्र ऋषिमन्त्र वर दिला आहे त्यातील प्रत्येक मंत्रपदाचा अर्थ क्रमाने असा- सत्यजन्माला धारण करणाऱ्या ऋषीला नमस्कार, अरिहंतजन्मधारक ऋषीस नमस्कार, संपूर्ण परिग्रहरहित ऋषीला नमस्कार, रागद्वेषमोहादि विकाररहित ऋषीला नमस्कार, अहिंसादि महाव्रत धारक ऋषींना नमस्कार, मनोगुप्ति, वचनगुप्ति व कायगुप्ति या तीन गुप्ति धारकास नमस्कार, महायोगधारण करणाऱ्या ध्यानी ऋषीला नमस्कार, आतापनादि योगाना धारण करणाऱ्या ऋषींना नमस्कार, नानाप्रकारच्या ऋद्धिधारकाना नमस्कार, आचारादिक अंगधारी ऋषींना नमस्कार, उत्पाद पूर्वादि चौदा पूर्वांचे ज्ञानधारण करणाऱ्या ऋषीना नमस्कार, गणधराना नमस्कार परमऋषीना वारंवार नमस्कार, ज्याचा जन्म अनुपम - अत्युत्कृष्ट आहे अशा ऋषीला वारंवार नमस्कार, सम्यग्दृष्टे, सम्यग्दृष्टे, भूपते भूपते, कालश्रमण, कालश्रमण स्वाहा हे सम्यग्दृष्टे, हे सम्यग्दृष्टे, हे भूपते, हे भूपते, हे कालश्रमण हे कालश्रमण आपणास मी हवि अर्पण करतो. आपली सेवा केली त्याचे फल अशा सद्गृहस्थत्वादि सहा परमस्थानांची प्राप्ति मला होवो अपमृत्यूचा नाश होवो व समाधिमरण प्राप्त होवो हा ऋषिमन्त्र आहे ॥ ४६ ॥
जीवादितत्त्वाना पाहणाऱ्या मुनीश्वरानी हा मुनिमन्त्र गुरुपरंपरेने सांगितला आहे. आता ऋषभनाथाच्या श्रुतीने जसा सुरेन्द्रमन्त्र सांगितला आहे तसा मी सांगतो ॥ ४७ ।।
_प्रथमतः सत्यजाताय स्वाहा हे पद म्हणावे. यानंतर अर्हज्जाताय स्वाहा हे पद म्हणावे ॥ ४८ ॥
याच्यानंतर दिव्यजाताय स्वाहा हे पद म्हणावे. नंतर दिव्याच्चिर्जाताय स्वाहा हे पद बोलावे ॥ ४९ ॥
यानन्तर नेमिनाथाय स्वाहा हे पद बोलून नंतर स्वाहा शब्द ज्याच्या अन्ती आहे असा सौधर्माय शब्द बोलावा अर्थात् सौधर्माय स्वाहा असे वाक्य बोलावे ।। ५० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org