________________
४०-६२)
महापुराण
सुरेन्द्रमन्त्र एषः स्यत्सुरेन्द्रस्यानुतर्पणम् । मन्त्रं परमराजादिवक्ष्यामीतो यथाश्रुतम् ॥ ५६ प्रागत्र सत्यजाताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् । ततः स्यादर्हज्जाताय स्वाहेत्येतत्परं पदम् ॥ ५७ ततश्चानुपमेन्द्राय स्वाहेत्येतत्पदं मतम् । विजयाादिजाताय पदं स्वाहान्तमन्वतः ॥ ५८ ततोऽपि नेमिनाथाय स्वाहेत्येतत्पठेत्पदम् । ततः परमजाताय स्वाहेत्येतदुदाहरेत् ॥ ५९ परमार्हताय स्वाहा पदमस्मात्परं पठेत् । स्वाहान्तानुपमायोक्तिरतो वाच्या द्विजन्मभिः ॥ ६० सम्यग्दृष्टिपदं चास्माद्बोध्यान्तं द्विरुदीरयेत् । उग्रतेजः पदं चैव दिशाञ्जयपदं तथा ॥ ६१ नेम्यादिविजयं चैवं कुर्यात्स्वाहापदोत्तरम् । काम्यमन्त्रं च तं ब्रूयात्प्राग्वदन्ते पदस्त्रिभिः॥ ६२
ज्यात सुरेन्द्राचे तर्पण करावयास सांगितलेले असते त्या मंत्राला सुरेन्द्रमन्त्र म्हणतात त्याचे वर्णन केले. आता मी आगमाला अनुसरून परमराजादिमन्त्र येथे सांगतो ।। ५६ ।।
प्रथमतः या परमराजादिमंत्रात सत्यजाताय स्वाहा हे पद सांगितले आहे. तदनन्तर अर्हज्जाताय स्वाहा हे दुसरे पद सांगितले आहे ।। ५७ ।।
यानंतर अनुपमेन्द्राय स्वाहा हे पद सांगितले आहे आणि त्यानंतर परमार्जािताय स्वाहा हे पद वणिले आहे ॥ ५८ ॥
त्यानन्तर नेमिनाथाय स्वाहा हे पद म्हणावे. नंतर परमजाताय स्वाहा हे पद बोलावे ॥ ५९ ॥
या पदाच्या पुढे परमार्हताय स्वाहा हे पद बोलून त्यानन्तर ब्राह्मणानी अनुपमाय स्वाहा हे वाक्य उच्चारावे ।। ६० ॥
या पदाच्या पुढे सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे हे पद दोन वेळा उच्चारून उग्रतेजः हे पद व दिशाञ्जय हे पद दोन दोन वेळा उच्चारावे ।। ६१ ॥
यानंतर नेमिविजयाय स्वाहा हे पद दोन वेळा बोलावे व पूर्वीप्रमाणे शेवटी काम्यमन्त्र तीनवेळा म्हणावा ॥ ६२ ॥
यानन्तर चूर्णि-सत्यजाताय स्वाहा । अर्हज्जातायस्वाहा । अनुपमेन्द्राय स्वाहा । विजयाच्चिर्जाताय स्वाहा। नेमिनाथाय स्वाहा। परमजाताय स्वाहा । परमाहताय स्वाहा । अनुपमाय स्वाहा । सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे, उग्रतेजः, उग्रतेजः दिशां जय दिशां जय, नेमिविजय नेमिविजय स्वाहा। सेवाफलं षट्परमस्थानं भवतु । अपमृत्युविनाशनं भवतु । समाधिमरणं भवतु । परमराजादिमन्त्रः । काम्यमन्त्रः ।
अर्थ- मी सत्यजन्म धारण करणाऱ्याला हवि अर्पण करतो. अरिहन्तपदाला योग्य जन्म धारण करणान्याला हवि अर्पण करतो. मी अनुपम इन्द्राला अर्थात् चक्रवर्तीला हवि अर्पण करतो. मी विजयतेजाने पूर्ण असा जन्म धारण करणाऱ्या चक्रवर्तीला हवि अर्पण करतो. धर्मरूपचक्राला चालविणा-याला हवि अर्पण करतो. उत्कृष्ट जन्म धारण करणान्यास मी हवि अर्पण करतो. मी परमअर्हद्भक्ताला हवि अर्पण अरतो. उपमारहित अशा महापुरुषाला मी हवि
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org