________________
४३८)
महापुराण
(४०-५१
कल्पाधिपतये स्वाहापदं वाच्यमतः परम् । भूयोऽप्यनुचरायादि स्वाहाशब्दमुदीरयेत् ॥५१ ततः परम्परेन्द्राय स्वाहेत्यच्चारयेत्पदम । सम्पठेदहमिन्द्राय स्वाहेत्येतदनन्तरम ॥५२ ततः परमाहताय स्वाहेत्येतत्पदं पठेत् । ततोऽप्यनुपमायेति पदं स्वाहापदान्वितम् ॥ ५३ सम्यग्दृष्टिपदं चास्माद्बोध्यान्तं द्विरुदीरयेत् । तथा कल्पपति चापि दिव्यमूति च सम्पठेत् ॥ ५४ द्विर्वाच्यं वज्रनामेति ततः स्वाहेति संहरेत् । पूर्ववत्काम्यमन्त्रोऽपि पाठ्योऽस्यान्ते त्रिभिः पदैः ॥५५ चूणि- सत्यजाताय स्वाहा । अहंज्जाताय स्वाहा । दिव्यजाताय स्वाहा। दिच्चि ताय
स्वाहा । नेमिनाथाय स्वाहा । सौधर्माय स्वाहा । कल्पाधिपतये स्वाहा । अनुचराय स्वाहा । परम्परेन्द्राय स्वाहा। अहमिन्द्राय स्वाहा । परमाहंताय स्वाहा। अनुपमाय स्वाहा । सम्यग्दृष्टे २ कल्पपते २ दिव्यमूर्ते २ वज्रनामन् २ स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु । अपमृत्युविनाशनं भवतु। समाधिमरणं भवतु । सुरेन्द्रमन्त्रः ॥ यानंतर कल्पाधिपाय स्वाहा असे पद बोलून अनुचराय स्वाहा असे पद बोलावे ।।५।।
यानन्तर परम्परेन्द्राय स्वाहा हे पद बोलून त्यानन्तर अहमिन्द्राय स्वाहा असे पद म्हणावे ॥ ५२ ॥
___ यानंतर परमार्हताय स्वाहा हे पद म्हणून तदनन्तर स्वाहा या पदाने युक्त अनुपमाय हे पद म्हणावे अर्थात् अनुपमाय स्वाहा असे पद बोलावे ।। ५३ ॥
यानन्तर अन्तीं संबोधन असलेले सम्यग्दृष्टिपद दोनदा उच्चारावे. यानंतर कल्पपतिपद, दिव्यमतिपद व वज्रनाम हे पद अशी तीन संबोधनाची पदे दोन दोनदा उच्चारावीत व त्या तीनही पदांच्या पुढे स्वाहा हे पद जोडलेच पाहिजे ।। ५४ ।।
पूर्वीप्रमाणे काम्यमन्त्र देखिल या सुरेन्द्र मंत्राच्या शेवटी तीन पदानी म्हणावा. अर्थात कल्पपते कल्पपते
दिव्यमर्ते. वज्रनामन वज्रनामन् स्वाहा असे म्हणावे. याचा अर्थ- हे सम्यग्दृष्टे हे स्वर्गाच्या अधिपते, हे दिव्यमूर्ति-शरीर धारण करणाऱ्या हे वज्रनामा, मी तुला हवि अर्पण करतो ।। ५५ ।।
आता चूर्णीचा अर्थ- १) सत्यजाताय स्वाहा सत्यजन्म ज्याने धारण केला आहे त्याला मी हवि अर्पण करतो २) अर्हज्जाताय स्वाहा- अरिहंत जन्म ज्याने धारण केला आहे' त्याला मी हवि अर्पण करतो ३) दिव्यजाताय स्वाहा- ज्याचा जन्म दिव्य आहे त्याला हवि अर्पण करतो ४) दिव्याचिर्जाताय स्वाहा- दिव्य तेज धारण करून ज्याचा जन्म झाला आहे त्याला मी हवि अर्पण करतो ५) नेमिनाथाय स्वाहा- धर्मचक्राची धारा धारण करणाऱ्या जिनेन्द्राला मी हवि अर्पण करतो ६) सौधर्मेन्द्राय स्वाहा- सौधर्मेन्द्राला मी हवि अर्पण करतो ७) कल्पाधिपतये स्वाहा- स्वर्गाच्या स्वामीला मी हवि अर्पण करतो ८) अनुचराय स्वाहाइन्द्राच्या अनुचराला मी हवि अर्पण करतो ९) परम्परेन्द्राय स्वाहा- परंपरेने होणाऱ्या इन्द्राना 'मी हवि अर्षण करतो १०) अहमिन्द्राय स्वाहा- मी अहमिन्द्राला हवि अर्पण करतो ११) परमार्हताय स्वाहा- अर्हत्प्रभूच्या उत्कृष्ट उपासकाला मी हवि अर्पण करतो १२) अनुपमाय स्वाहा- उपमारहिताला मी हवि अर्पण करतो. यानंतर हे सम्यग्दृष्टे, हे सम्यग्दृष्ट, हे कल्पाधिपते हे कल्पाधिपते, हे दिव्यमूर्ते हे दिव्यमूर्ते हे वज्रनामन् हे वज्रनामन् मी तुला हवि अर्पण करतो. सेवेचे फल अशा सद्गृहस्थत्वादिक सहा परमस्थानांची मला प्राप्ति होवो. अपमृत्यूचा नाश होवो व समाधिमरणाची मला प्राप्ति होवो. याप्रमाणे सुरेन्द्रमंत्राचे वर्णन झाले ।। ५५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org